बंबर टु बंपर ट्रॅफीक असलेल्या महानगराच्या गच्च भरलेल्या रस्तावर , जेथे वेग जणु शुन्य असावा अश्या जागी चालकाला, त्याच्या बाजुला बसलेल्या प्रवाश्याला सीट बेल्ट् लावण्याची कायद्याने सक्ती आहे , आणि हे पाळले जाते की नाही याची काटेकोरपण पहाणी केली जाते.
पण.
पोलीसांच्या वहाने उचलुन घेवुन जाणाऱ्या क्रेन मधे पाठीमागच्या उघड्याजागी गाड्या उचलणारी माणसे बसलेली असतात. उभी असतात. उघड्या क्रेन मधे पाठीमागे अश्यारितीने माणासांनी बसणे , उभे रहाणॆ हे अत्यंत धोकादायक आहे. कोणात्याही प्रकारची संरक्षण नसल्याने ते चालत्या गाडीतुन खाली पडु शकतात. एक बेसावध क्षण , एखादा अकस्मात ब्रेक लावल्याने वहानाला लागलेला झटका.
पण हे पोलीसांना सांगायचे कोणी ?
हे सारे कायद्याच्या कोणात्या कलमामधे बसते ?
2 comments:
राजाभाऊ,
’पुण्यात दुचाकी वाहने उचलून नेणारा टेंपो हा असुरक्षीत वाहतूक करत आहे त्याच्यावर आधी कारवाई कर’ अशी तक्रार एकाने केली होती.
परंतू, तक्रार लिहून घेणारे तेच अन कारवाई करणारे तेच. असो....
आपला,
अनिकेत वैद्य.
अनिकेत
ज्या ज्या वेळी हे कायदे मोडणारे पोलीस मला दिसतात त्या त्या वेळी मी त्यांना अडवुन त्यांना तुम्ही कायदे मोडत आहात याची चांगलीच जाणीव करुन देतो.
Post a Comment