Tuesday, November 25, 2008

श्री.शशांक मक्तेदार यांचे गाणॆ

शशांक मक्तेदार यांचे सुश्राव गायन ऐकण्याचा अखेर काल योग जुळुन आला. पं. फार वर्षापुर्वी उल्हासजी कशाळकरांच्या साथीला मागे तंबोऱ्यावर असतांना मी त्यांच्या गाण्याची एक झलक अनुभवली होती. काल कै. पं. महादेवबुवा गंधे यांच्या स्मॄतीदिनानिम्मीत्ते श्री.शशांक मक्तेदार यांचे गाणॆ एस.एम.जोशी सभागॄहात आयोजीत केले होते.

पण एक गोष्ट मी विसरलो. स्मॄतीदिन असल्यामुळे त्यासंबधी होणारी भाषणॆ. जवळ जवळ तास भर त्यात गेला, मग तंबोरे जुळवणॆ वगैरे. जसजसा वेळ जात चालला तसतसा मग माझा गाणॆ ऐकण्याचा उत्साह नाहीसा होत जेला. जेमतेम ३०-३५ मिनीटे ऐकले, पण त्यात मन नव्हते. 

सतत एक प्रसंग आठवत राहीला. अश्याच प्रकारच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. वक्ते होते तत्कालीन म.न.पा आयुक्त श्री शरद काळे. त्यांना संयोजकांनी दोन शब्द बोलण्याची विनंती केली.

श्री.शरद काळॆ यांनी आपले भाषण सुरु केले.

" मला ठावुक आहे आपण गाणे ऐकायला आला आहात. आपण आणि गाणे यामधे मी ऐवु इच्छीत नाही. धन्यवाद "

गाणे सुरु झाले लगेचच. 


No comments: