अगदी काही वर्षापुर्वी गुरुदेवांच्या भोळ्याभाबड्या , खरोखरीच सतयुग यावे या प्रामाणीक इच्छेने प्रेरीत झालेल्या शिष्यांनी मुंबईमधील रस्तावरील भिंतीवर रंगवलेल्या "जय गुरुदेव सतयुग आयेगा" या घोषणा वाचायला मिळायच्या. त्या वाचणाऱ्याच्याही मनात यायचे "जर हे कलीयुग जावुन सतयुग आले तर किती बरे होईल."
पण मला वाटते गुरुदेवांच्या निधनानंतर हे लिहणे बंद पडले.
किंवा कदाचीत त्यांना जाणवले असेल, जो पर्यंत आपला समाज धर्म, जात्तपात, भाषा , प्रांत आदी संकुचीत मानवनिर्मीत विचारांनी विभागला गेला आहे, या मधली दरी रुंदावण्याचे काम स्वार्थी विचारांनी प्रेरीत झालेले आपले राजकारणी अगदी जोमात करत रहाणार आहेत तो पर्यंत हे दि्व्यस्वप्नच रहाणार आहे.
काल श्री. विवेक पटवर्धन यांच्या ब्लॉग वर त्यांच्या स्नेह्याला दंगलीत मिळालेल्या अमानुष वागणुकीबद्द्ल वाचले. खुप अस्वस्थ करणारा का लेख. संपुर्ण देशाला मान खाली घालायला लावणारा हा कालखंड.
केवळ अत्याचार करणारेच नव्हे तर संपुर्ण सुबुद्द समाज आज दंगलपिडी्तांच्या डोळ्याला डोळा देवु शकत नाही.
No comments:
Post a Comment