आकाशात एक अद्भुत नाट्य रंगत चालले आहे. या नाट्याचा क्लायमेक्स आहे सोमवारी संध्याकाळी, १ डिसेंबरला.
या वेळी तेजस्वी शुक्र, गुरु आणि चवथीच्या चंद्राची कोर अगदी जवळ येणार आहे.
हे मनोरम्य दृष्य पाहायला विसरु नका.
गेले कित्येक दिवस मी आकाश निरिक्षण करतांना हा खेळ न्याहळतोय, नैक्रुत्य दिशेला ( दक्षिण-पश्चिम ) सायंकाळी शुक्र व गुरु एकामेकांजवळ येत चालले आहेत, त्यांच्यातले अंतर दिवसेंदिवस खुप कमी होत चालले आहे, या त्यांच्या खेळात त्यांच्या साथीला सोमवारी चंद्र येवुन मिळणार आहे.
सायंकाळी साडेसहानंतर ते रात्री ९.३० पर्यंत चंद्र, शुक्राची कडकडुन गळाभेट घ्यायला जाण्यासाठी त्याच्या जवळ सरकत जाणार आहे.
ही मोलाची माहिती मला दिल्याबद्दल माझे स्नेही व या क्षेत्रातील जेष्ठ , अधिकारी व्यक्ती श्री. सुरेश परांजपे यांचे धन्यवाद. त्यांचे आग्रहाचे सांगणे आहे, रात्री एकाद्या तलावाच्या काठी जावुन हे अदभुत दृश्य पहा, पाण्यात पडणाऱ्या या ग्रहांच्या प्रतिबिंबाने मोहवुन जाल.
No comments:
Post a Comment