Friday, February 12, 2010

उपवासाची थाळी

राजाभाऊंच्या बायकोला वाटले होते हे येवढे सारे हादाडल्यानंतर दुपारी राजाभाऊ भुकभुक करणार नाहीत, पण तिची तो गैरसमज होता,

भरलेले राजेळी केळॆ, राजगीऱ्याच्या पुऱ्या, शेंगदाणा लाडु, रताळ्याचा कीस, आणि रताळ्याची खीर

2 comments:

Mahendra said...

अहो पण साबुदाणा खिचडी अन साबुदाणा वडे राहिलेच की!!

मी तर काल रात्री सौ. कडुन मस्त पैकी उपवासाच्या भाजणीची थालिपीठं आणि त्यावर लोण्याचा गोळा... ( तिच्या नजरेकडे दुर्लक्ष करुन )हादडला- आजकाल मी लोणी वगैरे घेतलं की ती माझ्या पोटाकडे बोट दाखवते, आणि मी त्यावर , हा शर्ट छान आहे नां? अशी काहीतरी कॉमेंट करुन वेळ मारुन नेतो ..

HAREKRISHNAJI said...

अरे हो. थालीपिठ राहिलीच. पण त्याची कसर रात्री उपवासाच्या मिसळीनी भरुन निघाली. मी साबुदाणा खात नाही. साबुदाणा हा शाकाहरी आहे का या बदल वाद आहे.

आपली ब्रिटानीयावरची पोष्ट अप्रतिम आहे. माझ्या आवडीच्या ठिकाणापैकी हे एक.