Sunday, November 30, 2008

बेशरमपणाचा कळस.

" २६ नोव्हेंबर हा दरवर्षी "संविधान दिवस " म्हणुन पाळला जावा असा ठराव केल्याबद्द्ल महाराष्ट्र सरकारचे हार्दीक अभिनंदन "

आज माहिम कॉजवेला एक महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करणारा वरील मजकुर लिहीलेला फलक पाहिला.

मग त्यावर सर्व कॉगेसी नेत्यांचे झळकणारे फोटॊ.

काय टाळक वगैरे फिरलय का हा अश्याप्रकारचा फलक झळकवणाऱ्या तथाकथीत नेत्याचे ?

Friday, November 28, 2008

झाले सुरु झाले, प्रेतांच्या टाळुवरचे लोणी खाणे सुरु झाले.

सुरु झाले, राजस्थान मधल्या निवडणुकीत दहशतवादावरुन मते मागायला सुरवात झाली. आत्ताच NDTV वर या संबंधी सध्याच्या मुखमंत्रांची मते मागणारी जाहीरात पाहिली. केंद्रिय सरकारला दहशतवादाचा बिमोड करण्यात आलेले अपयश, मग आम्हाला निवडुन द्या अश्या अर्थाची ही जाहीरात.

जगातील कोणतेही राष्ट्र या दहशतवाद्यांचा संपुर्णपणॆ नायनाट करण्यास यशस्वी झालेले नाही. अगदी इस्रायल सारख्या देशातही कडाक्याचा बंदोबस्त असुन देखील कुठेतरी घायपाताची घटना घडत असतात.
यांचे राज्य असले तरी.

थोडातरी या नेते मंडळींनी धीर धरावा, मुंबईमधली जखम अजुन भळभळतेय.

दहशतवादाचा निषेध





Thursday, November 27, 2008

शुक्र , गुरु आणि चंद्राची युती.

आकाशात एक अद्भुत नाट्य रंगत चालले आहे. या नाट्याचा क्लायमेक्स आहे सोमवारी संध्याकाळी, १ डिसेंबरला. 
 
या वेळी तेजस्वी शुक्र, गुरु आणि चवथीच्या चंद्राची कोर अगदी जवळ येणार आहे. 

हे मनोरम्य दृष्य पाहायला विसरु नका. 
 
गेले कित्येक दिवस मी आकाश निरिक्षण करतांना हा खेळ न्याहळतोय, नैक्रुत्य दिशेला ( दक्षिण-पश्चिम ) सायंकाळी शुक्र व गुरु एकामेकांजवळ येत चालले आहेत, त्यांच्यातले अंतर दिवसेंदिवस खुप कमी होत चालले आहे, या त्यांच्या खेळात त्यांच्या साथीला सोमवारी चंद्र येवुन मिळणार आहे.
 
सायंकाळी साडेसहानंतर ते रात्री ९.३० पर्यंत चंद्र, शुक्राची कडकडुन गळाभेट घ्यायला जाण्यासाठी त्याच्या जवळ सरकत जाणार आहे. 
 
ही मोलाची माहिती मला दिल्याबद्दल माझे स्नेही व या क्षेत्रातील जेष्ठ , अधिकारी व्यक्ती श्री. सुरेश परांजपे यांचे धन्यवाद. त्यांचे  आग्रहाचे सांगणे आहे, रात्री एकाद्या तलावाच्या काठी जावुन हे अदभुत दृश्य पहा, पाण्यात पडणाऱ्या या ग्रहांच्या प्रतिबिंबाने मोहवुन जाल.      

मुंबईमधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्लाचा तिव्र निषेध.

अश्या प्रकारचे मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करुन या भरकटलेल्या लोकांना काय मिळते ? 

यातुन काय साधते ?

या परिस्थीतीत सर्वांनी संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. कृपया करुन अफवा फैलावु नकात, आपल्या चर्चा भलतीकडे भरकट जावुन देवु नकात. या प्रसंगाचे कृपया करुन राजकारण करु नका, देशावरील या हल्लाचा संर्वांनी मिळुन मुकाबला करण्याची गरज आहे.

चॅनलवाल्यांनी ही दहशतवाद्यांना देण्यात असलेल्या चोवीस तास प्रसिद्धीस आवर घालावे. याने त्यांचे उद्दिष्ट सफल होत चालले आहे. 

यात मृत्यृ पावलेल्यांच्या नातलगांचे जे जवळचा माणुस हरपल्याने नुकसान झाले आहे त्याची कल्पनाही करवत नाही.

Wednesday, November 26, 2008

अग्नीपरिक्षा - २१ व्या शतकात १२ व्या दशकातील अमानुष वागणुक.

पुण्यामधे अग्नीपरीक्षा म्हणुन चार महिलांना उकळत्या तेलात हात घालायला लावणाऱ्या अमानुष घटने बद्द्ल वाचुन चीड आली. आपली अजुनही मानसीकता बदलत नाहीय ? त्या चार महिलांना उकळत्या तेलात हात घालायला लावण्याचे गुन्हेगारांना साहस होतेच कसे. आणि त्या बायका पण येवढ्या मुर्ख कश्या ? आधीच त्यांना पोलीसांची मदत घेता आली नाही ? 
 
या अंधश्रद्धेविरोधी गेले कित्येक वर्षे श्री.नरेंद्र दाभोळकर आणि अंधश्रद्धा समिती कार्य करीत आहेत पण त्यांना गंभीरपणे घेण्यास कोणीच तयार नाही, अगदी राज्य सरकार देखील, अन्यथा या अंधश्रद्धेविरोधी कायदा असाच पास करुन घेण्यासाठी रेंगाळत ठेवला गेला नसता.  
 
या समितीने काढलेल्या पुस्तकामधे हाच प्रसंग दिला आहे. 

गरम उकळत्या तेलात तिने हात घातला पण तिचा हात भाजला नाही, कारण  त्या बाईने उकळण्याआधी तेलात भरपुर लिंबाचा रस मिसळला होता व ते तेल गरम करायला ठेवले. उकळल्यावर गरम तेलात तिने हात घातला, 

जे उकळल्यासारखे वाटत होते तो होता लिंबाचा रस ज्याचा तापमानबिंदु कमी आहे. 
आरोपींना कायद्याने शिक्षा होईल (?) पण जो घाव त्या चार बायकांच्या मनावर झाला आहे त्याचे काय ?    
 
http://www.esakal.com/features/261108/pne_superstition_1/index.html

मंगळसूत्र चोरले नाही हे सिद्ध करण्यासाठी विमाननगर येथील देवकर वस्तीत ता. २३ नोव्हेंबर रोजी चार महिलांना "अग्निपरीक्षा' द्यावी लागली आहे. या चौघींना कढईतील गरम तेलात हात घालण्यास भाग पाडणाऱ्या सासू-सुनेला विमानतळ पोलिसांनी अटक केली.

Tuesday, November 25, 2008

श्री.शशांक मक्तेदार यांचे गाणॆ

शशांक मक्तेदार यांचे सुश्राव गायन ऐकण्याचा अखेर काल योग जुळुन आला. पं. फार वर्षापुर्वी उल्हासजी कशाळकरांच्या साथीला मागे तंबोऱ्यावर असतांना मी त्यांच्या गाण्याची एक झलक अनुभवली होती. काल कै. पं. महादेवबुवा गंधे यांच्या स्मॄतीदिनानिम्मीत्ते श्री.शशांक मक्तेदार यांचे गाणॆ एस.एम.जोशी सभागॄहात आयोजीत केले होते.

पण एक गोष्ट मी विसरलो. स्मॄतीदिन असल्यामुळे त्यासंबधी होणारी भाषणॆ. जवळ जवळ तास भर त्यात गेला, मग तंबोरे जुळवणॆ वगैरे. जसजसा वेळ जात चालला तसतसा मग माझा गाणॆ ऐकण्याचा उत्साह नाहीसा होत जेला. जेमतेम ३०-३५ मिनीटे ऐकले, पण त्यात मन नव्हते. 

सतत एक प्रसंग आठवत राहीला. अश्याच प्रकारच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. वक्ते होते तत्कालीन म.न.पा आयुक्त श्री शरद काळे. त्यांना संयोजकांनी दोन शब्द बोलण्याची विनंती केली.

श्री.शरद काळॆ यांनी आपले भाषण सुरु केले.

" मला ठावुक आहे आपण गाणे ऐकायला आला आहात. आपण आणि गाणे यामधे मी ऐवु इच्छीत नाही. धन्यवाद "

गाणे सुरु झाले लगेचच. 


Monday, November 24, 2008

तन्मयता

गुरुवर्य श्रीमती राजश्री शिर्के आपल्या अप्रतीम झालेल्या कार्यक्रमानंतर, एका नवीन प्रयोगानंतर त्यासंबधी "हंस" ला सांगतांना 

Sunday, November 23, 2008

रंग ना डारो श्यामजी

राजाभाऊ अर्धे आयुष्य फुकट गेले म्हणायचे तुमचे.  सौ. मंजीरी असनारे केळकर यांचे गाणे उभ्या आयुष्यात एक्दाच ऐकलेत.  शक्य असुन देखील गाण्याला गेले नाहीत. तुमच्या सारखे दुर्दैवी तुम्हीच.

आज त्यांच्या वेबसाईट वर सोहोनी , कुमारजींचा राग सोहोनी नव्याने ऐकला. 

www.manjiriasanare-kelkar.com

बढीया.    

Deepak Raja's world of Hindustani Music: Manjiri Asnare Kelkar – “The concert is still the real thing”

जब जब फुल खिले तुझे याद किया हमने


दिल तोडा हरबार

कथ्थक - नेहा

दोस्ताना आणि "मेरे हम-नफस मेरे हमनवा मुझे दोस्त बनके दगा न दे"


२० वर्षाच्या प्रदीर्घ अनुभबानेही शहाणे होतील तर ते राजाभाऊ कसले ? आपल्या  बायकोला खुष करण्यासाठी काय आणि किती किंमत मोजावी लागते हे का त्यांना ठावुक नाही ? कोणत्या गोरज मुहुर्तावर त्यांनी बायकोला चित्रपट दाखवायला नेण्याचे कबुल केले देव जाणॆ ? ( तसे लग्न झाल्यापासुन आता पर्यंत फक्त दोन-तीनच पाहीले असावेत तरी पण ).  कबुल केले तर केले आणि तो पण कोणाता तर "दोस्ताना" पहायचे , जॉन भाय चा, प्रियांकाचा दोस्ताना ! 
 
अरे देवा, नारायणा, तुलाच माझी काळजी. भोगा आपली कर्माची फळे, एक तर हिंदी चित्रपट हा आपला प्रांत नव्हे त्यात परत दोस्ताना ?
 
इतक्या वर्षात महागाई व तिकीटाचे दर येवढे भडकले असतील याची जरा देखील कल्पना असती तर ? त्यात परत मेट्रो चित्रपटगृहात. गेली एक लाल नोट गेली,  कशासाठी तर  जॉन भाईच्या उघडया देहाचा दर्शनासाठी. आता पर्यंत हिंदी सिनेमात राजकपुर पासुन अनेकांनी पुरुषांच्या भावना चाळवण्यासाठी काय काय केले असेल , पण आता जमाना बदललाय हे मात्र खरे. 
 
 
पण एकंदरीत थेटर मधे मोजकेच लोक बघुन आता आपल्याला काय बोरींग पहायला लागणार आहे याची कल्पना आली होतीच. उघडया देहांचे दर्शन पाहुन पाहुन माणुस किती पाहील ?   बऱ्याच वेळा मला प्रश्न पडतो करोडो रुपये खर्च करुन हे सिनेमे काढतात , पण जरासे पैसे देवुन स्टोरी का बर लिहुन घेत नाही. र ला ट, ट ला प जोडला की झाले ? इकडुन तिकडुन कसेतरी तीन तास भरले पाहीजेत ना.  त्यात परत असे खोटे बोलुन "गे" असल्याचे सोंग घेणे ही कल्पना एका आंग्लभाषीक चित्रपटातील असल्याचे मधुन मधुन आठवत राहीले.  एक तर ठिगळे लावल्यासारखी इतर पात्रे, विनोद निर्मीतीचा ओढुन ताणुन केलेला प्रयत्न.  बोमन इराणीचे पात्र आल्यानंतर वाटले होते, चला आता तरी सिनेमा गती पकडेल , पण नाही संथ गती काय तो सोडायला तयार नाही, बायकोच्या क्षोमापासुन वाचायला माणासाने जांभया किती वेळ दाबुन धरायच्या ? 
 
बाहेर पडलो ते बेगम अख़्तरनी गायलेली गझल गुणगुणत. 

मेरे हम-नफस मेरे हमनवा मुझे दोस्त बनके दगा न दे ! मै हुं दर्दे-इश्कसे जा-बलब मुझे जिंदगीकी की दुवा न दे !! 
 
काय करणार शुद्ध व्हायचे होते ना. 
 
परत हा खर्चाचा सुरु झालेला सिलसीला तेवढ्यापुरताच मर्यादीत राहीला असता तर ? बाहेर खाणे झाले हे तर होतेच पण आपल्या बायकोसाठी आपल्या बापाने केलेला खर्च अर्थातच चिरंजीवांच्या पचनी पडण्यासारखा नव्हताच, त्यानी आपली किंमत वसुल करायची ती केलीच. त्याच्या ही लॉग पेंडीग डिमांड्स होत्याच ना. 
 
एकंदरीत काय तर बायकोला खुष करण्याचा प्रयत्न करु नये हेच खरे. 
 
 

चला प्रवासाला फुलांच्या देशात




आपल्या भारताला "बराक ओबामा" केव्हा मिळणार ?

काल चतुरंग, लोकसत्ता मधे " ओसामा ते ओबामा " हा अमेरीकचे नवीन अध्यक्ष बराक ओसामा यांच्यावर लिहीलेला उत्कृष्ट लेख वाचला.
 

वाचल्या नंतर मनात पहिला विचार आला की आपल्या भारताला "बराक ओबामा" केव्हा मिळणार ?
 
आपल्याला आपल्या वयोवॄद्ध, कालबाह्य विचार झालेल्या नेत्यांऐवजी नव्या पिढीचा नेता केव्हा लाभणार ? त्यांनी जरा विश्रांती घ्यावी की आता.  
 
आपले नेते अजुनही पुरातन मानसीकतेतुन बाहेर पडायला मागतच नाहीत का ? 

गेली १५-२० वेर्षे जो सत्तेसाठी  धर्माचा मुद्दा सापडला आहे त्या पलीकडे जायलाच तयारच नाहीत का ? की त्याहुन पुढचा  विचार करण्याची क्षमता हरवुन बसले आहेत ?  

कस व्हायच ?

दुधाचा झाला खवा, खव्याचा झाला कोळसा. बायकोशिवायचा दिवस पहिला. कस व्हायच ? 

बटाटी घ्यायची, ती कुकरमधे ठेवायची, ती बुडतील ऐवढे पाणी घालायचे, झाकण असे  बंद करायचे, चार शिट्या घ्यायच्या .
 
ही झाली थियरी !
 
पण ?

आयुष्य खुपच खडतर आहे म्हणायचे . 
 
 
 
 
 

Saturday, November 22, 2008

संजय दत्त आणि Hindustan Times , Leadership Summit




हिदुस्थान टाईम्सनी आयोजीत केलेल्या लीडरशीप समीट मधे भारतचे पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनीया गांधी, यांच्यापासुन टोनी ब्लेयर, चंद्रकांत भावे, विजय मल्ला, लालकृष्ण अडवाणी, नरेश गोयल, आसीफ अली झरदारी अश्या अनेक नामवंताच्या पंक्तीत संजय दत्त ?




हाच ना तो जो काही वर्षे गंभीर गुन्हासाठी, तुरुंगात होता आणि अजुनही त्याच्या वर न्यायालयात खटले चालु आहेत ?

Saturday, November 15, 2008

गारगोटी संग्रहालय - सिन्नर

Attitude that matters

मी अगदी मरमरेस्तोपर काम करतो पण कोणालाच माझी कदर नाही किंवा मी नुसतीच गद्धामजुरी  करुन राहीलोय, आहे तिथेच आहे, किंवा मी किती कामाचे डोंगर उपसतो , माझासारखी, माझ्या एवढी कामे कोणीच करत नाही तरी पण इतर माझ्या पुढे निघुन गेले. खर सांगतो माझ्यासारखी मेहनत कोणीच करत नाही. 
 
असे डायलॉग अवतीभवती बऱ्याच वेळा ऐकु येतात. हे सारे "त्या" निराशापोटी आलेले असतात.
 
अश्या वेळी खरी गरज असते ते आपले आपणच प्रामाणीकपणॆ मुल्यमापन करण्याची. आपली क्षमता प्रामाणीकपणे जोखण्याची. आपल्या मर्यादा जाणुन घेण्याची. स्वत: विषयी अवाजवी अपेक्षा न बाळगण्याची. 
 
बऱ्याच वेळा आपली आपल्या बद्दल अवाजवी कल्पना असतात. पुढे जाण्यासाठी आपण खरोखरीचे प्रयत्न केलेले नसतात. आपला अट्यीटुड योग्य असतोच असे नाही. आपण किती कामे  करतो यापेक्षा ती कशी करतो याला जास्त महत्व असते. 
 
आपण आपल्या स्वत:ला काळा बरोबर ठेवण्यासाठी आपल्या कार्यशैलीत सुधारणा घडवुन आणल्या आहेत काय ? नवीन काही शिकले आहात काय ? अनेक प्रश्न आपण आपल्याला विचारायला हवेत. निराशेच्या त्यात त्यात गर्तेत न सापडता जर आपण आपल्या दृष्टीकोन बदलला तर खुपच फरक पडत असतो. पहाडा सारखी वाटणारी कामे आता अगदीच नगण्य वाटायला लागतात.  
 
 

जय गुरुदेव सतयुग आयेगा

अगदी काही वर्षापुर्वी गुरुदेवांच्या भोळ्याभाबड्या , खरोखरीच सतयुग यावे या प्रामाणीक इच्छेने प्रेरीत झालेल्या शिष्यांनी मुंबईमधील रस्तावरील भिंतीवर रंगवलेल्या "जय गुरुदेव सतयुग आयेगा" या घोषणा  वाचायला मिळायच्या. त्या वाचणाऱ्याच्याही मनात यायचे "जर हे कलीयुग जावुन सतयुग आले तर किती बरे होईल." 

पण मला वाटते गुरुदेवांच्या निधनानंतर हे लिहणे बंद पडले. 

किंवा कदाचीत त्यांना जाणवले असेल, जो पर्यंत आपला समाज धर्म, जात्तपात, भाषा , प्रांत आदी संकुचीत  मानवनिर्मीत विचारांनी विभागला गेला आहे, या मधली दरी रुंदावण्याचे काम स्वार्थी विचारांनी प्रेरीत झालेले  आपले राजकारणी अगदी जोमात करत रहाणार आहेत तो पर्यंत हे दि्व्यस्वप्नच रहाणार आहे. 


काल श्री. विवेक पटवर्धन यांच्या ब्लॉग वर त्यांच्या स्नेह्याला दंगलीत मिळालेल्या अमानुष वागणुकीबद्द्ल वाचले. खुप अस्वस्थ करणारा का लेख. संपुर्ण देशाला मान खाली घालायला लावणारा हा कालखंड. 


केवळ अत्याचार करणारेच नव्हे तर संपुर्ण सुबुद्द समाज आज दंगलपिडी्तांच्या डोळ्याला डोळा देवु शकत नाही.   

 
  

Friday, November 14, 2008

VIVEK-UVAACH: Look into my eyes and say I am not guilty!

VIVEK-UVAACH: Look into my eyes and say I am not guilty!

Happy Children's Day

TWO SISTERS

Once there were two sisters.
One was a bad girl and one was a good girl.
One day they were sitting near a mango tree.
As they both loved mangoes, bad girl said “I want to pluck the mangoes for us”.
The good girl said “No, Please don’t pluck the mangoes”.
When their father came, the bad sister asked the father “why should we not pluck the mangoes from this tree”.
Their father said “because this tree does not belong to us”.

Moral of the story


We should not take other’s things without their permission.

- As written by Sampada , my little princess

Wednesday, November 12, 2008

केवळ जरासे जेमतेम बुड टेकवण्यापुरतेच


नवीन बसथांबा , नवीन रचना. दिसायला मस्त .
जरासा गैरसोइचा, फक्त सहा इंची बैठक, केवळ जरासे जेमतेम बुड टेकवण्यापुरतीच , त्यात तो पाठीस पुढे ढकलणारा दांडा .

Sunday, November 09, 2008

तिटकारा


तिटकारा येतोय , कीव वाटते , या थराला जाणारी माणसे पाहुनकेवळ पैशासाठी , केवळ आपल्या शो साठी , केवळ आपल्या चँनालाची लोकप्रियता वाढावी या साठी अन्नाचा हा असा अपमान ?

संडासाच्या भांड़्यात, कमोड मधे अन्न भरून त्यात डोके खुपसून त्याला हात लावता खायचे, गमबुटावर अन्न टाकुन ते जिभेनी चाटुन पुसुन , बुट साफ होईपर्यंत खात रहायचे
चीड येते
What nonsence - Do you have brains. (As added by my 8 years old niece, Sampada )

संगणक भत्ता

८० च्या दशकात संगणकीय युग सुरु झाले होते ,पण संगणक वापरायला मिळायचे नाहीत.

कारण एकच , कामगार संघटनेचा विरोध.
आताच्या नव्या पिढीला सांगीतले तर आश्चर्य वाटेल कारण त्या वेळी कामगार संघटनेने संगणक वापरण्यासाठी "संगणक भत्ता " मागीतला होता.
त्या वेळी "ग्रीन शीट" वर कामे केली जायची Manually.

स्वच्छ्ता मोहिम, दै सकाळला लिहिलेले पत्र

प्रिय श्री यमाजी मालकर यांसी,

सप्रेम नमस्कार,

आपण लिहीलेला डेटलाईन मध्ये "१६८ पैकी १ तास द्या; आणि मग बोला॥" हा लेख वाचला।

आपण योग्य तेच लिहिले आहेत। सकाळने परीसरस्वच्छता हा एक फार चांगला उपक्रम हाती घेतला आहे। पण आता पर्यंत काढलेल्या अनेक स्वच्छ्ता मोहिमा फसलेल्या आहेत कारण त्या लोकांसाठी काढलेल्या होत्या , लोकांनी नाही।

आपण रहात असलेले शहर, हा परीसर माझा आहे या भावनेने, तो परीसर दत्तक घेतला जावा, आपल्या अपत्याप्रमाणे त्याची काळजी घेतली जावी। शेवटी आपण हे सारे आपल्यासाठीच करत असतो.

केवळ नकारात्मक द्रुष्टीकोन ठेवत, ही कामे माझी नाहीत म्हणात, या नागरी समस्यांची सोडवण्यासाठी आपण अजुन किती दिवस सरकारी यंत्रणेवर अवलंबुन रहाणार आहोत? या यंत्रणेलाही काही मर्यादा आहेत. जर आपल्याला अस्वच्छता, वाहतुककोंडी, प्रदुषण यांचा त्रास होत असेल तर तो त्रास दुर करण्यासाठी, आपल्या मदतीला दुसरे येतील याची वाट न बघता, स्वःताला स्वःताच मदत करुन त्याचे निवारण करायला हवे. बहुतांशी या समस्या आपणच निर्माण केलेल्या असतात, आपले घर स्वच्छ केल्यानंतर तो केरकचरा ईतरांच्या दारात, रस्तावर, नाल्यात आपणच टाकलेला असतो. वेडीवाकडी वाहने चालवुन, शिस्त न पाळत आपणच वाहतुक कोंडी केलेली असते.

प्रत्येकाच्या मनात आपण काही तरी केले पाहीजे ही भावना असतेच असे नाही, ज्याच्या मनात असते त्यांना आपण नक्की काय करायला हवे त्याची माहीती नसते। मुळात अशी जाणीव सर्वांना करुन देणे महत्वाचे असते. आपण रहात असलेला परीसर अस्वच्छ्तेमुळे किती नरकासमान आहे, त्या मुळे रोगराई पसरली आहे, आपल्या मुलांना खेळण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी आपल्या परीसरात जागा नाही याची जेव्हा जाणिव होते तेव्हा लोकसहभागातुन परीसराचे रुपांतर नंदनवनात होण्यास वेळ लागत नाही. लोकांना ही जाणीव करुन द्यायची कोणी ?

सकाळ ने हे देवाचे काम तर हाती घेतलेले आहे, जागतीक पर्यावरण दिवसाचा मुहुर्त ही साजेसा आहे, आता गरज आहे ती म।न.पा. चे अधिकारी, नगरसेवक यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याची. त्यांनी लोकांमधे जावे, परीसरात लोक उपलब्ध असतील तेव्हा, रात्रीच्या वेळी, रजेच्या दिवशी स्थानीक पातळीवर सभा घ्याव्यात, त्यांचे मार्गदर्शन करुन मतपरीवर्तन करावे, त्यांना शपथ घ्यायला लावावी, लागल्यास स्थानीक पोलिस स्थानकाची मदत कायदा मोडणाऱ्यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी घ्यावी. कचरा रस्त्यावर टाकु नका हे सांगणे सोपे आहे, पण तो कोठे टाकावा या साठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तो घरात रोज दोन वेगळ्या कचऱ्याच्या डब्यात साठवला जावा, हिरवा डबा ओल्या कचऱ्यासाठी व लाल डबा सुक्या कचऱ्यासाठी. रोजच्यारोज ठरावीक वेळेस ओला कचरा गोळा केला जावा, सुका कचरा नेण्यासाठी कचरा वेचणाऱ्या कामगार संघटनेची मदत घेवुन, त्यांच्या माणसांना आपल्या परीसरात नेमुन, तो दिला जावा, जेणे करुन त्यांचे ही पोट भरेल.

एकदाच युद्धपातळीवर सारा परीसर नागरीकांनी मनपाच्या मदतीने, वेळप्रसंगी लोकवर्गणी काढुन साफ करावा, लोकांना शिस्त लागे पर्यंत गस्त घालावी, न ऐकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जावी, सुरवातीचे हे पथ्य सांभाळले की आपोआपच पुढचा मार्ग सोपा होतो, प्राथमीक गरज असते ती आयुष्यभर जोपासलेल्या वाईट सवयी मोडण्याची।

या सर्वासाठी गरज आहे ती १६८ पैकी १ तास देण्याची

Demagogue & Demogogy

राजाभाऊंनी शब्दकोष उघडला व दोन नवे शब्द शिकले - Demagogue & Demogogy ।
जनतेच्या भावना चेतविणारा राजकारणी व जनतेच्या भावना चेतविण्याची कला।
जर झुंडीला भावनाच नसत्या तर ?
Justify Full

Saturday, November 08, 2008

व्ही अनुराधा सिंग - कथ्थक

काल NCPA मधे कथ्थकचा एक मस्त कार्यक्रम पाहीला। भोपाल वरुन आलेल्या श्रीमती व्ही अनुराधा सिंग यांनी सर्वांना आपल्या न्रुत्याविष्काराने मंत्रमुघ्ध केले। राजगढ़ घराण्याचा नर्तकीने केलेले नृत्य मी पहिल्यांदाच पाहिले। खुप देर चालणारे footwork ची मजा काय औरच । जवळजवळ दिड तास त्यानी रसिकाना नादावुन ठेवले होते । या कार्यक्रमामाधे त्यांनी सुफी संतांच्या रचनेवर आधारित दोन नृत्य सादर केली। सुफी दरवेश ज्या प्रकारे नाचताना सतत गिरक्या घेत रहातात , त्याचा मुबलक वापर त्यांनी या सादरीकरणात केला। बढिया .खुप मजा आली

आज म्या सूर्योदय पाहिला


आणि मी पुणेकरांना हसत होतो


महाराष्ट टी डेपो च्या बाहेर चहा पावडर घेण्यासाठी पुणेकरांनी लावलेली रांग बघुन मी हसलो होतो।

आता शिवाजी पार्कला कुमार शर्ट्स च्या बाहेर शर्ट विकत घेण्यासाठी लावलेली रांग बहून माझे दात घशात गेले। परत कधी कोणाला हसणार नाही

राशी







Wednesday, November 05, 2008

चेहरे आणि मुखवटे

व्हेज आँलवेज


एखादे नवे रेष्टॉरंट शहरात उघडल्याची माहिती मिळाली की राजाभाऊ अस्वस्थ होवु लागतात , त्यातुनही श्री विलास गावकर यांनी बांधलेल्या "सिक्स्थ सेंस" या मॉल मधे उघडले आहे हे कळल्याची खोटी , लागलीच तेथे पोचले । पण फसगत झाली , त्या वेळी म.टा ने अतिउत्साहाच्या भरात चुकीची माहिती दिली होती , मॉलचे बांधकाम सुरु होते।

पण या वेळी मिळालेली ख़बर पक्की होती . मग काय दिवाळी पाड़व्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार जावुन धड़कले व्हेज आँलवेज। आतले वातावरण खुपच चांगले आहे।

पुतणीच्या मुळे जेवायला चायनीस पदार्थ मागवले। चव मस्त होती, जेवण खुप आवडले.

आता पुन्हा केव्हातरी परत एकदा जायला हवे.

कशासाठी ?


झेब्रा क्रासींग चे प्रयोजन कशासाठी ? मधले रेलिंग बघण्यासाठी की त्याला भोज्या करायला ? कुठे आणि कशासाठी झेब्रा क्रासींग हवे याचे तारतम्य बाळगायला नको ?
नाहीतरी आपल्या देशात पादचारीची सुरक्षा ही दुय्यम मानली जाते। त्यांच्या साठी धड़के सिग्नल्स देखील नसतात। रस्तावरुन विनाअडथळा वहाने सुसाट वेगाने धावली पाहिजेत , पादचारी काय कुठुनही कसेही अडथळ्याची शर्यत पार पाडत, कसरत करत आपला मार्ग आपणच शोधतील।

येवढ्या मोठाल्या पायात घालायला बुटही तसाच हवा





रास


Monday, November 03, 2008

शोँर्टकट स्वर्गाचे द्वार गाठी फटाफट

प्रत्येक वेळी तुम्ही सुदैवी असालच असे नाही , फलाटाच्या ऐवजी मिळावा वरचाच्या धक्का

समुद्रप्रवास


बरीच वर्षे लोटली असतील लाँचनी प्रवास करून। राजाभाऊनां स्वस्थ बसवेंना , आली सुरसुरी , बायको माहेराला गेल्याचे निम्मित्त साधले आणि राजाभाऊ निघाले जलाप्रवासाला। मु पो आवास व सासवणे।
मग काय भल्या पहाटे पोचले भाउच्या धक्याला , पहिली लाँच जरासाठी चुकली, मग प्रतिक्षा 6.45 च्या लाँचची,
बर झाले पहिली लाँच चुकली ती , या लाँचच्या सारंगाबरोबर चांगली दोस्ती झाली। त्यांच्या केबिन मधे बसुन कधी रेवासला पोचलो कळलच नाही। सोबत साथ होती ती समुद्रपक्षांची।

करमरकर शिल्पालय



किहीम जवळील सासवाणे या सुरेख गावातील करमरकरांची शिल्पे निवांत न्याहाळावी , आवास येथील समुद्र किनारी फेरफटका मारावा व जोगळेकरांच्या चविष्ट जेवानाचा पुन्हा एकदा आस्वाद घावा या शुद्ध हेतूने राजाभाऊ निघाले भटकंतीला , एकटेच।