Sunday, February 14, 2010

निषेध

निषेध.

जर्मन बेकरीमधे बॉंम्बस्फोट घडवुन आणणाऱ्या दहशदवाद्यांचा निषेध, दहशदवादी संघटनेचा निषेध, पाकिस्तानचा निषेध. एका चित्रपटासाठी सारे पोलीसबळ पणाला लावणाऱ्या सरकारचा निषेध, राज्यकारभार करायचा सोडुन राजकारण करत बसलेल्या मुख्यमंत्रांचा निषेध, आपली कामंधंदे सोडुन फालतु गल्लाभरु चित्रपट पहायला तीनचार खर्च करणाऱ्या गॄहमंत्रांचा निषेध , आपले अस्तित्व टिकवण्यासाठीची केविलवाणी धडपड करतांना शुल्लक बाबींचा पराचा कावळा करत साऱ्यांना वेठीस धरणाऱ्या नेत्यांचा निषेध, आपला चित्रपट हिट व्हावा म्हणुन जाणुनबुजुन वादविवाद निर्माण करणाऱ्या चित्रपटसॄष्टीचा निषेध, बेसावध पोलीसदलाचा , गॄहखात्याचा निषेध. बारामहिने चोवीस तास घरदार , सणवार विसरुन ड्युटीवर असणाऱ्या अप्रशिक्षित पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दल निषेध.

निषेध व्यक्‍त करण्यापलिकडे सामान्य माणुस आणखी काय करु शकतो ? एकादी दुर्घटना झाली की मग तेवढ्यापुरती सर्वांना जाग येते, हालचाली केल्या जातात, अनेक घोषणा केल्या जातात. पण अंमलबजावणी शुन्य. परत ये रे माझ्या मागल्या.

सर्वसामान्य माणुस एक मात्र नक्कीच करु शकतो, आपले डोळे , कान उघडॆ ठेवु शकतो.

संशयास्पद सामानाला हात लावु नका, बेवारसी बॅगा उघडुन पाहु नका , त्याची माहिती पोलीसांना द्या, हे इशारे वारंवार दिले जातात. पण ते गंभीर पणे घेतले जात नाहीत. या वर अधिक जनजागॄती होणाची गरज आहे.

बॅग उघडली नसती तर कदाचित हा विंध्वंस टाळता आला असता.

10 comments:

भानस said...

त्रिवार निषेध. पण त्याने काय होणार...:( यातून आपली कधीच सुटका नाही का? अतिशय दुर्दैवी घटना.

Naniwadekar said...

> एका चित्रपटासाठी सारे पोलीसबळ पणाला लावणाऱ्या सरकारचा निषेध ...
>---

प्रश्न एका चित्रपटाचा नव्हता, प्रश्न तत्त्वाचा होता. एका राजकीय पक्षाची गुंडगिरी किती चालू द्‌यायची हा प्रश्न होता. शिवसेना मला विचारांनी ज़वळची आहे, कॉंग्रेस अजिबात आवडत नाही. पण यावेळी मी सरकारचं कौतुक केलं. या जिद्‌दीनी सरकार मुसलमानांविरुद्‌ध उभं रहातं का? तर, होय, बरेचदा रहातं. काश्मीरमधे दहशतवादाचा सामना करायला सरकार रोज़ प्रचंड किंमत देतं.

> एकादी दुर्घटना झाली की मग तेवढ्यापुरती सर्वांना जाग येते, हालचाली केल्या जातात, अनेक घोषणा केल्या जातात. पण अंमलबजावणी शुन्य
>----

माझी एक मैत्रिण हुंडाविरोधात काम करायची. लग्नस्थळी निषेधाच्या ज़ाऊन घोषणा देणे, वगैरे. तिची बहीण चिडवायची की ताई मारे 'कामाचा आव आणते. दर महिन्यांत २-३ हुंडाबळी ज़ातातच'. पण काम केलं नसतं तर ४-५ बळी गेले असते, हे दिसत नाही. आणि त्याची वाचनीय बातमी बनत नाही. 'बाईला सासूनी ज़ाळलं' ही झकास वाचनीय बातमी असते. तोच प्रकार इथे. पोलीस आपल्या परीनी प्रयत्न करतात. अंमलबजावणी बर्‍याच प्रमाणात अकार्यक्षम असेलही, पण 'शून्य असते' असं नाही. सरकारच्या प्रयत्नांमुळे दहशतवादाच्या घटनांची संख्या तुलनेने मर्यादित राहते. पण या विषयातलं यश डोळ्यात भरत नाही, आणि अपयश एकदम उठून दिसतं. कोणत्याही पक्षाचं सरकार असो (कॉंग्रेस, भाजप, टोरी, मज़ूर, रिपब्लिकन), आपल्या प्राणाची बाजी लावणारे ध्येयवादी अतिरेकी कधीमधी हिंसा घडवून आणण्यात यशस्वी होतच राहतील.

Anonymous said...

बरोबर आहे....
जमल्यास हा लेख वाचा...
http://abhinavvichar.blogspot.com/2010/02/blog-post_13.html

THANTHANPAL said...

***दहाषदवादी भाऊ हे बरे नव्हे .आम्ही तुम्हाला इतक्या वेळा बाम्बस्फोटा ची संधी देतो पण तुम्ही आम्हाला जराही खरी माहिती सांगत नाही. एखादे वेळी तरी नक्की कधी स्फोट होणार आहे कोठे होणार आहे याची माहिती द्या . म्हणजे बोंब जप्त करून निकामी केल्याचे आम्हाला श्रेय मिळेल आमची मिडिया समोर मान ताठ होईल. जाणते समोर मत मागावयास जावे लागते. तुम्ही आम्ही भाऊ-भाऊ दोघो मिळून खावू

****खान चा सिनेमा आम्ही यशस्वी पणे प्रकाशित करून आम्ही भारताची धर्म निरपेक्षता सिद्ध केली. यामुळे जगात भारताची प्रतिमा उंचावली ओबामा अमेरिकेनेही मान्मोनसिंग यांना फोन करून अभिनंदन केले. भारताची उंचावलेली प्रतिमा डागाळंन्या साठी कांही भ्याड लोकांनी हा हल्ला केला आहे आम्ही त्यांचा शोध घेत असून यात स्वदेशी लोकांचा हात तर नाही ना? याचा तपास करत आहोत. एक उच्च समिती हि नेमली आहे. लोकांनी न घाबरता खान चा सिनेमा पाहावा आंनी भारत अश्या हल्ल्यला घाबरत नाही हे जगाला दाखवून द्यावे असे खान ने जर्मनीहून सांगितल
****हाल्लो, मी जर्मनी मधून शाहुरुख खान बोलतो. पुण्या मधील बॉम्बस्फोटा ची बातमी एकूण मला माझ्या यशाचा आनंद साजरा करता आला नाही पण पुणेकरांच्या दुख: पेक्षा माझा आनंद मोठा नाही म्हणून मी हा आनंद साजरा न करता फक्त शांत पणे झोपून गेलो. कारण एव्हढ्या लांब वरून मी दुसरे काहींच करू शकत नाही. स्फोट करणाऱ्यांनी नेमकी वेळ साधून माझ्या आनंदावर पाणी ओतले म्हणून मी यांचा धिक्कार करतो. आपण हि यांचा धिक्कार करून हिम्मत न हरता सिनेमा पाहावा यशस्वी करून अंतकवाद्यानचे पापी पाक इरादे उधळून लावावे शांतते नंतर येत आहे

**बोलावं बोलवा पाकिस्थानंचे खेळाडू, कलाकार बोलवा. २५-३० लोक बॉम्बस्फोटात मेले तर काय भिघडले नाही तरी मरण कोणाला चुकणार आहे. म्हणून म्हणतो IPL धंदा झाला पाहिजे. अशोक आबा परकीय कलाकारांना खेळाडूना संरक्षण देण्यास तय्यार आहे. दहाषद वाद्यांचे बॉम्बस्फोट खपवून घेवूत पण स्वदेस प्रेमी भारतीयांना ठेचून काढण्यास ते समर्थ आहे .त्या करता तर तयान दिल्हीने सत्ता दिली. पण सरकार घाबरणार नाही. आणि पाक सरकारशी वाटाघाटी करणारच असे सरकारी प्रव्रक्त्याने सांगितले लवकरच भारत-पाक खान कलाकारांचा रंगारंग शो होणार आहे

Vaishali Hinge said...

U r right!!!!! we need trainned police.. police department अतिशय हलगर्जी होत चाललय. ढेरपोटे पोलिस बघुन राग येतो. जरी हा चित्रपटाचा गोंधळ नसता तरी मला वाटत नाही काही उपयोग झाला असता.

अनिकेत वैद्य said...

जर्मन बेकरीमधे बॉंम्बस्फोट घडवुन आणणाऱ्या दहशदवाद्यांना सलाम
दहशदवादी संघटनेला सलाम
पाकिस्तानला सलाम
एका चित्रपटासाठी सारे पोलीसबळ पणाला लावणाऱ्या सरकारला सलाम
राज्यकारभार करायचा सोडुन राजकारण करत बसलेल्या मुख्यमंत्रांना सलाम
आपली कामंधंदे सोडुन फालतु गल्लाभरु चित्रपट पहायला तीनचार खर्च करणाऱ्या गॄहमंत्रांना सलाम
आपले अस्तित्व टिकवण्यासाठीची केविलवाणी धडपड करतांना शुल्लक बाबींचा पराचा कावळा करत साऱ्यांना वेठीस धरणाऱ्या नेत्यांचा सलाम
आपला चित्रपट हिट व्हावा म्हणुन जाणुनबुजुन वादविवाद निर्माण करणाऱ्या चित्रपटसॄष्टीचा सलाम
बेसावध पोलीसदलाला , गॄहखात्याला सलाम.
बारामहिने चोवीस तास घरदार , सणवार विसरुन ड्युटीवर असणाऱ्या अप्रशिक्षित पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दला सलाम.

(मंगेश पाडगावकर यांच्या ’सलाम’ ह्या कवितेवरून)

THANTHANPAL said...

काश्मीरमधे दहशतवादाचा सामना करायला सरकार रोज़ प्रचंड किंमत देतं. हा विचार १०१% चूक.ही भरपाई भारतीय जनता देते आहे. कांग्रेस पुढारी नेहरूंनी हिमालया एव्हढी मोठी चूक जी करून ठेवली त्याची भरपाई भारतीय जनता दहशत वादाच्या रूपाने आज भोगते.आणि काश्मीर मध्ये भारतीय कायदे सरकार कांग्रेस/भाजप कोणतेही असो का लागू करत नाही.
यांच्या चुका मुळे हजारो भारतीय सैनिक नाहक बळी पडत आहे. नेते कधी दहशत वादी हल्ल्यात मेले का ? आणि जे मेले ते आपल्या कर्माने मेले, या मुळे उगीच छाती बडविण्यात अर्थ नाही

THANTHANPAL said...

काश्मीरमधे दहशतवादाचा सामना करायला सरकार रोज़ प्रचंड किंमत देतं. हा विचार १०१% चूक आहे. ही भरपाई भारतीय जनता देते
कांग्रेस पुढारी नेहरूंनी
हिमालया एव्हढी मोठी चूक जी करून ठेवली त्याची भरपाई भारतीय जनता दहशत वादाच्या रूपाने आज भोगते.
आणि काश्मीर मध्ये भारतीय कायदे सरकार कांग्रेस/भाजप कोणतेही असो का लागू करत नाही.
यांच्या चुका मुळे हजारो भारतीय सैनिक नाहक बळी पडत आहे. नेते कधी दहशत वादी हल्ल्यात मेले का ?
आणि जे मेले ते आपल्या कर्माने मेले, या मुळे उगीच छाती बडविण्यात अर्थ नाही

HAREKRISHNAJI said...

माफ करा, मला आपल्यासर्वांच्या प्रतिक्रियेवर उत्तर द्यायला वेळ लागल्याबद्दल. सविस्तर उत्तर द्यायचे मनात आहे पण नाही जमत आहे. कदाचित नेहमी प्रमाणे मधे काही काळ गेल्यानंतर भावनांच्या कमी होत जाणाऱ्या तिव्रतेमुळे असेल.