Monday, November 03, 2008

समुद्रप्रवास


बरीच वर्षे लोटली असतील लाँचनी प्रवास करून। राजाभाऊनां स्वस्थ बसवेंना , आली सुरसुरी , बायको माहेराला गेल्याचे निम्मित्त साधले आणि राजाभाऊ निघाले जलाप्रवासाला। मु पो आवास व सासवणे।
मग काय भल्या पहाटे पोचले भाउच्या धक्याला , पहिली लाँच जरासाठी चुकली, मग प्रतिक्षा 6.45 च्या लाँचची,
बर झाले पहिली लाँच चुकली ती , या लाँचच्या सारंगाबरोबर चांगली दोस्ती झाली। त्यांच्या केबिन मधे बसुन कधी रेवासला पोचलो कळलच नाही। सोबत साथ होती ती समुद्रपक्षांची।

No comments: