Monday, February 15, 2010

१४/०२, मामाकाणॆ यांचे स्वच्छ उपाहारगृह ते क्रीम सेंटर व्हाया मालाडकराची व्हे.बिर्याणी

"याद राख उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवशील तर तंगड मोडुन टाकीन."

राजाभाऊंनी आपल्या बायकोला सज्जड दम भरला. (केवळ या धाडसाबद्द्ल जर का राजाभाऊंना २६ जानेवारीस शौर्य पदक मिळाले तर त्यावर कोणाला आक्षेप घेता येणे नाही )

जन्मभर आपल्या नवऱ्याचे कोणतेही म्हणणे, सांगणे, हे अजिबात ऐकायचे नसते हा ठाम निश्चय असणारी बायको त्यांचा " आज स्वयपाकघरात पाय म्हणुन ठेवायचा नाही " हा आदेश ऐकला की अचानक कशी आज्ञाधारक व्हायला लागते.

"काय गजराबिजरा."
"नको. मी नळाला लावायला फिल्टर घेतेयं. "


शेवटी आपल्या नवऱ्याचा लगाम आपल्याच हाती असला पाहिजे. .

मामा काणॆ यांचे स्वच्छ उपाहारगॄह. स्थापना १९१०.

तुम्ही मुंबई मधे रहात असाल आणि जर मामा काणॆंकडे जावुन बटाटा वडा खाल्ला नसाल तर मग तुम्हाला मुंबईमधे रहाण्याचा अधिकार नाही. ( "कायमचा ठावठिकाणा असल्याच्या दाखल्यात " हे एक कलम असायला हवे, केवळ १५ वर्षे मुंबईत रहाणे हे पुरेसे नाही )

बटाटावडा, मिसळ, कांदा,बटाटाभजी, थालीपिठ आणि कोथींबीर वडी."आपल्या सेवेत आम्हाला आनंदच आहे परंतु वेळॆचे भान ठेवुन अधिकाधिक ग्राहकांची सेवा करण्याचे संधी स्वखुशीने द्यावी. खाद्यपदार्थ फुकट घालविण्याचे टाळा व सामाजिक जाणीवेचे भान राखण्याचे समाधान मिळावा "असा मिळालेला प्रेमळ दम ध्यानी ठेवत या पदार्थांचा आस्वाद घावा.


राजाभाऊ जणु शटर उघडायला मामा काणॆंकडे पोचले. शटर काय उघडले आणि भराभरा इकडुनतिकडुन माणसे काय आत भस्सकन शिरली.

वडापाव, मिसळीवर ताव मारुन झाला.

त्यांच्या नशिबी पुढे काय ताट वाढुन ठेवले होते ह्याची त्यांना पुसटशी देखील कल्पना नव्हती.

बायको जेवु घालेना, मेहुणी उपाशी राहु देइना. यातली गत.

सोमवार बाजार , मालाड मधल्या श्री.मालाडकरांकडची तांदळाची मऊ सुत भाकरी व व्हे.बिर्याणी. सोबत मेहुणीच्या हातची वटाण्याची चटणीची भाजी.



आज पासुन बायकोच्या माहेरच्यांशी चांगले वागायचे.

रात्री तिला परमप्रिय असणारा, अत्यंत आवडीचा असा कोणता पदार्थ व तो कोठे खाऊ घालायचा हा गहन प्रश्न गोरेगावच्या ओबेरॉय मॉल मधे नव्याने सुरु झालेल्या "क्रीम सेंटर " ने चुटकीसरशी सोडवला.



"रशियन सॅलड सॅंडवीज तिच्या साठी व चना भतुरा राजाभाऊंसाठी. गिरगाव चौपाटीवर मुळ स्थान असलेल्या या क्रीम सेंटरनी आता चांगलेच अनेक ठिकाणी बस्तान मांडलयं. अगदी पुण्यात कल्याणी नगरात सुद्धा.

हा खाद्यदिवस होता का व्हेलेंटाइन डे ?



7 comments:

हेरंब said...

बाप रे.. राजाभाऊ काय चालवलंयत काय? एकावर एक एकावर एक जब-या डिशा (डिशचे अनेक वाचन :P) .. तोंडाला सुटलेलं पाणी कीबोर्ड वर सांडलंय.. तेच पुसतोय..

तात्पर्य : जाहीर निषेध निषेध निषेध !! :-)

अपर्णा said...

हेरंब......(+1000000000000000000)

निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध

भानस said...

राजाभाऊ, १००% सहमत. मामा काणे यांचा वडा ज्याने कोणी खाल्ला नसेल त्याला मुंबईत राहण्याचा हक्क नाही.:) किती वेळा खाल्ला असेल.... आजही आठवण आहे. ( हल्ली मात्र रया गेली आहे... नवीन कायापालट गेल्या दोन वर्षात झाला असल्यास मला माहीत नाही.)एकसे एक पदार्थ तुम्ही मांडलेत.... कुठून सुरवात करावी बरं...:)

iravatee अरुंधती kulkarni said...

तुमच्या ह्या पोस्टने माझ्या आजोबांची आठवण झाली. ते मामा काणे उपहार गृहाचे भलतेच चाहते होते. त्यांच्या काळात मुंबईत दादरला महाराष्ट्रीयन ब्राह्मणी पध्दतीचे जेवण / खाणे मिळणारे ते एकमेव उपाहारगृह होते. आजोबा दादरला कामासाठी गेले की त्यांची ह्या उपहारगृहात हटकून फेरी होत असे. तिथे सगळे त्यांना ओळखत...मग त्यांच्याशी हालहवालीच्या गप्पा, क्षेमकुशल विचारून झाले की मगच ते आपला मुक्काम हलवत.....
ह्या 'चमचमीत' पोस्ट वद्दल धन्यवाद! :-)

-- सप्रेम
अरुंधती
--
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/

mannab said...

It's Upaahaar gruh, not upahar gruh. Upahaar means gift. Please use correct Marathi, even if Mama kane makes mistake on their name palte.
Mangesh Nabar

iravatee अरुंधती kulkarni said...

तुमच्या ह्या पोस्टने माझ्या आजोबांची आठवण झाली. ते मामा काणे उपहार गृहाचे भलतेच चाहते होते. त्यांच्या काळात मुंबईत दादरला महाराष्ट्रीयन ब्राह्मणी पध्दतीचे जेवण / खाणे मिळणारे ते एकमेव उपाहारगृह होते. आजोबा दादरला कामासाठी गेले की त्यांची ह्या उपहारगृहात हटकून फेरी होत असे. तिथे सगळे त्यांना ओळखत...मग त्यांच्याशी हालहवालीच्या गप्पा, क्षेमकुशल विचारून झाले की मगच ते आपला मुक्काम हलवत.....
ह्या 'चमचमीत' पोस्ट वद्दल धन्यवाद! :-)

-- सप्रेम
अरुंधती
--
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/

HAREKRISHNAJI said...

खरं म्हणजे ही पोष्ट खाण्यापेक्षा Valentine Day संपुर्ण दिवस आम्ही दोघांनी एकत्र घराबाहेर पडुन कसा साजरा केला ह्या बद्द्ल होती. पण बरोबर लिहिलेले नाही हे जाणावतयं.