अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Wednesday, March 30, 2022
खिंचीया पापड
पुर्वी दरवर्षी वर्षाऋतुत मंगेश पाडगावकर "लिज्जत पापड " साठी नवी नवी कविता करत असतं.
भुलेश्वर.
इती राजाभाऊ
पापड म्हणजे पापड असतात.
सर्व पापड सेम असतात.
सर्व पापड सेम असले तरी
काही पापड गोल्डन मसाला असतात
काही पापड बटर मसाला असतात
तर काही चीज मसाला.
हे ही तेवढेच खरे की
गोपाल पापडवाल्याकडे
मसाला तेवढा सेम असतो.
श्री वडोबा
एकदा का कानफाट्या नाव पडले की मग कितीही स्पष्टीकरण दिले तरी त्याचा काहीच उपयोग नसतो. राजाभाऊंनी कितीही जोरात आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला व तो प्रथमदर्शनी काळेकाकुंनी जरी मान्य केला असला तरी अविश्वासाची छाप काही केल्या लपुन रहाणे नाही. कालच्याला खरंच सकाळी "श्री वडोबा " मधे जावुन मिसळ खाण्याचा राजाभाऊंचा इरादा नव्हता. असे घाईगडबडीत तेथे जावुन उगीचच खायचं म्हणुन जाणे त्यांना नको होतो. "श्री वडोबा" ला अगदी निवांतपणॆ भेट देवुन तेथली मिसळ, बटाटेवडे, चवीचवीने खाण्याचा बेत होता.
पण त्याचे काय झाले, ते सकाळी घरुन काहीही न खाता गाडी कात्रजला सर्विसला देण्यासाठी निघाले. घाईगडबडीत रस्त्यातही काही खाण्याचे राहुन गेले. (मुद्दामुन राहुन गेले असा एक आक्षेपाचा मुद्दा , जाण्याचे आधीपासुनच ठरले होते हे ठावुक आहे ) पोटात नुसता 'वडा'वानल पेटलेला होतो, भुकेने काही सुचेनासे झाले, रहावेना. स्वस्थ बसवेना. केव्हा एकदा घरी जातो असे झालेले.
एक तासात गाडी मिळणार म्हटल्यावर मग वर्कशॉप मधे बसुन रहाण्यापेक्षा लगेचच राजाभाऊंनी "श्री वडोबा " मधे मिसळ खाण्यासाठी जाण्याचे ठरवले. सोबत दुसरी गाडी होती, चालकाला घेवुन राजाभाऊंची स्वारी पोचली "श्री वडोबा" मधे. खवळलेल्या भुकेने त्यांना काहीच सुचत नव्हते, कधी एकदा मिसळ समोर येते आणि आपण ती पोटात ढकलतो असे झाले होते. त्यात चालकाला परत लवकर घरी पाठवण्याचा जबरदस्त असह्य होत चाललेला तगादा.
ह्या साऱ्या गड्बडीत काय खाल्ले नी काही नाही काहीच कळाले नाही.
जे झाले ते योग्य नाही झाले. तेथे जावुन मिसळ शांतपणे खायची होती, बटाटेवड्याचा चवीचवीने आस्वाद घ्यायचा होता. त्या दिवशी राहुनच गेले.
कळतनकळत आपल्या हातुन खाण्याचा खाण्याचा योग्य तो मान राखला गेला नाही ही ठुसठुशीत राहिलेली अपराधीपणाची भावना दुर करायाची असले तर त्यावर प्रायचित्त एकच.
पुन्हा एकदा "श्री वडोबा " ला फुरसतीत भेट देणे.
गोमंतक
राजाभाऊंची अस्वस्थता फार वाढली होती.
चाय पे "खारी" हो जाय असे त्यांना जरी तिव्रतेने वाटत असले तरीपण गायवाडी मधल्या "गोमांतक " मधे खारी बिस्किटे आणायला जायला वेळ मिळत नव्हता.
आज तो मिळाला.
आता उद्यापासुन "चाय पे खारी "
"गोमंतक " मधे खुप चांगल्या दर्जाची बिस्किटे मिळतात.
नारायणवाडी
मोठ्या प्रमाणात मिठाई घ्यायची आहे ?
थेट नारायणवाडी गाठावी.
येथे मिठाई बनवण्याचा कारखाना आहे. चांगल्या दर्ज्याची आणि माफक दरात मिठाई मिळते.
शिवसागर
साहेबांनी जरी मस्करीत सांगितले असले तरी पण राजाभाऊंनी साहेबांचे सांगणे भलतेच मनावर घेतले दिसतेय.
काल रात्री त्यांच्या सुपुत्राने एरॉस चित्रपटगृहाच्या शेजारी असलेल्या "शिवसागर " मधे त्याने खाल्लेल्या "भाजीडोसा" बद्दल सांगितले. मग काय आज संध्याकाळी राजाभाऊंची तेथे हजेरी. या छोटेखानी उपहारगृहात चर्चगेटला कार्यालय असतांना कैक वेळा जाणे व्हायचे किंवा रजेच्या दिवशी कामावर असतांना येथुन खाणे मागवले जायचे.
आज पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा. एक डोसा दोघां मिळुन खाल्ला पण पोट नाही भरले मग गाडी दुसरीकडे वळली. ह्या "शिवसागर" च्या समोरच एक बहावचे झाड आहे. बहरायला अजुन अवकाश दिसतोय.
मग येथुन "गेलॉड " च्या केक शॉप मधे. असेच काहीतरी खायला. ह्यांचे केक मस्त असतात जे घरातील जवळजवळ प्रत्येक वाढदिवसाला कापले गेले आहेत. यांचे ब्रेड ही चांगले असतात. बाहेर बसुन खाण्यासाठी चांगली व्यवस्था आहे. ह्यांच्या आतल्या रेस्टॉरंट मधे का कोण जाणे पण राजाभाऊ एकदाच गेले होते. परत एकदा कधीतरी जायला हवे.
Sunday, March 27, 2022
नगावर आंबे घेण्याचे वेळ आली आहे
अच्छे दिवस आले आहेत असे म्हणणॆ कठीण आहे. राजाभाऊ, आब्यांच्या पाट्या आता विसरा, डझन विसरुन जा.
नगावर आंबे घेण्याचे वेळ आली आहे.
रगडा आणि पॅटीस
राजभाऊंनी आज अगदी विचार केला पक्का.
नेहमी नेहमी, सतत आपण त्यांनाच का निवडत असतो ? बास झाले हे आता. कंटाळा आला. दुसऱ्या कोणत्यातरी पर्यायाचा विचार केला पाहिजे. काही तरी नवीन पाहिजे.
आता बदल घडवुन आणायचाय आणायचा हा निर्धार करुन मग राजाभाऊ आज रात्री पोचले कुलाब्याच्या "सुफरा " मधे , आखाती देशांचे खाणे खाण्यासाठी.
हं.
आपण नविन निवड केली खरी पण ती महाग नाही ना पडणार या विचाराने, शंकेने त्यांचे मन डोलायमान झाले. त्यांनी आपला विचार बदलला.अरे गड्या आपुले जुने तेच बरे करत मग ते पोचले कुलाब्याच्या "कैलाश पर्बत "मधे, रगडा आणि पॅटीसच्याी युतीची चव घेण्यासाठी.
खातांना मग त्यांना कळुन चुकले, आता बदल हा हवाच, हाच आपला निर्णय किती योग्य होता तो. जुन्यामधे आता पुर्वीसारखा दम नाही राहिला. रगडा तर नकोसा झाला होता.
तरी त्यांना त्यांच्या एका स्नेह्यांनी येथल्या दर्ज्याबद्दल सावध केले होते. पण केवळ "जुन्या काळासाठी " तरी , एकदा तरी येथे खाण्यास जावुया केवळ हाच विचार तेथे राजाभाऊंना घेवुन गेला होता.
Repost.
Saturday, March 26, 2022
कॉपर चिमणी
तसं बघायला गेलं तर हे कधी कधी अगदी गरजेची बनलेली असते. केव्हा केव्हा जेष्ठांना पुढच्या पिढीला कधीतरी दणका द्यावा लागतो, दाखवुन द्यावे लागते की खरा बॉस कोण आहे ते. दाखवुन द्यावे लागते मी जरी आता आजोबा झालो असलो तरी या पेढीचा मीच मुळपुरुष आहे. मग आज राजाभाऊंनी निक्षुन सांगितले ,मला हीच जागा हवी, ह्याच जागेची मी केलेली निवड सर्वांनी मान्य करायला हवी.
हे असे कडक बोलणे ऐकुन सारे कसे सुतासारखे सरळ आले आणि राजाभाऊंच्या आवडीच्या जागी, वरळीच्या कॉपर चिमणी मधे आज रात्री जेवायला गेले.
मकई मलाई शीक कबाब, चिकन कालीमिर्च कबाब, चिकन बिर्याणी वर ताव मारतांना ह्या पोरांची कुजबुज राजाभाऊंच्या कानी आले व मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला, ह्या मुलांनी आपल्याला बनवले, मस्त युक्ती लढवली व आपल्याला याच जागेची निवड करणे भाग पाडले, ह्यांनी आपल्याला असे काय दाखवुन दिले की ही निवड जणु तुमचीच आहे..
ठिक आहे. फारसा फरक पडलेला नाही. आपल्याला काय दम आलु आणि काबुली नान खाण्याशी मतलब. ह्या खाण्याने आपले मन जिंकले ना मग बास झाले.
मग वरती बोनस म्हणुन "मुच्छड पानवाला " कडचे मघई.
न्यू पूणा बेकरी कॅफे
आता या वयात तरुणां विरुद्ध बंड करण्याची ताकद नाही राहिली.
ते जे म्हणतील तेच खरे, त्यांनी जी जागा सांगीतली त्या जागेचा मुकाट्याने स्विकार करायचा करायचा हे सुत्र एकदा का पचनी पडले की मग त्यात फायदा तर आपला सुद्धा आहे हे ध्यानी येते.
शनिवारी रात्री "आशा डायनींग हॉल " मधे जेवायला जाण्याचा आपला आदेश राजाभाऊंनी गुपचुप मागे घेतला व ते तरुणांबरोबर "न्यू पूणे बेकरी कॅफे " मधे मुकाट्याने खायला गेले.
त्यांना चक्क तेथला माहोल, तेथले खाणे फार भावुन गेले.
मग त्यांनी ठरवले. नव्यांचे ऐकण्यात आपलीच भलाई आहे. मग परत त्यांचे तेथे रविवारी संध्याकाळी जाणॆ झाले.
न्यू पूणा बेकरी कॅफे, आनंद नगर जवळ, सिंहगड रोड.
Wednesday, March 23, 2022
सयाजी
आपलं सरत वय लक्षात न घेता केला जाणारा एका विशिष्ट जागेचा अट्टाहास, दुराग्रह. मग लहानांचे न ऐकता आपले तेच म्हणणे रेटुन नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर काय होते ते सध्या राजाभाऊंच्या डोळ्यासमोर आहेच आणि केवळ त्यामुळेच, त्यापोटीच त्यांनी देहुरोड वरच्या "इंद्रायणी ढाबा " मधे जेवणाचा आपला आग्रह जास्त ताणला नाही.
आत गेल्यानंतर आणि जागा मिळल्यानंतरही पुतणीच्या नाराजगीकडे काही काळ राजाभाऊंनी दुर्लक्ष केलं खरे पण मग त्यांच्या लक्षात आले की हे वागणे बरे नव्हे. कोणावरतीही आपल्यालाच पाहिजे त्याच जागेची सक्ती करु नये.
मग ते तेथुन उठले आणि "सयाजी" मधे, जे पहिल्या पासुन राजाभाऊंच्या आवडीचे आहे, जेथे ते सुरु झाल्यापासुन जेवायला जातात त्या आपल्या नेहमीच्या जागी जेवायला गेले. उत्तम जेवण, इतरांच्या मानाने तसे स्वस्त, आणि वर मिळणारी किंमतीमधे सुट,
ही जागा आपली सेफ.
मक्याचे कणीस.
मक्याचे कणीस.
अश्या प्रकारे केलेले मक्याचे दाणे फार छान लागतात.
आधी सालासकट भाजतात. मग सालं काढुन भाजतात. दाणे काढुन त्यावर मसाले भुरभुरले जातात, लिंबु पिळले जाते, मस्का टाकला जातो.
गरमागरम खायला खुप मजा येते.
प्रकाश दुग्ध मंदिर
हं.
भल्या सकाळी गेलेले राजाभाऊ "प्रकाश दुग्ध मंदिर " मधे गेले नाहीत.
राजाभाऊंनी दही मिसळ खाल्ली नाही
आणि
राजाभाऊ अजीब्बात पियुष प्याले नाहीत.
Thursday, March 17, 2022
तेलपोळी
कालपर्यंत "विनायक केशव आणि कं " वाल्यांना नक्की वाटत असणार हा मनुष्य वेडाबिडा आहे की काय ? सकाळी पुरणपोळ्या खायला येतो , दुपारी पुरणपोळ्या खायला येतो.
आज मात्र त्यांची खात्रीच पटली असणार. दुकानाचे शटर उघडण्याआधीच ?
गरमगरम पुरणपोळ्यांच्या नादात तेलपोळी राजाभाऊ विसरुनच गेले होते.
Rang Barse Sweet Potato Kheer
#MyHoliFeast
#CelebrateWithMilkmaid Collaboration
Add
colour to your diners' experience with tasty Holi dishes on the festival of
colours. Holi is a time for eating delicious food and exchanging sweets and
presents, in addition to covering each other with vibrant colours. And on this
Holi, I have decided something different i.e.
Rang
Barse Sweet Potato Kheer
Ingredients –
2-Sweet
potato, 6-Chopped Almonds, 6-Chopped
Cashew, 200gms Nestlé MILKMAID, 2 Cup Milk, 6-7 Saffron threads, , Charoli ,
Cardamom powder.
Recipe –
·
Peel and
cut sweet potato in small pieces.
·
Add milk
and cook in Pressure Cooker till 3 whistles.
·
Smash the
Sweet Potato and add 200 gms Nestlé MILKMAID and boil for 2 minutes.
·
Add
Almonds, Saffron threads, Charoli and Cardamom
powder
· Garnish with Rose petals, almond, & Cashew.
Kheer is
ready for the Festival of Colours with lovely, vibrant colours.
I can use all the colourful ingredients I wish and not even feel guilty about it! My sweet tooth is going to be very happy this Holi! Can't wait.