२० वर्षाच्या प्रदीर्घ अनुभबानेही शहाणे होतील तर ते राजाभाऊ कसले ? आपल्या बायकोला खुष करण्यासाठी काय आणि किती किंमत मोजावी लागते हे का त्यांना ठावुक नाही ? कोणत्या गोरज मुहुर्तावर त्यांनी बायकोला चित्रपट दाखवायला नेण्याचे कबुल केले देव जाणॆ ? ( तसे लग्न झाल्यापासुन आता पर्यंत फक्त दोन-तीनच पाहीले असावेत तरी पण ). कबुल केले तर केले आणि तो पण कोणाता तर "दोस्ताना" पहायचे , जॉन भाय चा, प्रियांकाचा दोस्ताना !
अरे देवा, नारायणा, तुलाच माझी काळजी. भोगा आपली कर्माची फळे, एक तर हिंदी चित्रपट हा आपला प्रांत नव्हे त्यात परत दोस्ताना ?
इतक्या वर्षात महागाई व तिकीटाचे दर येवढे भडकले असतील याची जरा देखील कल्पना असती तर ? त्यात परत मेट्रो चित्रपटगृहात. गेली एक लाल नोट गेली, कशासाठी तर जॉन भाईच्या उघडया देहाचा दर्शनासाठी. आता पर्यंत हिंदी सिनेमात राजकपुर पासुन अनेकांनी पुरुषांच्या भावना चाळवण्यासाठी काय काय केले असेल , पण आता जमाना बदललाय हे मात्र खरे.
पण एकंदरीत थेटर मधे मोजकेच लोक बघुन आता आपल्याला काय बोरींग पहायला लागणार आहे याची कल्पना आली होतीच. उघडया देहांचे दर्शन पाहुन पाहुन माणुस किती पाहील ? बऱ्याच वेळा मला प्रश्न पडतो करोडो रुपये खर्च करुन हे सिनेमे काढतात , पण जरासे पैसे देवुन स्टोरी का बर लिहुन घेत नाही. र ला ट, ट ला प जोडला की झाले ? इकडुन तिकडुन कसेतरी तीन तास भरले पाहीजेत ना. त्यात परत असे खोटे बोलुन "गे" असल्याचे सोंग घेणे ही कल्पना एका आंग्लभाषीक चित्रपटातील असल्याचे मधुन मधुन आठवत राहीले. एक तर ठिगळे लावल्यासारखी इतर पात्रे, विनोद निर्मीतीचा ओढुन ताणुन केलेला प्रयत्न. बोमन इराणीचे पात्र आल्यानंतर वाटले होते, चला आता तरी सिनेमा गती पकडेल , पण नाही संथ गती काय तो सोडायला तयार नाही, बायकोच्या क्षोमापासुन वाचायला माणासाने जांभया किती वेळ दाबुन धरायच्या ?
बाहेर पडलो ते बेगम अख़्तरनी गायलेली गझल गुणगुणत.
मेरे हम-नफस मेरे हमनवा मुझे दोस्त बनके दगा न दे ! मै हुं दर्दे-इश्कसे जा-बलब मुझे जिंदगीकी की दुवा न दे !!
काय करणार शुद्ध व्हायचे होते ना.
परत हा खर्चाचा सुरु झालेला सिलसीला तेवढ्यापुरताच मर्यादीत राहीला असता तर ? बाहेर खाणे झाले हे तर होतेच पण आपल्या बायकोसाठी आपल्या बापाने केलेला खर्च अर्थातच चिरंजीवांच्या पचनी पडण्यासारखा नव्हताच, त्यानी आपली किंमत वसुल करायची ती केलीच. त्याच्या ही लॉग पेंडीग डिमांड्स होत्याच ना.
एकंदरीत काय तर बायकोला खुष करण्याचा प्रयत्न करु नये हेच खरे.
2 comments:
मीसुध्दा कालच हा पिक्चर पाहिला. सिनेमाबद्दल तुमच्याशी सहमत. विशेष भुर्दंड न पडल्याने मला तितका वैताग नाही आला.
श्री.आनंद घरे,
माझा ब्लॉगला भेट दिल्याबद्द्ल धन्यवाद.
कधीतरी आपल्याला भेटायला आवडेल.
Post a Comment