मुंबईसाठी नव्हे तर मुंबईच्या नावावर राजकारण करु पहाणाऱ्या या साऱ्या नेत्यांना, त्यांच्या अनुयायी्ना, एकनिष्ठ कार्यकर्तांना, त्यांच्या ४० % वाल्या नगरसेवकांना, आमदारांना दिवसा व रात्री या बकाल, सौदर्यहीन शहरातुन, मुंबईमधुन, वाहनांसाठी तर सोडाच पण धड निटकेपणी चालता सुद्धा न येणाऱ्या रस्तांवरुन , कचऱ्याच्या ढिगाऱ्याने, घाणीने भरलेल्या, मोठमोठाले खड्डे पडलेल्या, रस्तांवरच्या टाक्यांची झाकणे नाहीशी झाल्याने उघड्या पडलेल्या गटाराच्या, गटारगंगा वहात असलेल्या, फेरीवाल्यांनी काबीज करुन, पदपाथ नाहीसे झालेल्या, पादचाऱ्यांसाठी पदपाथच नसलेल्या, भिकारयांनी, व्यसनी माणसांने अडवलेल्या, वर्षोनुवर्षे कसली ना कसली रेगांळलेल्या कामाने व्यापलेल्या, धुळीने भरलेल्या रस्तांवरुन, या शहरातल्या झोपडपट्टातुन , नरकासमान कचऱ्यांने भरलेल्या घरगल्यांमधुन , अगदी सर्व सर्व भागातुन फिरवुन आणले पाहीजे.
ही लोक अनेक वेळा परदेशवारी करत असतात , मग ते तेथली नीटनेटकी, सुबक, आखीवरेखीव, स्वच्छ , हिरवळीने भरलेली शहरे बघुन, त्यानी भारावुन जात हे सारे आपल्याकडॆ देखील आपण करावे किंवा करायला लावावे ही इच्छाशक्ती का दाखवत नाहीत ?

या शहरावरचे प्रेम व्यक्त करतांना हे शहर माणसांना रहाण्यासाठी सुसह्य होईल अश्या एका शहरात रुपांतर करुन दाखवणे हे यांच्यानी होत नाही.
हे तर फार कठीण काम ( पण अशक्य नव्हे ) त्यापेक्षा भावनांना हात घालणारी विधाने करणॆ फारच सोपे.
मागील पानावरुन पुढे कादंबरी सुरु रहाते.
हे तर फार कठीण काम ( पण अशक्य नव्हे ) त्यापेक्षा भावनांना हात घालणारी विधाने करणॆ फारच सोपे.
मागील पानावरुन पुढे कादंबरी सुरु रहाते.
No comments:
Post a Comment