Friday, February 12, 2010

रात्रीचीझगमगातीदुनीयाजेव्हासरतेतेव्हाजीवनातलीदाहकरुपसमोरयेते


फाफाफालतु मुमुमुद्दे घघेघेवुन लोलोकांचा ममनात ड्ड्डर पैदा करण्याऐवजी कल्याणाकारी शिवराज्य साकार करण्यासाठी, एक आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी सर्व नेत्यांनी प्रामाणिक राजकिय इच्छाशक्ती दाखववी.

आपल्या  राज्यात, छत्रपती शिवाजीमहाराजांचा वारसा अभिमानाने मिरवणाऱ्या राज्यात कोणत्याही मायबहिणीला, मुलीला असे उघड्यावर अगदी झोपणे, आंघोळीपासुन सर्व  काही करायला लागणे ही आपल्या सर्वांसाठी केवळ लाजीरवाणी गोष्ट आहे.  

दुर्दैवांनी आपल्या भाग्यविधात्या नेत्यांना राजकीय लाभ व राजकीय साठेमारी व त्यातुन निर्मांण होणारी ताकद व मिळणारे अफाट बेहिशोबे धन या पलिकडचे काहीही कळत नाही. 

आपल्याच मस्तीत व वर्तुळात ते दंग आणि गुंग आहेत.

काला घोडा कलामहोत्सवात राजाभाऊ उर्फ हरेकृष्णाजी उर्फ प्रियदर्शन

स्त्रीहट्ट, बालहट्ट आणि हमलोग



स्त्रीहट्ट आणि बालहट्ट जेव्हा एक होतात तेव्हा राजाभाऊंना आपल्या प्रकृतीला न मानवणारी गोष्ट करावी लागते, त्यांची पुतणी त्यांना रेडीयो क्लब मधे "हमलोग अवॉर्ड " ला जबरदस्तीने घेवुन गेली. 

"धावला फोटो काढायला. पुतणीचे नाव .... "

"अगं तस नाही ग .......,  खरच मी तिकडे बघत नव्हतो" 

ता.क.  गेटवे जवळील प्रेसीडंसी रेडीयो क्लब मधलं जेवण व वातावरण राजाभाऊंना अजिबात आवडत नाही.

कुलाबा उपवन

किरण पुरंदरेंच्या पुस्तकात काटेसावर भेटला व त्याला पहायला राजाभाऊ आज भल्या पहाटॆ उठुन कुलाबा उपवनात गेले. आत मधला काटेसावर काही अजुन फुलला नाही पण बाहेर रस्तावर असलेल्या झाडावर काही चुकार फुले होती.  अशोकही यंदाला अजुन फुललेला नाही. कदाचीत कोण्या सुंदरीने त्याला लत्ताप्रहार करावा याच्या प्रतिक्षेत तो असावा.

बडा दुख होता है !

राजाभाऊंच्या लग्नातील सुट येथलाच. तारुण्याच्या मस्तीत शिवलेले कपडे येथलेच.

कालाय तस्म नमः

रस्तावरली मुले

ब्रुन-मस्का इराण्याकडचा

आज महाशिवरात्रीच्या दिवशी राजाभाऊंनी इराण्याकडे जावुन ब्रुन-मस्का, चहा हाडदला. फोर्ट मधल्या या याझदानी बेकरीत मुंबईमधले सर्वोत्कृष्ट कडक पाव, बन पाव मिळतात. ( गेल्या शतकात गावांमधे विहीरीतील पाण्यात पाव टाकल्याने व ते पाणी पियाल्यामुळे माणसे बाटल्याच्या सुरस कथा ऐकायला मिळतात, आणि आता  )

हे पाव गरमागरम जेव्हा भट्टी बाहेर येतात त्या वेळा सांभाळल्या तर मग काय बघायलाच नको.  समाधान. निव्वळ समाधान.

माझ नाव बांडे आहे, जनु बांडे.

आयच्यान सांगतो म्या काय पन केल नाय, म्या कायपन बोललुपन नाय, म्या आपल मुकाट शेजारच्या गल्लीमदल्या सुभान्याशी गोट्या खेलुत होतु , तिकडुन बबन्या आला , आमाला बोलला मला बी घ्या खेलायला, आपण गिल्लीदांडु खेलु, म्या नकु बोललु तर तिकडुन त्याचा दादा आला आनी माज्या कानाखाली जाळ काडला, बोलला खेळबीळ काय नाय करायचा. चला पला येतुन.

तवालच तिकडश्यान राजुभय्या आल , बोलल खेला तुमी, म्या बघतो कोन नाय म्हनत ते.  आता खेलायच तरी वांद, नाय खेलायच तरी पंचाइत.


तर म्या काय म्हणतु ,  अस करु नका, तुमी काय घ्यायच ते घ्या , पन आमाला उद्याला तरी खेलुन द्या.  दादानु, माज नाव बांडे आहे, जनु बांडे. तवा काय तरी करा पन सेटलमेण करुनश्यान टाका.

Thursday, February 11, 2010

पैसे काय ?

"पैसे काय फक्‍त श्रीमंत समाजसेवी संस्थांनीच कमवायचे काय ? आत मधे पाच रुपयाची वस्तु पाचशे रुपयाला विकतात ते चालते , मग या गरीबांना देखील कमवु द्या की ."

राजाभाऊंनी त्यांना सांगितले.


कालाघोडा कला महोत्सव भरला आहे मुंबईत.

बाहेरच्या बाजुला रस्तावर दुतर्फा गरीब महिला काहीबाही विकायला बसलेले. कोणीतरी फतवा काढला , यांना हटवा, सुरक्षारक्षक ते तर हुकमाचे ताबेदार.

Wednesday, February 10, 2010

मान्य

कार्यकत्यांना बांधुन ठेवायला काहीतरी इश्यु निर्माण करावा लागतो, त्यांच्या समोर काहीतरी ध्येय ठेवावे लागते.  मान्य , अगदी मान्य.

पण म्हणुन काय आयुष्यभर फक्त तेच नी तेच नी तेच कार्यक्रम ? तेच मुद्दे. त्याच भावभावना, भावना आणि भावनाच.  भावनांचा आणि भावनांशी तोच खेळ.  आलटुन पालटुन तेच विचार , न्युनगंड, भयगंड निर्माण करण्याचा तोच धंदा.

हेलीकॉप्टर आता पुढे सरकु द्या की. 

का आपला एका प्रकरणात झालेली गोची दुसरीकडॆ भरुन काढायचा प्रयत्न ?

की बुढत्याचा पाय खोलात ?


Tuesday, February 09, 2010

जीवाला फार त्रास होतोयं

"असा हा अक्राळाविक्राळ, दांडगाई करणारा,धुडगुस घालणारा, दांडगोबा पाऊस शांत झाला त्तेव्हा बारा तास पूर्ण झाले होते. महामूर पाऊस. आणि मग ? मग स्वर्गाचं दार उघडल्यासारखी उघडीप. प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी उघडीप. पाऊस थांबला. वाऱ्याचा वेग मंदावला. धावड्याची, ऐनाची उंच झाडं तेवढी शेड्यांतून मंदपणॆ डुलत राहिली. पाय मोकळॆ करायला माणसांनी उंबरे सोडले. भिजून चिंब झालेली, चिंब होऊन गारठलेली आणि गारठुन केविलवाणी झालेली पाखरं झाडामधुन बाहेर पडली. कोतवाल, रानभाई, चाष, मिठू. दयाळ, सुतार, सुभग या पक्षांनी पंख पसरले, राखट-पांढऱ्या आकाशात ."  -( "सखा नागझिरा मधुन साभार " )  

राजाभाऊंच्या मनाने   देखिल पंख फडफडत, पंख पसरवत उड्डाण केले , पोचले ते थेट भिमाशंकरच्या वाटेवर. 

ऐन श्रावणात.  पेठ उर्फ कोथळीगड मार्गे ते चार जण  निघालेले. गच्च हिरवेकंच रान,  काहीसा असाच तो पाऊस. जणु माथ्यावर वसलेल्या  "सिर पै धरी गंग" वाल्या "पिनाकी महाग्यानि   " नी   एक बट सैलावत, खाली सोडलेली ती गंगा,   अंगावर झेलत,   तिचा मारा सहन करत , बेभान, मस्तवाल झालेले ओढेनाले पार करत,  मधेच रस्ता चुकल्याने भरकटलेले असे ते,  बरोबर दिशा धरुन चालत अंधाऱ्या रात्री मुक्कामी पोचल्यावर चुलीवर शिजलेल्या गरम भाताचा तो भलामोठाला डोंगर, त्यावरची ती वाफाळलेली आमटी. अंतिम सत्य एकच.

घुसमटलेल्या बा मना, ये रे असा जागेवर ये.  कोठे आहेस याचे जरासे भान असु दे रे.

समोरच्या नारळाच्या शेंड्यावरती एक घार येवुन बसली आहे.  कामं करत असतांना मुद्दामुन टॆबलावर ठेवलेल्या किरण पुरंदरेंच्या या पुस्तकावर मधेच नजर जातेयं.  तेवढाच आपला निसर्गाशी जवळीक  साधायला सेतु.   मन कसे तडफडुन जातयं. येथे तु काय करतो आहेस ? अरे जंगल साद घालतेयं की. कधी बरं तु गेला होतास निसर्गाच्या कुशीत ? धनगड वरुन खाली पाच्छापुरच्या वाडीत उतरलास त्याला किती काळ लोटुन गेला ? आठवतं का रे तुला ते मुळशीच्या तलावातील "सुसाळे बेट " . आणि ती पोर्णीमेची रात्र, ढाकबहिरी वरुन तुम्ही रात्री उतरायला सुरवात केली होतीत. काय टप्पोर चांदण्यानी धरती नुसती खुलुन गेली होती.

वेड्या तु कधी जंगल वाचलसच नाही, नुसताच आंधळेपणाने भटकलास.

जंगलात हे सारे असे असते काय .

येथे पुर्वी ....

कायद्याची ऐसी की तैसी.

बंबर टु बंपर ट्रॅफीक असलेल्या महानगराच्या गच्च भरलेल्या रस्तावर , जेथे वेग जणु शुन्य असावा अश्या जागी चालकाला, त्याच्या बाजुला बसलेल्या प्रवाश्याला सीट बेल्ट् लावण्याची कायद्याने सक्ती आहे , आणि हे पाळले जाते की नाही याची काटेकोरपण पहाणी केली जाते.

पण.

पोलीसांच्या वहाने उचलुन घेवुन जाणाऱ्या क्रेन मधे पाठीमागच्या उघड्याजागी गाड्या उचलणारी माणसे बसलेली असतात. उभी असतात. उघड्या क्रेन मधे पाठीमागे अश्यारितीने माणासांनी बसणे , उभे रहाणॆ हे अत्यंत धोकादायक आहे. कोणात्याही प्रकारची संरक्षण नसल्याने ते चालत्या गाडीतुन  खाली पडु शकतात.  एक बेसावध क्षण , एखादा अकस्मात ब्रेक लावल्याने वहानाला लागलेला झटका.


पण हे पोलीसांना सांगायचे कोणी ?

हे सारे कायद्याच्या कोणात्या कलमामधे बसते ?

काय ते त्याचे फुलणे

केवढुसा त्याचा जीव. इटुकलं, पिटुकलं, चिटुकलं. पण काय त्याचा रुबाब, तो शृंगार, ते ऐश्वर्य.

वेड लागतं वेड. किती सुंदर आहे हे सारे वैभव, नजर हटता हटत नाही. 

जमीनीलगत एका काटकीवर डवरलेली ही पळासाची फुले.

Monday, February 08, 2010

अरे हा तर आपल्या दिक्षीतांचा वासु.

या "स्वरात्मा" नी धम्माल केला. काय त्यांचे चित्रविचीत्र कपडे, वागणॆ , उड्या काय मारणॆ.

पण त्या तालावर नाचावेसे ,साऱ्या जगाचे भान हरपुन केवळ संगीतावर मस्ती करण्याचे मन करत होते.

बाजागाजा


गेले तीन दिवस ईशान्य मॉल पुणॆ येथे " बाजागाजा , २१ व्या शतकातले संगीत " हा आनंदोत्सव भरला होता. नाट्यसंगीत, भारुड, पोवाड्या पासुन शास्त्रीय संगीत ते अगदी रॉक म्युझीक पर्यंत. 

दुर्दैंवाने साऱ्या संगीतसंमेलनाला भरभरुन दाद देणाऱ्या चोखंदळ पुणॆकरांकडुन हे "बाजागाजा" तसे उपेक्षीत रहाते.

शनिवार.

चंद्र प्रसाद यांचे हवेली संगीत ऐकुन झाले सोबत पखावज वर प्रकाश शेजवल. डेव्हीड ट्रासॉफ चे सरोद वादन ऐकतांना मन रमत नव्हते कारण त्यांच्या नंतर होणाऱ्या "सुझुकी स्कुल ऑफ व्हायोलीन " च्या सत्तर मुलामुलींच्या व्हायोलीन वादना कडॆ लक्ष लागले होते.

पण खरी ओढ होती ती " स्वरात्मा" ची. गेल्या वर्षी त्यांच्या Performance  पाहुन राजाभाऊ पिसाळले होते.