Saturday, November 15, 2008

Attitude that matters

मी अगदी मरमरेस्तोपर काम करतो पण कोणालाच माझी कदर नाही किंवा मी नुसतीच गद्धामजुरी  करुन राहीलोय, आहे तिथेच आहे, किंवा मी किती कामाचे डोंगर उपसतो , माझासारखी, माझ्या एवढी कामे कोणीच करत नाही तरी पण इतर माझ्या पुढे निघुन गेले. खर सांगतो माझ्यासारखी मेहनत कोणीच करत नाही. 
 
असे डायलॉग अवतीभवती बऱ्याच वेळा ऐकु येतात. हे सारे "त्या" निराशापोटी आलेले असतात.
 
अश्या वेळी खरी गरज असते ते आपले आपणच प्रामाणीकपणॆ मुल्यमापन करण्याची. आपली क्षमता प्रामाणीकपणे जोखण्याची. आपल्या मर्यादा जाणुन घेण्याची. स्वत: विषयी अवाजवी अपेक्षा न बाळगण्याची. 
 
बऱ्याच वेळा आपली आपल्या बद्दल अवाजवी कल्पना असतात. पुढे जाण्यासाठी आपण खरोखरीचे प्रयत्न केलेले नसतात. आपला अट्यीटुड योग्य असतोच असे नाही. आपण किती कामे  करतो यापेक्षा ती कशी करतो याला जास्त महत्व असते. 
 
आपण आपल्या स्वत:ला काळा बरोबर ठेवण्यासाठी आपल्या कार्यशैलीत सुधारणा घडवुन आणल्या आहेत काय ? नवीन काही शिकले आहात काय ? अनेक प्रश्न आपण आपल्याला विचारायला हवेत. निराशेच्या त्यात त्यात गर्तेत न सापडता जर आपण आपल्या दृष्टीकोन बदलला तर खुपच फरक पडत असतो. पहाडा सारखी वाटणारी कामे आता अगदीच नगण्य वाटायला लागतात.  
 
 

No comments: