पुण्यामधे अग्नीपरीक्षा म्हणुन चार महिलांना उकळत्या तेलात हात घालायला लावणाऱ्या अमानुष घटने बद्द्ल वाचुन चीड आली. आपली अजुनही मानसीकता बदलत नाहीय ? त्या चार महिलांना उकळत्या तेलात हात घालायला लावण्याचे गुन्हेगारांना साहस होतेच कसे. आणि त्या बायका पण येवढ्या मुर्ख कश्या ? आधीच त्यांना पोलीसांची मदत घेता आली नाही ?
या अंधश्रद्धेविरोधी गेले कित्येक वर्षे श्री.नरेंद्र दाभोळकर आणि अंधश्रद्धा समिती कार्य करीत आहेत पण त्यांना गंभीरपणे घेण्यास कोणीच तयार नाही, अगदी राज्य सरकार देखील, अन्यथा या अंधश्रद्धेविरोधी कायदा असाच पास करुन घेण्यासाठी रेंगाळत ठेवला गेला नसता.
या समितीने काढलेल्या पुस्तकामधे हाच प्रसंग दिला आहे.
गरम उकळत्या तेलात तिने हात घातला पण तिचा हात भाजला नाही, कारण त्या बाईने उकळण्याआधी तेलात भरपुर लिंबाचा रस मिसळला होता व ते तेल गरम करायला ठेवले. उकळल्यावर गरम तेलात तिने हात घातला,
जे उकळल्यासारखे वाटत होते तो होता लिंबाचा रस ज्याचा तापमानबिंदु कमी आहे.
आरोपींना कायद्याने शिक्षा होईल (?) पण जो घाव त्या चार बायकांच्या मनावर झाला आहे त्याचे काय ?
http://www.esakal.com/features/261108/pne_superstition_1/index.html
मंगळसूत्र चोरले नाही हे सिद्ध करण्यासाठी विमाननगर येथील देवकर वस्तीत ता. २३ नोव्हेंबर रोजी चार महिलांना "अग्निपरीक्षा' द्यावी लागली आहे. या चौघींना कढईतील गरम तेलात हात घालण्यास भाग पाडणाऱ्या सासू-सुनेला विमानतळ पोलिसांनी अटक केली.
No comments:
Post a Comment