Monday, February 22, 2010

"बाय द वे " पुन्हा एकदा

तीन तास ज्या प्रवासाला लागायला हवे तेथे सात तास पुण्याहुन मुंबईला पोचायला लागले. तरी बर मधे शिवनेरीची वाट बघता, बघता वाकडला "सोल करी " ( हे उपहारगृह श्री. विठ्ठल कामतांच्या नावासोबत काही जचत नाही ) मधे साधा डोसा पोटाच्या खळगीत भरुन झाला होता.   

आज माटुंग्याला "रामा नायक " मधे जेवायचे करुन लवकर निघालेल्या राजाभाऊंवर मुंबई सेंट्रलच्या "कल्पना" मधे जेवणाचा घोर प्रसंग यावा ? 

दादा , सांगाना , नाही ना ,  नाही ना ते तिथे जेवले ?

दमलेल्या, भुकेल्या अवस्थेत भरगच्च , तुडुंब गर्दीत आपल्याला कधी जागा मिळेल याची वाट पहात रहाणे या सारखी सजा नसवी, आणि ती देखील येखाद्या रस्तावरच्या उपाहारगृहात, जे मिळेल ते पोटात टाकण्यासाठी ? व ते देखील शांतपणे , निवांत   बसुन चांगले जेवण जेवण्याचे ठिकाण घराजवळच असतांना ? 

मोजुन सातव्या मिनिटाला सहनशक्ती संपलेले राजाभाऊ गावदेवीला "सेवासदन " ही संस्था चालवत असलेल्या "बाय द वे " मधे.  हे एकमेव मॅड क्राउड पासुन वाचलेले ठिकाण आहे. शाकाहरी जेवणाच फक्‍त चार,पाचच भाज्या मिळत असल्यामुळे ते यांच्यापासुन वाचलयं. ते तसच रहावे निदान राजाभाऊंसाठी तरी.

शांतपणे, आरामात जीरा आलु व पोळ्या खाल्यानंतर मग त्यांच्या अंगात चांगली तरतरी आली. 


या उपहारगृहाची अंतर्गत सजावट, रंगसंगती, रचना , मांडणी, वरचे लाकडी भीम असलेले उंच छत , ही जागा राजाभाऊंना फार आवडते.



9 comments:

Ap____M said...

by the way, punha ekdaa kaal me barech varshaanni sion chya gurukrupa madhye gele hote!

HAREKRISHNAJI said...

गुरुकृपा छान आहे. मी गेलोयं तिथे.

HAREKRISHNAJI said...

बहुदा नाही गेलेलो. माझ्या डोक्यात "हनुमान" होते. गुरुकृपा नक्की कोठे आहे ?

रोहन... said...

मी सुद्धा काही पोस्ट टाकतो लवकरच ... :) खादाडी सुरू आहे जोरदार पण ऑनलाइन यायला जमत नाही फारसे. त्या साप्ताहिक सकाळची लिंक दया जमल तर.

Anonymous said...

हरेक्रिश्नाजी
काय हा व्यासंग...हॉटेलांचा? तुम्ही घरी कधी जेवता आणि?
डाएट नावाची काही चीज असते हे माहिती आहे का?
सगळे डॉक्टर्स, फ़िटनेस फ़्रीक्स तरी ठणाणा ओरडत असतात....तेलकट खाऊ नका....

अश्विनी

Ap____M said...

Coming from Kings Circle, take left at Sion Circle. Take left again where the road ends towards SIES college.

At Gurukrupa, they serve Samosa with Ragda (chhole) and Gulabjams are served hot. Their kulfi-falooda is also good.

HAREKRISHNAJI said...

रोहन ,

http://www.saptahiksakal.com/sapsakal/sapsakal/rightframe.html पण हे साप्ताहिक तुम्हाला कोठेही विकत मिळेल. यात आपल्या भटकंतीवरच्या ब्लॉगची चांगली माहिती आली आहे.

HAREKRISHNAJI said...

अश्विनी,

काळजी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. माझा खाण्याबाबतीत साफ तोल सुटला आहे हे खरे. नैराश्य, त्यापायी खाण्याबाबत विचार न करणे मग त्यातुन येणारी स्थुलता व स्थुलतेतुन परत वाढणारे नैराश्य या चक्रातुन आता तरी बाहेर पडायला हवे.

मन कस्तुरी रे.. said...

हरेक्रिश्नाजी,
खरे आहे, कधी कधी खाणे हाच एक आनंद उरतो (तुमच्या बाबतीत ’गाणे’ सुद्धा!)
पण तरीही थोडा विचार करा. निराशावाद गोंजारत न बसता त्याची मूळ कारणं शोधून, (आणि ती खरेच रिलेव्हंट आहेत का याचा विचार करुन) त्यावर उपाय योजायला हवेत नं? थोडं अलिप्ततेने (ऍज अ थर्ड पार्टी) सिच्युएशन कडे बघता आलं पाहीजे..जणू आपण त्याचा भाग नाहीच आहोत!

चीअर्स,
अश्विनी