Sunday, November 09, 2008

तिटकारा


तिटकारा येतोय , कीव वाटते , या थराला जाणारी माणसे पाहुनकेवळ पैशासाठी , केवळ आपल्या शो साठी , केवळ आपल्या चँनालाची लोकप्रियता वाढावी या साठी अन्नाचा हा असा अपमान ?

संडासाच्या भांड़्यात, कमोड मधे अन्न भरून त्यात डोके खुपसून त्याला हात लावता खायचे, गमबुटावर अन्न टाकुन ते जिभेनी चाटुन पुसुन , बुट साफ होईपर्यंत खात रहायचे
चीड येते
What nonsence - Do you have brains. (As added by my 8 years old niece, Sampada )

5 comments:

Innocent Warrior said...

नमस्ते हरेकृष्णाजी,
खूप खूप धन्यवाद!!!
मला ती ध्वनी मुद्रिका देऊ शकाल का ?
मी तुमचा ऋणी राहील.

-अभी

Ashwinis-creations said...

हरेक्रिश्नाजी,

अतिशय घृणा वाटली हे चित्र पाहून. कोण हे लोक? आणि त्यातून कसले पैसे मिळवणार आहेत ते?
अन्न हे परब्रम्ह मानणार्‍या सर्वांना हे किती लांछनास्पद आहे! कृपया हे चित्र ब्लॉग वरून काढून टाका. तुमचा प्रांजळ ब्लॉग अपवित्र होईल!

bumblebee... said...

..... हा कार्यक्रम बिंदास चॅनलवरचा - दादागिरी - नावाचा आहे... बिंदास - दादागिरी बहुतेक... बिनडोक म्हणावे या प्रकारातला...
अर्वाच्य भाषा - अनेकदा शिवीगाळही [ त्यातला महिला प्रेजेंटर एका भागात त्या कार्यक्रमात भाग घेतलेल्या एका मुलीला 'बिच' म्हणते !! महान !!] आणि वरुन अरेरावी... का तर म्हणे - कार्यक्रमच दादागिरीचा आहे ...! .. मुर्खांच्या बाजार सारा - अजुन काय?

भुंगा...

HAREKRISHNAJI said...

अश्विनी , जर का हे चित्र पाहिल्यानंतर आपली अशी प्रतिक्रिया असेल तर मग हे पहातांना मला काय वाटले असेल ?

Innocent Warrior,

It's availabel in Market.

Bumblebee

ya. you are right. It's really disgusting to watch

jayaka said...

चित्र पाहून , खरोखरीच कसतरीच वाटलं।..... ब्लॉग उत्तम आहे।