Tuesday, February 09, 2010

काय ते त्याचे फुलणे

केवढुसा त्याचा जीव. इटुकलं, पिटुकलं, चिटुकलं. पण काय त्याचा रुबाब, तो शृंगार, ते ऐश्वर्य.

वेड लागतं वेड. किती सुंदर आहे हे सारे वैभव, नजर हटता हटत नाही. 

जमीनीलगत एका काटकीवर डवरलेली ही पळासाची फुले.

4 comments:

Gouri said...

तुमच्या पळसाला भेटायला आईला घेऊन गेले होते... भर दुपारी आकाशाच्या पार्श्वभूमीवर त्याचा रंग अजुनच खुलुन दिसत होता. खरोखर डोळे निवले.

HAREKRISHNAJI said...

वा. क्या बात है. पोष्ट सार्थकी लागली. जवळ जावुन पाहिलात काय ? आम्ही सर्व सध्या मुंबईत आहोत. नाहीतर आपल्याला घरी येण्याचे आमंत्रण दिले असते. पुढे धायरेश्वराच्या देवळात , राजारामपुलाजवळील सारदा मठात बहावा जबरदस्त फुलतो. तो ही मग बघायला जा. अजुन त्याला बहरायला वेळ आहे.

Gouri said...

बहावा बघायला जाण्याची दर वर्षीची जागा म्हणजे कोथरूडमध्ये डहाणूकर कॉलनीच्या सर्कलला ... मधल्या छोट्या बागेच्या सगळ्या बाजूंनी बहाव्याची झाडं आहेत तिथे. तुम्ही ही नवीन जागा सांगितलीत. बहाव्याचं निमंत्रण आलं म्हणजे तिथे गेलं पाहिजे!

HAREKRISHNAJI said...

अरेच्या, मला ही जागा ठावुकच नव्हती आणि गंमत म्हणजे अगदी त्याच तिथे माझी मेहुणी रहाते.