Friday, November 30, 2007

सौ. नेने काकुंची जादु चालेल काय ?


जाब मधले "१, २.३,४ ,तेरा करु गिन गिन के इंतजार, आजा पिया आयी बहार", आणि सैलाब मधील "हमको आपका है इंतजार कोई लेके आये प्यार " ची मजा या "आजा नचले " मधे नसावी बुवा.

बंगळुर हवाई अड्डा.

आमच्या कड पुण्यात सहा आसनी रिक्षात बसल र बसल की प्रवासी लगेचच चालकाच्या माग तगादा लावायला सुरवात करतात, अगदी रिक्षा पुर्ण भरायची असली तरी, बोंबाबोंब सुरु, "चला की राव , किती उशीर होतोय , किती कमवाल ? अजुन किती भरायचे आहेत ? किती भराल ? चला, चला, सुटा आता. देणार पाच रुपय , वर रुबाब काय ? वर परत चारच रुपये घेतात तुम्ही काय पाच मागता ?
हीच माणस, विमानात बसल्याबसल्या पायलटबाबाला सांगतात काय ? "बाबारे ६.२० ची वेळ, सात वाजायला आले निघतोयस ना ! घरी बायकामुले वाट बघत असतील . चल ना रे . उशीर होतोय ! "
आपला प्रवाशी बस वाला उगीचच इंजीन चालु करुन ठेवतो, वाटते आता निघेल , आता निघेल , मग तो जरा पुढे बस नेतो, चला, सुटला एकदांचा, परत थांबतो, मग इकडुन तिकडुन प्रवासी गोळा करत निघतो, आतले कावतात, विमानही तसेच, आपले या इथुन त्या तिथुन हवाईअड्डावर फिरव फिरव फिरवतात, वाटत, आली आता आपली धावपट्टी आली, आता उडेल, मग उडेल," देरी की लिये माफी चाहते है कंट्रोल टॉवर की अनुमती न मिलनेके कारण"
उडल रे एकदांचे. हुश्श. बस, ट्रक मागे घेताना कंडक्टर, क्लीनर, हे मागे उभे राहुन "आन देन आन देव करत, गाडी वर थपडा मारत, ड्रायव्हर ला इशारा देतात, तो ड्रायव्हर पण मुंडक काचेतुन बाहेर काढत गाडी मागे घेतो. विमान मागे घेतांना हवाईसुंदरी खाली उतरते काय ?
मग आपल खाण पिण, ऐवढ्याशा जागेत केवढी कसरत करायला लागते!
मुंबईला विमान टच झाल, लगेचच तुंबलेल्या गडयांनी आपापले मोबाईल बाहेर काडुन स्विच ऑन करायला सुरवात केले. आत्ताच प्लेन लॅड झाल ,तासाभरात पोचतो.
एवढा वेळ "स्टे कनेक्टेड " नाही म्हणाजे काय ? हाउ हॉरीबल !

Thursday, November 29, 2007

एक्प्रेस वे वर पुण्याला जाताना थांबण्यासाठी बहाणा - १


एक्प्रेस वे वर पुण्याला जाताना थांबण्यासाठी बहाणा - १ भगत ताराचंद आणि डाल फ्राय , मके की रोटी, मुंगडाल हलवा, आल्हाददायक रात्र, सुखद गारवा, ती आणि मी.

या या या गंमत जंमत

आमचा विश्वासघात झालाय ! चिंतन आणि मननवाले अध्यक्ष गरजले. तुम्ही दिलेला शब्द मोडलात.

मग हळुच म्हणाले वा ! मज्जा आली असा खेळ खेळायला. परत करतायना विश्वासघात ? अस काय करता, कराना, प्लीज, एकदाच. मग आपण निवडणुक, निवडणुक खेळु.
मग त्यांनी सरकार स्थापन केले. परत विश्वासघात करुन घेण्यासाठी.
पण त्यांना कुठे ठावुक होते कोणती ही गोष्ट एकटी, एकटी मिळत नाही. मग त्यात बॅक मॅजीक आले, जारण मारण आले. ( हे माझे मत नव्हे. सिंहासनावरुन पाय उतार झालेल्यांचे हे थोर विचार )
अंधश्रद्दावाल्यांनो ऐकता आहात ना ? आपली भारताची घटना याबाबत कात म्हणते ?

Wednesday, November 28, 2007

मनोहर मंगल कार्यालयात - खाण्यासाठी . लग्नासाठी नव्हे.


डामडौल नसलेले, फुकटचा भपका नसलेले, पोटाला सोसेल असे, तरी पण रुचकर, चविष्ट , स्वादिष्ट, अश्या उपहारगॄहाच्या शोधात असतांना अचानक नजर गेली बाहेर झळकणाऱ्या पाटॊ वर, "अंबाडयाची भाजी व भाकरी ". आत डोकावुन बघितले ते पुढच्यावेळी नक्की येण्याचा पोटाला वायदा करुनच. ( खर म्हणजे अंबाडयाची भाजी हा प्रकार माझ्यासाठी परकिय )
कार्यक्रम संपल्यानंतर तॄप्त मनाला तॄप्त पोटाची साथ हवी या योग्य विचारांती आम्ही पोहोचलो, मनोहर मंगल कार्यालयाच्या आवारात असलेल्या साध्या, सोप्या, सरळ, उपहारगृहात, सफेद वाटाणा उसळ -भाकरी व ओल्या कांद्याच्या पातीची भाजी-भाकर खाण्यासाठी व ब्रांम्हणी पद्धतिची आमटी ओरपण्यासाठी. येथे ठराविक वारी पिठलेभाकरी ही मिळते.
सोबत थालीपिठ , इ. पण मिळते. स्मॄतीने धोका दिला. इतर पदार्थ आठवत नाहीत.


पुर्ण चंद्रमा गगन बिराजे



त्रिपुरी पोर्णिमेचा चांद.
तु चंदा शितल कहलाता फिर क्यु मेरे अंग जलाता !
फुलसा कोमल बाण मदनका शुल बनके तनमे क्यु चुभ जाता !

वाहे गुरु वाहे गुरु सतनाम वाहे गुरु




Sunday, November 25, 2007

मस्त सुरमई शाम व रात्र



"आमच्या घरात अजूनही पुरुषप्रधान संस्कृति आहे,

ती राणी आहे आणि मी प्रधान "


प्रसाद शिरगावकर आपला कविता वाचनाचा कार्यक्रम करत होते, खुले घरकुल लौंन, नभीत पूर्ण बहरालेला त्रिपुरी पौर्णीमेचा चंन्द्र, हवेत सुखद हवाहवासा गारवा, मदहोशी धुंदफुंद वातावरण, सोबतीला "ती " (राणी ) , वर परत सुरांची नशा ,


और क्या चाहिये जीने के लिए ?


डी.एस.के नी काल त्यांच्या परिवारातील लोकांसाठी सुरेख मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। खास मुंबई वरुन पुण्याला आलो ते या कार्यक्रमाचे निमित्त घेवुन, डी.एस.के वरील प्रेमापोटी ।

त्यात परत वहिनींचे ( डी.एस.के. यांच्या पत्नी ) एक नवे रूप पाहायला मिळाले। त्यांनी दोन सुरेल भावगीते गायली ।


बहार आली।

Friday, November 23, 2007

लुडबुड

आयुष्य सुरळीत सुरु असते, त्रासदायक काळ सरलेला असतो, अश्यावेळी मग त्रास होतो तो तुमच्या आयुष्यात अनाहुतपणे लुडबुड करणाऱ्यांचा,ढवळाढवळ करणाअऱ्यांचा, फुकटचे सल्ले देणाऱ्यांचा, संबध नसतांना सुद्धा नको तेथे नको त्या वेळी अनावश्यक शेरेबाजी करणाऱ्यांचा.
पर त्यात त्यांचा स्वःताचा परमस्वार्थ साधत असेल तर एक वेळ त्यांची भुमिका आपण समजुन घेवु शकतो . पण उगाचच ? केवळ गंमत म्हणुन ?
किंवा ....................
चुकी आपलीच असते, आपणच योग्य ते अंतर राखलेले नसते.
चिमुटभर मिठाची गरज असता भलत्याच प्रेमापोटी बचकाभर मीठ आपल्या तोडात कोंबले जाते. भीडभाड आपणच बाळगायची असते. का ?

Wednesday, November 21, 2007

अदनान सामी ,आपके लिये खास खुशखबर

प्राणायाम करायला सुरवात केल्या वर दोन दिवसात चक्क पाच किलो वजन कमी होवु शकते ?

या आधी म्हणे, डायटींग केले, फळांचा रस पिवुन राहीले , पण बाबा, कश्शाचा , कश्शाचा म्हणुन उपयोग झाला नाही, तुमच्या शिबिरात आले , दोन दिवसा पुर्वी ६४ किलो वजन होते , बाबा आज मी वजनाच्या काट्यावर उभी राहीले , विश्वास बसेना, पाच पाच वेळा चेक केले, बाबा, पाच किलो वजन प्राणायाम करुन कमी झाले.
असे वा ! काय म्हणाता ? ते पण दोन दिवसात ! वा वा, अजुन पाच दिवस शिबीर आहे। बघुया आणखी किती प्रगती होते ती !

धन्य हो, धन्य हो। नशीब माझे, शिबिर महिनाभर नाही , नाहीतर या वेगाने महिनाभरात वजन शुन्यावर पोचेल.

तेव्हा एक दिर्घ श्वास घ्या , १,२,३,४,५,६,७, आता सोडा.
दुनिया झुकती है रे , झुकती है !!

तुलशीबाईंच्या लग्नाला यायच बर का !

१५० वर्षापुर्वीची तोफ व नवा दारुगोळा, बारुद







सुमारे १५० वर्षापुर्वीची ही तोफ अगदी माझ्या घराजवळ सापडली, कोण जाणॆ कोणच्याच नजरेत ती इतकी वर्षे आली नव्हती , अगदी माझ्या सुद्धा. परवा TOI मधे वाचले तेव्हा कळले.


ADI नी हि तोफ आता लवकरच चोरटय़ांची नजर पडण्याआधी येथुन हलवायला हवी. नाहीतर कागदी घोडॆ नाचत राह्तील व तोफ मधल्यामधे गायब होईल.

भटक्या

" भटक्याची भ्रंमति " पोरकी झाली । आता रात्रीची मुबई कशी असते हे जाणून घेण्यासाठी कोणते सदर वाचायाचे ? समाजात जेव्हा जेव्हा गैरव्यवाहार होतात , जेथे जेथे होतात त्याचा प्रदाफाश करायला भटक्या सदैव हजर असायचा, आणि म्हणुनच मुंख्यमत्री अंतुले ना रात्रीची मुबई बघाविशी वाटली तेव्हा त्यांना भटक्याची आठवण झाली , वेश पालटून त्यानी भ्रंमति केली ।

प्रमोद नवलकर गेले। एका पर्वाची समाप्ति झाली । एक सदैव हसरे व्यक्तिमत्व नाहिसे झाले, नानानानी पार्क चा निर्माता , पार्क ला पोरका करून गेला ।

गिरगाव चौपाटी त्यांची नेहमीच आठवण काढेल, त्यांचा मुळेच ती साफ व सुंदर झाली

Tuesday, November 20, 2007

चकाचक मुंबई , स्वच्छता मोहीमा व महानगरपालिका.

आता प्रर्यंत बॄ. म.न.पा ने अनेक स्वच्छता मोहीमा हाती घेतल्या. सर्वच फसल्या. आता चकचक मुंबई ही खाजगी ठेकेदारांच्या मार्फत नवी मोहीम हाती घेतली आहे. अस्वच्घता करणाऱ्यांना मार्शल्स दंड करणार आहेत. तस बघयला गेले तर हा एक फार चांगला उपक्रम आहे म्हणायचा. पण तो किती दिवस टिकतो हे पहाणॆ महत्वाचे.
एक गोष्ट स्पष्ट आहे, ज्यात लोकसहभाग नाही त्या मोहीमा व्यर्थ आहेत. ही सारी तळमळ आपल्या अंतःकरणापासुन आली पाहीजे. अश्या गाजावाजा करत सुरु झालेल्या मोहिमा फक्‍त चार दिवस टिकतात, शहर आहे तसेच बकाल रहाते.
आपण रहात असलेले शहर, हा परीसर माझा आहे या भावनेने जेव्हा तो परिसर दत्तक घेतला जातो , आपल्या अपत्याप्रमाणे त्याची काळजी घेतली जाते ,तेव्हाच आपले शहर रहाण्यालायक होत असते. शेवटी आपण हे सारे आपल्यासाठीच करत असतो. आपल्या पुढील पिढी साठी करत असतो.

केवळ नकारात्मक द्रुष्टीकोन ठेवत, ही कामे माझी नाहीत म्हणात, या नागरी समस्यांची सोडवण्यासाठी आपण अजुन किती दिवस सरकारी यंत्रणेवर अवलंबुन रहाणार आहोत? या यंत्रणेलाही काही मर्यादा आहेत. जर आपल्याला अस्वच्छता, वाहतुककोंडी, प्रदुषण यांचा त्रास होत असेल तर तो त्रास दुर करण्यासाठी, आपल्या मदतीला दुसरे येतील याची वाट न बघता, स्वःताला स्वःताच मदत करुन त्याचे निवारण करायला हवे. बहुतांशी या समस्या आपणच निर्माण केलेल्या असतात, आपले घर स्वच्छ केल्यानंतर तो केरकचरा ईतरांच्या दारात, रस्तावर, नाल्यात आपणच टाकलेला असतो. वेडीवाकडी वाहने चालवुन, शिस्त न पाळत आपणच वाहतुक कोंडी केलेली असते.

प्रत्येकाच्या मनात आपण काही तरी केले पाहीजे ही भावना असतेच असे नाही, ज्याच्या मनात असते त्यांना आपण नक्की काय करायला हवे त्याची माहीती नसते. मुळात अशी जाणीव सर्वांना करुन देणे महत्वाचे असते. आपण रहात असलेला परीसर अस्वच्छ्तेमुळे किती नरकासमान आहे, त्या मुळे रोगराई पसरली आहे, आपल्या मुलांना खेळण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी आपल्या परीसरात जागा नाही याची जेव्हा जाणिव होते तेव्हा लोकसहभागातुन परीसराचे रुपांतर नंदनवनात होण्यास वेळ लागत नाही.
लोकांना ही जाणीव करुन द्यायची कोणी ?
आता गरज आहे ती म.न.पा. चे अधिकारी, नगरसेवक यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याची. त्यांनी लोकांमधे जावे, परीसरात लोक उपलब्ध असतील तेव्हा, रात्रीच्या वेळी, रजेच्या दिवशी स्थानीक पातळीवर सभा घ्याव्यात, त्यांचे मार्गदर्शन करुन मतपरीवर्तन करावे, त्यांना शपथ घ्यायला लावावी, लागल्यास स्थानीक पोलिस स्थानकाची मदत कायदा मोडणाऱ्यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी घ्यावी.
कचरा रस्त्यावर टाकु नका हे सांगणे सोपे आहे, पण तो कोठे टाकावा या साठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तो घरात रोज दोन वेगळ्या कचऱ्याच्या डब्यात साठवला जावा, हिरवा डबा ओल्या कचऱ्यासाठी व लाल डबा सुक्या कचऱ्यासाठी. रोजच्यारोज ठरावीक वेळेस ओला कचरा गोळा केला जावा, सुका कचरा नेण्यासाठी कचरा वेचणाऱ्या कामगार संघटनेची मदत घेवुन, त्यांच्या माणसांना आपल्या परीसरात नेमुन, तो दिला जावा, जेणे करुन त्यांचे ही पोट भरेल.

एकदाच युद्धपातळीवर सारा परीसर नागरीकांनी मनपाच्या मदतीने, वेळप्रसंगी लोकवर्गणी काढुन साफ करावा, लोकांना शिस्त लागे पर्यंत गस्त घालावी, न ऐकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जावी, सुरवातीचे हे पथ्य सांभाळले की आपोआपच पुढचा मार्ग सोपा होतो, प्राथमीक गरज असते ती आयुष्यभर जोपासलेल्या वाईट सवयी मोडण्याची.
ही जाणिव आम्हाला करुन दिली ती मुबंई महानगरपालीकेचे अधिकारी श्री. सुभाष दळवी यांनी. केवळ एका , फक्‍त एका सभेत, लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात घेतलेल्या सभेत, त्यांनी रहिवाश्यांचे मतपरिवर्तेन केले, आयुष्य भरच्या चुकीच्या सवयी केवळ एका रात्रीत सोडवल्या.
आम्ही रहात असलेल्या मुबंईतील एका परीसरातील, नरकासमान असलेल्या घरगल्ल्यांची (दोन ईमारतीतील मोकळी जागा, रहीवाश्यांची केरकचरा, घरात नको असण्याऱ्या सर्व वस्तु हक्काने खाली भिरकवण्याची जागा, त्यात भर पडते ती सांडपाण्याची, डासांची, घुशींची, ) जटिल समस्या लोकसहभागातुन पाच वर्षापुर्वी सोडवली व गेली पाच वर्षे त्या स्वच्छ अवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत.
या स्वच्छ्ता मोहीमेस आम्हाला मोलाचे मार्गदर्शन व मदत लाभली ती श्री. सुभाष दळवी यांची. या समस्येचा त्यांच्या कार्यालयीन कामाशी प्रत्यक्षात संबध नसतांना देखील केवळ आपले शहर स्वच्छ व्हावे या सद्दभावनेनी त्यांनी आम्हाला दिवसरात्र मदत केली. त्यांच्या बरोबर म.न.पा.च्या घनकचरा व ईतर विभागाने जी मोलाची मदत केली, केवळ त्या मुळेच आम्ही आज एका स्वच्छ परिसरात रहात आहोत.

Monday, November 19, 2007

कर्नाटकी नौटंकी.

लोकशाहीत लोकांचे , लोकांसाठी व लोकानी चालवलेले सरकार असायला हवे तर कर्नाटकात - स्वतःचे, स्वःतासाठी, स्वःतानी, चालवलेले सरकार होते.

गेले दोन तीन महिने कर्नाटकामधील राजकारण्यांनी लोकशाहीची जी थट्टामस्करी, गंमतजंमत चालवली आहे त्यास तोड नाही. देशाचे पंतप्रधान पद भुषवलेली व्यक्ती जेव्हा गल्लीत विधीशुन्य, विवेकहिन राजकारणांत रमते तेव्हा फक्त आपण हसायचे असते.

औटघटकेचे सरकार अखेर कोसळलेच. जे कोसळणारच होते ते स्थापन कशाला केले हा प्रश्न सामान्यांना पडावा, राजकारण्यांचे डावपेच , हिशोब सर्व वेगळॆच. कदाचीत पक्षाचा तेरा दिवस सरकार चालवण्याचा विक्रम मोडायचा असावा .

कदाचीत भाजपा व कॉंग्रेस या दोघांनी मिळुन एकत्र ऐवुन सरकार स्थापन कराण्याची वेळ आली असावी.

कर्नाटकी नौटंकी.

Sunday, November 18, 2007

चांद मातला मातला

"चांद मातला मातला " हे ऐकायला लोकांनी प्रत्येकी रु. २२३२ /- मोजले हे आज लोकसत्ता मधे पानभर आलेल्या लेखात वाचुन मला तर झीट यायची बाकी राहीली होती. ते सुद्धा कोजागीरी पोर्णीमेच्या रात्री आशा भोसलेंचा गाण्याच्या कार्यक्रमासाठी ? ( मला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो , हे तरुणाईत रमणारे वयोवुद्ध अजुन निवृत्त का बरे होत नसावेत ? तारुण्यातील आपण गायलेली गाणी या पंच्याहत्तरीत सुद्धा गाण्याचा भारी सोस असतो एकेकाला, त्यांना त्यांचा गळा साथ देतो ? का आपले पुर्वपुण्याईवर रेटत न्यायचे ? या वयात सीतारादेवींना व गोपिकृष्णांना कथ्थक नॄत्य करतांना मी बघितले आहे. (हे माझे वैयक्तीक मत आहे,) पण हा मुळ मुद्दा नाही ) , काय पैसा झालाय हो लोकांकडे ! हौसेला मोल नाही म्हणतात हे जरी खरे असले तरी हे येवढे मोठाले मोल ?

एक टिकीट रुपये. २२३२.०० ? ते पण पनवेलच्या स्वप्ननगरीत कोजागीरीच्या रात्री खुल्या मैदानात ( रात्री दहा नंतर खुल्या जागेत लाऊडस्पिकर लावायला हायकोर्टाने मनाई केली आहे ना ? ) आणि ते पण कार्यक्रम ऐकाण्या साठी ? धन्य ते आयोजक "सचिन ट्रॅवल्स " धन्य ते कलाकार आणि धन्य ते रसिक !. सर्वांना माझा मानाचा मुजरा. या कार्यक्रमाला पार पुणे, नाशीक , कोल्हापुर वरुन रसिक मंडळी आली होती म्हणे.

मग म्हणे हि जागा थातुरमातुर कारणे सांगत बदलली, बंदिस्त जागी कोजागिरी पोर्णिमा साजरी केली ,सर्व नियोजन ठिसाळ होते, महा प्रचंड गर्दी होती, बसीस वेळेवर आल्या नाहीत, बसण्याची योग्य व्यवस्था नाही, पुढच्या रांगेत बसण्यासाठी चोख पैसे मोजल्यांवर सर्वात मागे बसण्याची पाळी आली, ध्वनिक्षेपकांचे आवाज छातीवर डोल पिटल्यासारखे आढळत होते ! मनस्ताप, मनस्ताप आणि मनस्ताप.

अश्या कार्यक्रमाला जायचे किंवा नाही हे ज्याचे त्यानी ठरवायचे असते. मग फसगत, अपेक्षाभंग झाला तर रडायचे नाही. ते गॄहीत धरुनच जायचे,

Raga AhirBhairav-

सौ. सायली सत्यजीत तळवळकर


ज्ञानेश्वरांनी म्हटलय " मोगरा फुलला " ! आज सायली बहरलीय ! (निवेदीका )

सौ. सायली सत्यजीत तळवळकर यांचे फुललेले गाणे कानाने, मनाने ऐकण्याचा आज योग जुळुन आला.
निसर्ग, कलावंत, आणि कर्नाटक संघ आपल्याला भरभरुन देत असतात, आपणच करंटे. आपलेच हात थोटे.
काल माझ्या समोर धर्मसंकट उभे राहीले होते. आज पहाटे ६.३० वाजता "प्रातःस्वर, पु.ल.देशपांडे कला अकाडमीत श्री. कुमार मर्दूर यांचे गाणे होते व त्यानंतर १०.३० वाजता आरती अंकलीकर यांच्या शिष्या सौ. सायली सत्यजीत तळवळकर यांचे.

सौ. सायली सत्यजीत तळवळकर यांचे गाणे मी पुर्वी दोन तीन वेळा ऐकले असल्या मुळे आज माझी प्रथम पसंती फक्त श्री. कुमार मर्दूर यांच्या गाण्याला जाण्याची होती. सुखद गुलाबी थंडीमुळे अंमळ उठायला उशीर झाला. झाले ते बरेच झाले नाहीतर आज मी एका अनुभुतीला मुकलो असतो.

आज त्या अहीर भैरव, व सारंग, मीरा भजन, व अभंग गायल्या. बहार आली. तॄप्त मनाने व भरल्या पोटी ( वाटेत स्वीट बंगाल हे मिठाईचे दुकान लागते ) घरी परतलो.
सर्वच कार्यक्रमाला जायला मिळतेच असे नाही. तेव्हा मी असे ठरवले आहे की जायचे तर तरुण प्रतिभावंत पिढीचेच गाणे ऐकायला जायचे.

चंद्रसखी

"चंद्रसखी",
काही शब्द आपण कधीतरी प्रथमवेळा ऐकतो, ते आपल्याला आवडुन जातात, सदैव स्मरणात रहातात, "चंद्रसखी" हा असाच एक शब्द. गायत्री नातु यांनी त्यांच्या बॉगवरील कलापिनी कोमकली वर लिहीलेल्या एका अप्रतिम लेखात तो वाचनात आला, कुतुहल जागे झाले, काही जणांकडे त्या विषयी चौकशी केली पण कोणाच्याच तो माहितीत नव्हता.

परवा अचानक पं. कुमार गंधर्वांचे शिष्य व गाढे अभ्यासक पं.सत्यशिल देशपांडे एका दुकानात बसलेले दिसले. त्यांचे गाणे मी चारपाच वेळा ऐकले आहे. धाडस करुन त्यांना विचारले.

त्यांनी केवळ या शब्दाचा खुलासाच न करता , एक रचना ही मला गावुन दाखवली. हे त्यांचे मोठेपण.
"चंद्रसखी" ही देखील संत मीरा प्रमाणेच भजन रचीत असे, "चंद्रसखी" रचीत भजने पं, कुमारजी गात असत.

Saturday, November 17, 2007

The Taste of Luxury




Italian Furniture Exhibition by " Master Pieces " at Museum, Mumbai.

Moshe’s Café at FabIndia.




Salom.

It’s time to discover great Café called, “Moshe’s Café” for cuisine from Italy, Spain, Morocco, Turkey, France, and the entire Middle East belt, after the tiring but pleasant shopping at FabIndia at Kalaghoda. Mumbai.

Since FabIndia was opened in Mumbai, we have been regular shoppers over there, both of us like to wear cottons, and FabIndia is an excellent or rather the only store to buy cotton cloths.

Today we had another reason to visit FabIndia; besides exchanging two shirts I had received as presents during Diwali, to have delicious gastronomical rich experience at newly opened “Moshe’s Café”.

Situated at the mezzanine floor, “Moshe’s Café” with chic atmosphere provides good opportunity to just sit and relax and enjoy the lovely Salads, Soups. Crostini, Open Pies, Toasties, Sandwiches, Dips and Spreads, Breads, Beverages, Healthily Refreshers, Coffees, and Desserts.

At the first glance it looked like expensive one but on second thought when I am paying Rs.60.00 for just one Cheese Mysore Dosa at Vaishali, I have no reason to crib over pricing.


They have branches at Cuffe Parade, Kemps Corner, Nepeansea Road.

मेळावा

एका राजकीय पक्षाने मुंबई शहरात २५ नोव्हेंबर रोजी एक इतिहासातला न भुतो न भविष्यति असा एक भव्य दिव्य मिळावा आयोजीत केला असल्याचे व त्यासाठी महा विराट गर्दी जमवण्याचा त्यांचा बेत असल्याचे आजच वर्तमानपत्रातुन वाचनात आले. राज्यातुन किमान ५० लाख लोक त्या दिवशी मुंबईत येतील असा कार्यकर्त्यांचा विश्वास असल्याचे वाचुन आनंद झाला.

या, मुंबई आपलीच आहे. आपले स्वागत आहे. हे शहर कितीही माणसांचा ताण पेलु शकते असा मला विश्वास आहे.

सर्वांची सोय ल्क्षात घेता साठी, नेत्यांचे भाषण त्यांना ऐकण्यासाठी, त्यांचे विचार जनतेच्या कानी पडावे या साठी प्रभादेवी पासुन माहीम पर्यंत रस्तावर जागोजागी स्पिकर लावणार असल्याचे व आपल्या लाडल्या नेत्यांना पहाण्यासाठी रस्तावर स्क्रीन लावण्याची ही उत्तम सोय व चोख व्यवस्था ही कार्यकर्ते करणार असल्याचे वाचुन बरे वाटले. या साऱ्या परिसरात लोकांनी रस्तावर बसुन आपले भाषण ऐकावे असे नियोजन असणार आहे.

माझी कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे, केवळ याच परीसरात नव्हे तर साऱ्या मुंबई नगरीत जागोजागी लाऊडस्पिकर लावण्याची व स्क्रीन उभारण्याची व्यवस्था करण्यात यावी, कदाचीत खोळंबलेल्या वाहतुकीमुळे आम्ही लांबवर रहाणारी लोक वेळेवर या परीसरात पोचु शकणार नाही. आम्हाला या मेळाव्यापासुन केवळ या कारणे वंचीत रहावयास लागु नये.

या दिवशी रविवार जरी असला तरी, राज्य सरकारने राज्यात सार्वजनीक सुट्टी जाहीर करावी.
लोकांना ही एक नम्र विनंती आहे की त्यांनी ही कामा निम्मिते देखील घरा बाहेर पडणे टाळावे जेणे करुन त्यांच्या मुळे मेळ्याव्यात कोठेही अडथळा निर्माण होवु नये.

शक्तीप्रदर्शन

एका राजकीय पक्षाने मुंबई शहरात २५ नोव्हेंबर रोजी एक इतिहासातला न भुतो न भविष्यति असा एक भव्य दिव्य मिळावा आयोजीत केला असल्याचे व त्यासाठी महा विराट गर्दी जमवण्याचा त्यांचा बेत असल्याचे आजच वर्तमानपत्रातुन वाचनात आले. राज्यातुन किमान ५० लाख लोक त्या दिवशी मुंबईत येतील असा आपल्या कार्यकर्त्यांचा विश्वास असल्याचे वाचुन आनंद झाला.


या, मुंबई आपलीच आहे. आपले स्वागत आहे. हे शहर कितीही माणसांचा ताण पेलु शकते असा मला विश्वास आहे.


नेत्यांचे भाषण ऐकण्यासाठी, त्यांचे विचार कानी पडावे या साठी प्रभादेवी पासुन माहीम पर्यंत रस्तावर जागोजागी स्पिकर लावणार असल्याचे व आपल्या लाडल्या नेत्यांना पहाण्यासाठी रस्तावर स्क्रीन लावण्याची ही उत्तम सोय व चोख व्यवस्था ही कार्यकर्ते करणार असल्याचे वाचुन बरे वाटले. या साऱ्या परिसरात लोकांनी रस्तावर बसुन आपले भाषण ऐकावे असे नियोजन असणार आहे.


माझी कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे, केवळ याच परीसरात नव्हे तर साऱ्या मुंबई नगरीत जागोजागी लाऊडस्पिकर लावण्याची व स्क्रीन उभारण्याची व्यवस्था करण्यात यावी, कदाचीत खोळंबलेल्या वाहतुकीमुळे आम्ही लांबवर रहाणारी लोक वेळेवर या परीसरात पोचु शकणार नाही. तेव्हा आम्हाला या मेळाव्यापासुन वंचीत रहावयास लागु नये.


या दिवशी रविवार जरी असला तरी, राज्य सरकारने राज्यात सार्वजनीक सुट्टी जाहीर करावी, ही व लोकांना ही नम्र विनंती आहे त्यांनी ही कामा निम्मिते देखी घरा बाहेर पडणे टाळावे जेणे करुन त्यांच्या मुळे मेळ्याव्यात कोठेही अडथळा निर्माण होवु नये.

Why Not "

एका वर्कशॉप मधे मी फार चांगली गोष्ट शिकलो. स्वतःला विचारायचे .

"Why Not " ?

मग एका नव्या द्रुष्टीकोनातुन आपण विचार करायला शिकतो.


पेला अर्धा रिकामा कि अर्धा भरलेला ? ( बस्स दोनच पर्याय ? )

जो पेला सतत अर्धा भरलेला किंवा अर्धा रिकामाच रहाणार आहे , तो त्या मापाचा हे कारखानदार बनवतच कशाला ? अर्धाच मापचा बनवायचा की .

Friday, November 16, 2007

210 c Coffee & Cakes



राजाभाऊ, जग केव्हाच कितीतरी पुढे निघुन गेलय की हो ! तुम्ही अजुन कधी पर्यंत आपल्या याझदानी बेकरी, कयानी, मेरवान, रैल्वे बेकरी नां कवटाळुन बसणार आहात ? पहा जरा आपल्या आजुबाजुला. जुने ते सोने मान्य पण नविन तर पॅटेनीयम आहे हो.


आज परत म्हटले छोकऱ्यासाठी काहीतरी हटके घेवुन जावु. बिच्चारा लई अभ्यास करतोय, मग २१० सी. कॉफी व केक (सम्राट, चर्चगेट) मधुन ब्लुबेरी चीज केक घेतला. किती दिवस तेच चॉकलेट केक खायचे ?
मग स्वारी ब्रेड ( पाव) कडे वळली. (इराण्याचे ब्रुनमस्का, बनमस्का खावुन खावुन दिवस गेले. या वयात नसती थेरं ). बनाना, बनाना वॉलनट, चीज, चीज गार्लीक मसाला, पानीनी, कॅरेट, टोमेटो, मींट, ग्रीन टी , पेटीट होलव्हीट, होलव्हीट चोकोचीपस वॉलनट्स, होलव्हीट हनी , होलव्हीट ऍपल सीनेमॉन , सोया, नाचणी, हे सारे प्रकार पावचे ? खर की काय ? की आपली उगाचच मस्करी ?


आरारार, देवा रे हे पेस्ट्रीचे, पायचे, मुस, मफीन, ब्राउनी, पफ चे प्रकार पाहुन टक्कुरच फिरले की ! काय खावु न काय नाही ?


ता.क. मेन्यु वाचत हे लिहीता लिहीता माझा बापाला मी लिहीणे बंद करायला लावले. नाहीतर रात्री त्याला झोप लागायची नाही.

नियम म्हणजे नियम - ४

आज वाचकांची पत्रे - म.टा. मधे १६ नोव्हेंबर २००७ श्री. मंदार मोडक यांनी फार चांगला मुद्दा मांडला आहे,

ते म्हणतात - अनेकदा देवादिकांच्या चित्रात त्यांना व्याघ्राजीन वा मृगाजीनावर बसलेले दाखवले जाते. चित्रात असले तरी ते चामडेच ना? ते देवाला बरे चालते! शंकराचे डमरू चामड्याशिवाय बनेल? मग ज्या चामड्याच्या बुटांशिवाय उभेही राहता येणार नाही असे बूट काढण्याची अट घालणे माणुसकीला धरून आहे का?

जराशी गंमत -
काही देवळात तर पैश्याचे पाकिट, घड्याळ, व अगदी कमरेचा पट्टा सुद्धा काढायला लावतात. हे जरा अतीच झाले.

माझ्या सारख्या जाडजुड , पोटाची ढेरी असलेल्या माणसाची किती तारांबळ उडत असेल यांची या विश्वस्थांना कल्पना आहे काय? आधीच सैलसर कपडे घालावे लागतात, त्यात पोटावर पॅंट धरुन ठेवणारा पट्टा लावायचाच नाही म्हणजे ?

देवा तुझ्या दर्शनासाठी काय काय दिव्य करावी लागतात रे !

Thursday, November 15, 2007

The Black Beauty



Heritage Railway Engine at Heritage Building of Western Railway H.Q. at Churchgate.
The Beauty to admire and to praise for.

210 C Coffee & Cakes




It’s time to change loyalty, from Gaylord Cake shop to 210 C Coffee & Cakes at Samrat , Churchgate.

I was quite disappointed with my all time favorite Gaylord on the last two occasions. I ordered Birthday Cakes and they were not up to the mark.

210 C Coffee & Cakes is a quite decent shop at outskirts of Samrat Restaurant at Churchgate.

Very famous among the young crowd of college students as well the office goers and it’s so closed to my office.

No wonder day by day my weight is going up and up.

नियम म्हणजे नियम - ३

पंजाबी ड्रेस (घालणॆ यात वाईट किंवा चुकीचे काय आहे ? ) घालुन तुम्हाला आत प्रवेश करता येणार नाही, बाहेर थांबा.

स्थळ - शिवसॄष्टी, देरवण, चिपळुन जवळ.

मुद्दामुन वाकडी वाट करुन आम्ही गेलो ते प्रवेश नाकारुन घेण्यासाठी.

पुरुषांनी, साहेबाच्या देशातुन आलेले शर्ट, पॅण्ट घातलेले त्यांना चालतात. ( त्यांना धोतर, सदरा, बंडी, वगैरे नको का ?)

बायकांनी पाचवारी साड्या नेसलेल्या चालतात ( त्यांनाही पारंपारीक नववारी साडी नेसल्यासच प्रवेश का देण्यात येवु नये ? )

नियम म्हणजे नियम - २

जिद्दीने आपल्या पायावर उभ्या असणाऱ्या अपंगांना वास्तविक पहाता आपण माणुसकीच्या द्रुष्टीकोनातुन मानाची वागणुक देणे अपेक्षीत आहे, त्यांच्या भावनेची कदर करत, ते जगत असलेले कष्ट्मय जीवन त्यांच्यासाठी सुसह्य करणॆ हे आपले प्राथमीक कर्तव्य आहे. त्यांच्या यातनांची जाणिव सर्वांनी ठेवायला हवी.
सात, सात किलो वजनाचे जडशिल बुट घालुन, ते सांभाळत, त्यामुळे होणाऱ्या वेदना हसऱ्या मुद्रेने सहन करत, वावरतांना, आयुष्य जगतांना , त्यातल आनंद मिळवण्याचा प्रयत्न करीत असतांना, त्यांना नसत्या भ्रामक कल्पना उराशी बाळगत आडकाठी करुन आपण स्वतःलाच परमेश्वरापासुन दुर करत आहोत.
या पुढे या सर्व श्रीमंत, मोठाल्या देवस्थानांने त्यांच्या सोईसाठी व्हील चेयर्स ची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, जेणे करुन लांबलांबुन आलेल्यांना देवदर्शनापासुन वंचीत रहावयास लागणार नाही.

Wednesday, November 14, 2007

नियम म्हणजे नियम

गोव्याच्या एका मंदिरात अपंगांना प्रवेश नाकारला. चामडयाच्या कॅलिपर बुटांना विश्व्स्तांचा आक्षेप.
हे बुट काढले तरच मंदिरात प्रवेश दिला जाईल. हे बुट म्हणजे जणु आमच्या शरीराचा एक भाग आहे, ते काढल्यास आम्हाला उभेही रहाता येणार नाही असे सांगुनही विश्वस्थांनी ते मान्यच केले नाही. परत काही देवळात आम्हाला यावर कपडा गुंडाळुन प्रवेश देतात त्या प्रमाणे येथेही देण्यात यावा हि विनंती ही अमान्य करण्यात आली. - म.टा. दि. १४.११.०७.

नो कॉमेंटस.

नियम म्हणजे नियम. आम्ही करु ते नियम. ते तुम्ही पाळलेच पाहिजेत. मग त्यात काहीच सुट नाही. कोणत्याही परिस्थितीत त्यात बदल होणे शक्य नाही. नियम हे माणसा साठी असावे, माणसे नियमासाठी नाहीत या वर आमचा काडीमात्र विश्वास नाही. मग आमच्या धर्मातील अनीष्ट प्रथा आम्हाला सोयीस्कर रित्या चालतात, पण नियम म्हणजे नियम ते पाळलेच पाहिजेत. अपवादात्मक स्थिती असु शकते हे देखील आम्हाला मान्य नाही. सरसकट सर्वांना एकच न्याय.

वास्तविक पहात पादत्राणचा संबंध हा स्वच्छतेशी असतो. ( पण हि चर्च मधे चालतात,ही चर्चेस किती भव्यदिव्य व स्वच्छ असतात, त्यातले वातावरण ही किती शिस्तबद्ध असते.)

चामडे नको, पण चामडया आतला पशुचा देह आम्हाला चालतो. तो आम्ही ताव मारत खाणार. या पशुंचे आम्ही देवतांपुढे बळी देणार, त्याचा नेवेद्य देवाला देणार.

Tuesday, November 13, 2007

महामानवाचा एक नवा पराक्रम


जगात अवघे ३६०० वाघ शिल्लक - लोकसत्ता - दि. १२.११.२००७.- .


तस बघायला गेल, तर हे पराक्रम प्राचीन काळा पासुनच महामानव करत आला आहे. वन्य श्वापदांची केवळ शौक साठी शिकार करण्यात त्याला फार मोठा पुरुषार्थ वाटतो. त्याचीच हि परिणीती. प्रचंड प्रमाणात जंगले तोडायची, प्राण्यांच्या जागेत आपण अतीक्रमण करायचे, अती प्रमाणात अंधश्रद्दा उराशी बाळगत वाघांच्या अवयवासाठी प्रचंड किंमत देत त्यांची शिकार करवुन घ्यायची.


अनेक जाती, प्रजाती त्याने बिनडोक पणे नष्ट केल्या उरलेल्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याला ना खेद न खंत.



हि पृथ्वी केवळ आपल्याला रहाण्यासाठी आहे या गैरसमजुतीनेच त्याने , स्वतःच्या स्वार्थासाठी , सुष्टीच्या जिवनचक्राचा विचार न करता केवळ संहार आरंभला आहे.


त्यात परत हे जग समस्त मानवालासाठीच रहाण्यासाठी आहे असाही त्याचा उद्देश नाही , तर हे केवळ आपल्याच संकुचीत विश्वात असणाऱ्यांसाठीच असावे असे त्याला वाटते, जसे की निव्व्ळ आपला समाज, आपला धर्म, आपला देश, मग त्यातुन फोफावतो तो दहशदवाद, आपापसातील युद्धे, आणि संहार.


या निसर्गसाखळीतील आपण ही एक कडी आहे हे तो शक्तीच्या कैफात विसरला आहे, पण निसर्ग हे विसलया आहे काय ?


शेवटी न्याय करणारा व करतो तो निसर्गच.



Sunday, November 11, 2007

कळतनकळत

आयुष्य जगत असतांना आपल्या हाती बऱ्याच वेळा कळतनकळत अनेक व्यक्ती दुखावल्या जात असतात. आपल्या मस्तीमुळे, रुबाबामुळे, जाणीव नसल्यामुळे, स्वतःला शहाणा समजत असल्यामुळे, इतरांना तुच्छ लेखल्यामुळे, कधी जाणुनबुजुन, तर कधी अजाणातेपणे, दुर्लक्ष केल्यामुळे,लक्षात न आल्या मुळे, गॄहीत धरल्यामुळे, एक ना अनेक कारणामुळे आपल्या हाती दुसऱ्यांवर अन्याय होत असतो.

कधी तरी , केव्हातरी मग ही दुखवलेली माणसे , प्रसंग आठवतात, वाईट वाटते, वाईट वाटुन घ्यायला तसा खुप उशीर झालेला असतो. आणि नसतो ही. अजुनही मी त्यांच्या पाशी दिलगिरी व्यक्त करु शकतो.

धन्यवाद, मुंबई पोलीस.

मुंबई पोलीस करत काय आहेत ? झोपले आहेत काय ? का जाणुनबुजुन दुर्लक्ष करतात ? हा प्रश्न मला नेहमीच सणासुदीच्या काळात पडतो. कोर्टाने रात्री दहा वाजतची दिलेली कालमर्यादा पाळण्याचे भान फारच थोडया अतिउत्साही कार्यकर्त्यांना व अजाण नागरीकांना असतो. रात्री दहा नंतर मिरवणुका काढायला, फटाके फोडायला यांना ऊत येतो, चेव येतो. समाजातील काही मुठभर घटक नेहमीच शांतताप्रिय लोकांना वेठीस धरत आलेले आहेत. यांना पोलीस आवरत का नाहीत ?
( आमच्या सिंहगड रस्तावर अभिरुची बाहेर भर रस्तावर नवरात्री निमित्ते बांधलेला मंडप. अर्धा रस्ता अडवुन बसलेला मंडप दिवाळीत , टप्पा टप्पाने, सावकाशीने सोडवायला घेतला गेला)

काल रात्री सव्वा दहा वाजता आमच्या विभागात पोलीस अधिकाऱ्यांनी गस्त घालत या सणप्रेमीच्या बेलगाम अतिउत्साहाला वेसण घातली. फटाके फोडायला मनाई केली.

धन्यवाद, मुंबई पोलीस, आपल्या वर नेहमीच या सणाच्या दिवसात कामाचा अतिरिक्त ताण पडत असतो. आपल्या घरातील सणवार बाजुला ठेवुन आपण आपले कर्तव्य बजावत असतात.

Saturday, November 10, 2007

गिरगाव रंगावली ग्रुप व रंगावली प्रदर्शन




for details please log in to
http://www.girgaonrangavaligroup.com/

आज रंगावली प्रदर्शन पाहाताना," अप्रतीम, सुरेख, मस्तच, टॉप, व्हाव, उत्तम, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ, सुंदर, छानच, लव्हली, झकास, सही, वा, सुपर्ब, मार्व्हलस, मान लिया " आदी, एकादी अद्वितीय कलाकृती पाहिल्यानंतरच्या बघणाऱ्यांच्या जेवढ्या जेवढ्या जगात उत्स्फुर्त प्रतिक्रीया होत असतील त्या सर्व ऐकु येत होत्या. कशी काय काढली असेल ? कित्ती मेहनत आहे ही रांगोळी काढतांना ! या साऱ्या रांगोळ्या बघतांना भानच हरपायला होते ! हे कलावंत किती उत्कॄष्ट निर्मीती करत असतात! यांच्या कडुन हे सारे कोण करवुन घेत असेल ? दिल खुश हुवा !

केवळ आपला हा छंद , कला लोकांपर्यंत पोहचवायला, त्यांना नितळ आनंद द्यायला, निव्वळ आपल्या आंतरीक समाधानासाठी हे अवलीया कलावंत या दिवाळीच्या दिवसात देहभान हरपुन सतत दोन दोन दिवस या रांगोळ्या काढत असतात. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. परत या मधुन व्यावसाईक लाभ काहीच नाही. केवळ सारे कले साठी. या अजरामर कलाकृतीचे आयुष्य ही क्षणभंगुर, केवळ दहा बारा दिवस. पण हे दहा बारा दिवस साऱ्या वर्षासाठी पुरतात.

दर वर्षी दिवाळी आली की सर्व प्रथम आठवण होते, ओढ लागते ती या रंगावली प्रदर्शनाची. गेली अठरा वर्षे "गिरगाव रंगावली ग्रुप " , भीमाबाई राणॆ म्युनिसिपल शाळा, सेंट्रल प्लाझा समोर, गिरगाव येथे रंगावली प्रदर्शन भरवत आहेत. यंदा १४ नोव्हेंबर पर्यंत हे प्रदर्शन खुले आहे. हे जर का पाहीले नाही तर जीवनातील एका अमुल्य अनुभुतीस आपण मुकु.

वास्तविक पहाता येथे फोटो काढण्यास मनाई आहे. लोक फोटो काढुन त्याचा गैरफायदा घेतात. संयोजकांनी मला एक दोन फोटो घेण्यास परवानगी दिली त्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. स्पष्ट सुचना लिहीलेल्या असतांना सुद्धा कॅमेरा बाहेर काढण्याचा प्रमाद माझ्या हातुन घडला, खर म्हणजे मी आधीच संयोजकांची परवानगी घ्यायला हवी होती. मी चुकलो.

"गिरगाव रंगावली ग्रुप " याच्या शब्दात सांगायचे झालेच तर
गिरगांवातील रंगवल्लीचा असणारा हा "गिरगाव रंगावली ग्रुप " म्हणजे विविध क्षेत्रातील नामवंताचा रांगोळीतुन घडवलेला साक्षात्कार. कर्तुत्वातुन सौदर्य अविष्कार दाखवून सामान्यांना सॄष्टीतील दॄष्ट्री दाखविणारा व दिपावलीची नेत्रसुखद भेट देणारा.

विविध नवोदित कलावंताना कलाशैली तंत्राचा वापर करुन मानसीक आनंद प्राप्ती , ज्ञान व वास्त्वता, एकाग्रता, कौशल्यासाठी प्रयत्नशील असा हा गॄप, व्यक्तीचित्रासाठी व वास्तववादी चित्रासाठी आग्रहशील. यंदाच्या १९ वर्षी ह्या ग्रुपने रंगावली प्रदर्शनात वर्षभरातील महत्वपूर्ण घटना - शैक्षणीक , कलात्मक, सामाजीक इ. क्षेत्रातील विषयांची रांगोळीतुन मांडणी केली आहे. प्रदर्शन पहाताना प्रदर्शनाची आखणी, रांगोळीसाठी हवाबंद हॉलमधील व्यवस्था रंगावली चित्रावरील कल्पक शीर्षके यामुळे सर्व कलारसिकांना ही रंगावली चित्रे पाहायला मिळतात.



यंदाच्या प्रदर्शनात रंगरेखाटनाद्वारे ३ कलाकॄती निर्माण झाल्या आहेत. "

शबरी


शबरीचे नाव घेतले कि आठवते प्रभुरामचंद्राला आपली उष्टी बोरे देणारी वनवासी भक्त.
तिची बोरे जशी गोड लागली तसेच या तुकाराम पादुका चौकातील, घोले रोड व फर्गुसन रोड वरील "शबरी" या उपहारगृहातील थाळी. मग या दिवसात दोनदा तेथे भोजनाच्या निमित्ते जाणे झाले.
गरमागरम वाग्यांचे भरते, पिठले काय, सिताफळ रबडी काय , ज्वारी, बाजरीच्या भाकऱ्या काय , छोले, रस्सेदार बटाटा भाजी, बटाटे वडा, भजी, तोडीं लावयाला मिरचीचा ठेचा, पचडी,
हाण गणप्या हाण. त्यात परत सारे काही अवघे रु. १३५ /= . मग गणप्या कशाला मागे बघतो ?

Gibberish

ए. बी. नी आयुष्यभर या ना त्या प्रसिद्धीमाध्यमातुन सतत दर्शनाचा लाभ देत पिडपीड पिडले आता त्यांची गादी ऐस. के. चालवायला लागला आहे.
२०-२५ वर्षाची नायीका व तिच्या समोर ४०-४५ चा नायक , जरा अतीच झालय.
धर्म हि अफुची गोळी आहे - कार्ल मार्क्स - म्हणुन काय धर्मरक्षकांनी ती घ्यावी ?
आपला नवरा रॉकफेलर चा वंशज आहे असे बायकोला वाटावे ?
आपले स्वप्न करोडो रुपये खर्च करुन , चित्रपट तयार करुन अजाण प्रेक्षकांच्या माथी मारायचे ! मग बॉग काय वाईट ? फुकटचा मिळाला आहे, हवा तो धिंगाणा झाला.
आयुष्यभर बाटा चे चप्पल , बुट, सॅंडल वापरुन झाले आता पोराच्या नादाने लॉयल्टी बदलुन परदेशी कंपन्याच्या नादायला लागायचे ?
दिवाळीसाठी फराळाचे करायचे व ऐन दिवाळीत ते कोणीच खावु नये ?

इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो


"इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो " हि आज, बलीप्रदाच्या दिवशी नव्या संवत्सराचे स्वागत करताना भल्या पहाटे करावयाची प्रार्थना.

या बळीराजाचे स्मरण फक्त याच एके दिवशी. हा बळी राजा कोण त्याचे राज्य परत का यावे या बद्द्ल तसे अज्ञानच.

बऱ्याच वेळा मला एक प्रश्न पडतो, दक्षिणेकडच्या राजांना देव म्हणुन का मान्यता मिळाली नाही ?

फटाके आणि भान

ऐ पागल ! बाजुमे लगाव. रात्री मी जीव खावुन बेंबीच्या देठापासुन जोरात ओरडलो. देवानी सर्वकाही दिले पण दोन पैशाची अक्कल द्यायला तो विसरला.

रस्त्याच्या मधे लावलेला फटाक्यातील सुतळी बॉम्ब अगदी टॅक्सी जवळ फुटला. याच वेळी जवळुन
ऐखादा मोटरसायकल स्वार जात असता तर ? तो वेगात जात असता तर ? गॅस सिलेंडर असलेल्या टॅक्सी खाली या फटाका फुटला असता तर ?

भर रस्तात, भर वाहतुकीच्या मधे फटाके लावु नयेत येवढे सुद्धा भान नसावे ?

Friday, November 09, 2007

शमा

शमा ने जल कर कहा ये परवाने से
रात भर मै भी जली हूं तेरे जल जाने से ।
- कराम़त फातमा बेगम.


आणि आता पर्यंत आपण फक्त "परवाना" ची बाजु ऐकत आलो आहोत.

स्टेटस - नरीमन पॉइंट

दिपावलीत घरात चुल म्हणुन पेटवायची नाही, असे आमच्या हिटलरनी ठरवले असावे. (तरी बर घरी जेवण करावयास "कुक" आहे ). कालच्या "मचाण" च्या धक्कातुन माझा खिसा सावरतोय न सावरतोय, जड पेशावरी जेवणानंतर पोट परत लेव्हलला येतय तोच नवा फतवा निघाला " आज आम्ही ठरवलय की सकाळी आपण "स्टेटस " मधे जेवायला जायचे आहे. नो अपिल.

पोटात लिंबुरस, "आले" मारकेचा उतारा घेवुन स्वारी निघाली नरीमन पॉइंट वरील या शुद्ध शाकाहरी हॉटेलात. लक्ष्मी पुजनाच्या निमित्ते आज सकाळी महाप्रचंड गर्दी येथे उसळली होती. अश्या वेळी उपहारगृहे टाळायला हवीत , पण हे सांगण्यासाठी मुळातच अंगात धाडस असायला लागते ना. मग जे काही पदरी पडते ते चवदार , रुचकर मानुन खायला लागते. तस बघायल गेल तर हे आमच्या आवडीचे ठिकाण. येथे डोसा ईडली , उत्तप्पे आधी दाक्षिण्यात्य पदार्थ ही चांगले मिळातात. परत वरती सांबार,चटणी हवी तेवढी.
परत आज काजु मलई मटार.पनीर तिक्का मसाला, चना मसाला , कुलचे या जड पंजाबी भाज्यांचे , पोटावर अत्याचार झाले. भाज्या आज खुपच तेलकट व मसालेदार होत्या. परत वर केशर पिस्ता कुल्फी.
गेल्या आठवडया पासुन मी रजेवर आहे. या रजेच्या काळात जे काही श्रम झाले आहेत त्या श्रमपरिहारा साठी परत रजा घ्यावीशी वाटणार आहे वाटते.

"मचाण" व "ब्रेडटॉक"



दिवाळ काढते ती दिवाळी. "शॉप टील यु डॉप डेड" या म्हणीचा अक्ष्ररशा शब्दशाः अनुभव घेत आहे. खरेदी पेक्षा बाहेर खाण्याचेच बिल जास्त.

काल रात्री जंगलात जेवायला गेलो होतो, मचाणवर बसुन, हत्ती, बाघ, जिराफ, माकडे, बिबळॆ यांच्या सोबत भोजनाचा आस्वाद घेतला. मालाड ला लिंक रोड वर, क्रोमा या शोरुम वर आठव्या मजल्यावर "मचाण" नामक हॉटेल आल्याचे वाचले होते. क्रोमा मधे आय पॉड आणायला गेलो होतो म्हटले चला आज दिवाळीची ऐश या ठिकाणी जेवण करुन करुया.

थीम वर आधारीत असल्यामुळे ही जागा तशी महागडीच आहे. खऱ्याखुऱ्या जंगलात रमणारा मी , या प्लॅस्टीकच्या जंगलात तसे मन लागणे कठीणच. जेवण चवदार होते, पण मन कॄत्रीम वातावरणात जरासे खट्टु झाले होते. मात्र या ठिकाणी बाहेर उघडयावर , गच्चीत तंदुरी, व बर्बेक्यु चे खास पदार्थांची व्यवस्था केलेली आहे. या सहीत बुफे जेवणाची किंमत आहे जवळाजवळ रु. ४२५.००. थंडीच्या दिवसात एखाद्या चांदण्या रात्री याचा आस्वाद घ्यायला यायला हरकत नाही.
जेवणात आम्ही टॉमेटो शोरभा, शाही तरकारी बिर्यानी, पनीर बटर मसाला, व्हेज. कोफ्ता, दाल सारीस्का, कुलचे आदींचा आस्वाद घेताला. जंगलात असल्यामुळॆ प्रत्येक पदार्थाच्या नावात जंगलांची नावे असणे क्रमप्राप्त होते.
"ब्रेडटॉक" , इन औरबीट मॉल मधे याच संध्याकाळी आम्ही न्याहारी करायला गेलो होते. हे एक पाव, पेस्टीज, केक आदी बेकरी प्रौड्क्ट्स मिळण्याचे आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे अती उत्तम स्थळ आहे. फ्रेशली बेक्ड क्रियेशनस. येथे आम्ही ब्लु बेरी मुस, फ्रेंच गार्लीक पिज्झा, पिज़्ज़ा ब्रेड, चौकलेट क्रांसे, मुर्ग ला चीज, चा आस्वाद घेतला.
दिवसभराचा फिरण्याचा व खादाडीचा खर्च जवळजवळ २५०० रुपये झाले आणि प्रयोजन होते छोकऱ्याला रिबॉकचे शुज घेण्याचे. ते काही हवे तसे मिळालेच नाही.
सर्व काही अक्क्ल खाती जमा.

Thursday, November 08, 2007


सूरप्रभात


तीच दिवाळी पहाट, तेच सुगंधी उटणे, तोच म्हैसुर सॅंडलवुड साबण , तेच अभंग्य स्नान , पण त्यातला गोडवा ना जाणे कोठे हरवला आहे ही काहीशी हुरहुर मनी बाळगत, भल्या पहाटे , आज मी रंगस्वर यशवंतराव चव्हाण केंद्र आयोजीत, "सूरप्रभात" या सुरमयी कार्यक्रमास पोहोचलो ते प्रसन्नचित्ती, हसऱ्या, प्रभावी व्यक्तीमत्वाचा डॉ. संगीता शंकर यांचे व्हायोलीन ऐकायला.

मियांकी तोडी ऐकताना, भान हरपताना, ना जाणे ही मनाला आलेली मरगळ केव्हा दुर झाली व दिवाळी प्रभात "सूरप्रभात " केव्हा झाली हे कळलेच नाही. त्या नंतर मन रिझवायला जी काही सुरवात झाली त्यात भर पडली ती पं, संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने. आज प्रथमच मी जयवंती तोडी ऐकली.

काल रात्री आम्ही पुण्यावरुन मुंबईस परतलो. खर म्हणजे आज पहाटे पुण्यात राहुल देशपांडे यांचा कार्यक्रमाला जायचे होते पण म्हटले नको आज डॉ. संगीता शंकर यांचे व्हायोलीन ऐकुया.

आज मला वाटले की काही क्षण, काळ, वेळ, कलावंत हे स्वतःसाठी म्हणजे आपल्या आंतरीक आवाजासाठी, ओढीने, (मला काय म्हणायचे ते नीट लिहीता येत नाही) गात असावेत व त्या नंतर केवळ श्रोत्यांसाठी. अर्थात मी काही यातला जाणकार नाही तरी पण मला असे जाणवले.

आता वाट पहाणे उद्याच्या आकाशवाणीतील अरुण दाते , पद्मजा फेणाणी यांच्या कार्यक्रमाची. सकाळी सहा वाजण्याची.

Wednesday, November 07, 2007

ऐका हो ऐका

डुम डुम डुम,ढांग ढींग ढांग ! ऐका हो ऐका ! समस्त पुणेकरांनो ऐका ! डुम डुम डुम ! आमचे , बेडेकरांचे मिसळीचे दुकान, डुम डुम डुम, आज उघडे आहे हो .. ऐका हो ऐका , समस्त खादाडांनो ऐका, आज आम्ही मिसळ भरपुर केलेली आहे हो ! संपलेली नाही हो ! डुम डुम डुम ! आज दुकान सुरु आहे. तेव्हा ज्या कोणाला मिसळ खाण्याची इच्छा आहे, त्यांनी, डुम डुम डुम, आज जरुर आमच्या दुकानात विनासंकोच, बेशलक. कोणतीही शंका मनात न बाळगता दिवसात केव्हाही मिसळ खाण्यासाठी जरुर येणे, सर्वांसाठी भरपुर मिसळ उपलब्ध आहे हो.

दवंडी पिटवणार- काल चौथ्यांदा बेडेकरांकडे मिसळ खाण्यास खास गेलेला एक पागल माणुस. जावुन ऐवुन दिड तासाचा प्रवास व एका वेळी जवळ जवळ रिक्शाला १५०-२०० रुपये लागत असुन सुद्धा, व तेथे गेल्या नंतर एकतर "संपली" हा शब्द ऐकावा लागणार किंवा दुकान बंद असणार हे ठावुक असतांना देखील केवळ बेडेकरांची मिसळीची चव कशी असते हे जाणुन घेण्यासाठी जाणाऱ्या माणसास व त्याच्या बायकोला पागल नाही म्हणायचे तर दुसरे काय बोलायचे ?
काल दिनांक ०६.११.२००७ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता उपहारगॄह बंद होते. मग आम्ही "श्री" मधे मीसळ खायला गेलो.

Flower Show in Pune

Tuesday, November 06, 2007

Transliteration button

After few days experiments with Transliteration button for the posts to translate English into Hindi , I have reached to the conclusion that's "It's a Pain to use this service ".

I will better stick to Baraha.

Unfortunately in the Cyber Cafe, once does not have any other alternative.

Improvement in certainly required.

या २१ व्या शतकात देखील ?

अजुन पर्यत ? या २१ व्या शतकात देखील आम्ही अद्यापि याच बाह्य कर्मकांडांत गुतुंन पडलो आहोत ?

"गुरुवायुर येथील मंदिरात महिलांना "सलवार-कमीज ' घालून येण्यास परवानगी दिल्यामुळे भगवान श्रीकृष्ण नाराज झाले आहेत! त्यामुळे मंदिरात आता पुन्हा पारंपरिक वस्त्रे परिधान करून येण्याचा नियम लागू होण्याची शक्‍यता आहे। "

भक्तिचा, पवित्राचा आणि उत्तरे कडल्या या योग्य त्या वेशभुषेचा संबध काय ? सलवार-कमीज' परिधान केल्याने पावित्र कसे काय भंग पावते हे केवळ मनमानी नियम करणारे देव व भाविक याच्या मधले मध्यस्थच जाणोत।

भाविकांना मंदिराच्या परंपरांमध्ये बदल करण्याचा कोणताही अधिकार नाही असे या मंदिराच्या रखावालादाराचे म्हणणे आहे। परतु कालाबाह्या झालेल्या रुढी, परंपरां मधे बदलत्या कालानुसार सुधरणा व्हायलाच हवे। भाविकांची सोय गैरसोय हिच प्राथमिकता हवी । किती काळ हे मध्यस्थ आपला मनमानी कारभार चालवणार ? या शुल्लक गोष्टीत कालव्यपय करण्या पेक्षा या श्रीमंत देवस्थानांनी समाज उपयोगी कार्यात आपल्या अफाट संपत्तीचा योग्य तो विनीयोग करावा.
जग देश, विश्व याच्या सीमारेषा ओलांडून आंतराळात पोहोचले तरी आम्ही अजुन पर्यंत पुराण काळात वावरत आहोत। नशीब तरी नववारी साड्यांचा आग्रह हे लोक धरत नाहीत.

Monday, November 05, 2007

पाकिस्तानात आणीबाणी

पाकिस्तानात मधे आणीबाणी की मार्शल लाँ ? हां प्रश्न च फजुल आहे। या देशाचा इतिहास लक्षात घेता येथे लोकशाही कधीच रुजली नाही। ज्या पद्तीने येथे घटना घडत होत्या त्या वरुन आज तेव्हा उद्ध्या हे होणारच होते।जेव्हा आपले आसन ड़ळमळीत झाले तेव्हा हुकुंमशहांनी हाच मार्ग स्विकारालाय। एकाधिकारशाही येथे नेहमीच राहिली आहे। लष्कर नेहमीच राज्य करीत आले आहे। पंतप्रधान पद हे नुसतेच नावाला आहे। गेले काही दिवस जनरल मुशर्रफ यांच्या कठीन होत चाललेल्यां परिस्थिति बद्दल वर्त्तमान पत्रात वाचायला मिळत होते। सत्ता आपल्याचा ताब्बात ठेवण्याची ही त्यांची केविलवाणी धडपड केवढा वेळ चालेल हे काळ ठरावेल।

आपल्या देशा बरोबराच जन्मलेल्या या देशात लोकशाही फार थोडा काळ होती। तिला सुद्धा लोकशाही म्हणता येईल काय ?

आणीबाणी आणि पाकीस्तान

पाकीस्तान मधे आणीबाणी की मार्शल लाँ ? हां प्रश्न फजुल आहेया देशाचा इतिहास लक्षात घेता येथे लोकशाही कधीच रुजली नाहीज्या पद्तीने येथे घटना घडत होत्या त्या वरुन आज तेव्हा उद्ध्या हे होणारच हुकुम्शः जेव्हा आपले आसन दळमळीत झाले तेव्हा hukumshah

Sunday, November 04, 2007

संपादकांनो ज़रा जपून

बघा बघा आपल्या बायकोसाठी लोक काय काय करतात ते ! कसे लाड पुरवतात ते ! शिका शिका कायतरी त्यांच्या कडून ! कुठे ते नाहीतर कुठे तू। बायकोची एक साधी इचछा पूरी करता येत नाही । बायकोचे मन ओळखुन स्वताःहुन एखादी गोष्ट आणून देणे तर दुरच पण दाताच्या कण्या केल्या तरी मागितलेली वस्तु काहीतरी सुनावल्या शिवाय आणलेली नाही।

अग पण आज अचानक तुला झाले तरी काय ?

आयुष्य भर मला यामाहा वरुन फिर फिर फिरवालेत, मी कधी काही बोलली काय ? लोक बघा कसे आपल्या बायकोला कश्या कश्यातुन फिरवून आणतात। ते काही नाही , आत्ताच्य्या आत्ता उठा , यंदा दिवाळीला मला काय आणनार ते सांगा ।
अगपण कोठे इंद्राचा ऐरावत , आणि कोठे श्यामभटाचा तट्तानी ! चल आपण शबरीत जेवायला जावू या ।
(काल्पनिक )
संपादकांनो ज़रा जपून बातम्या दया। मेहरबानी खातिर। नाहीतर असे संवाद घरो घरी होवू शकतात।
सकाळ मधून
मुंबई, ता. - तुमच्या-आमच्यासारख्यांचे पत्नीवरील प्रेम किती असेल? तिला एखादा ड्रेस किंवा दागिना घेण्याइतपत! पण थोरा-मोठ्यांचे प्रेमही तेवढेच महान(ग)! लाख कोटी डॉलर संपत्तीच्या मालकाचे "धनी' असलेल्या मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता यांना त्यांच्या व्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून दिले जेट विमान! त्याची किंमत आहे 2 अब्ज 40 कोटी रुपये (फक्त)... ......

संपादकांनो ज़रा जपून

बघा बघा आपल्या बायकोसाठी लोक काय काय करतात ते ! कसे लाड पुरावतात ते ! शिका शिका कायतरी त्यांच्या कडून ! कुठे ते नाहीतर कुठे तूबायकोची एक साधी इचछा पूरी करता येत नाहीबायकोचे मन ओळखुन स्वताःहुन एखादी गोष्ट आणून देणे तर दुरच पण दाताच्या कण्या केल्या तरी मागितलेली वस्तु काहीतरी सुनावल्या शिवाय आणलेली नाही

अग पण आज अचानक तुला झाले तरी काय ?


aayushybhar

स्वर्ग अवतरलाय कृषि महाविद्यालयात !

है अगर जन्नत तो यही है ! यही है ! यही है !! कृषि महाविद्यालयात आहे। (पुणे )
नंदनवन पहाण्यासाठी स्वर्गात जाण्याची , काश्मिरात , युरोपात जाण्याची गरजच काय ? सुरेख, विलोभनीय, रंगभरी, फुले, ओर्चिड , पहाण्याची इछा आहे तर सरळ कृषि महाविद्यालयात जावे, प्रदर्शन भरले आहे। देशाविदेशातुन जी काही फुले, ओर्चिड येथे आली आहेत त्याची सजावट पहावी , रुप न्याहाळावे , रंग, गंध, डोळ्यात , मनात भरून घ्यावा , स्वताःच्या सौख्याचा हेवा करावा, तृप्त मनाने , जड़ पावलाने परतावे। (आजचा शेवटचा दिवस )
(फोटो घरी परतल्यावर )

Friday, November 02, 2007

Westside

My son is very very happy for all the Diwali Shopping done at Westside in Pune . (Of cource me also )
It was a very good deal.
Every year I receive 20% discount coupon on my birthday during October from Westside. This year they have come out with a nice scheme. If you buy goods worth Rs.4000.00 , then you get Gift Voucher for Rs. 1000.00 for free of cost.
Initially I bought Cloths worth approx. Rs. 8200.00 . Net amount after 20 % discount was around Rs. 6550.00 . The person across counter suggested me to buy goods for another say Rs. 1900 , so that, I can avail of another gift voucher of Rs.1000.00, which I gladly listened to.
The end result was heart full of joy, hands full of bags, hole in a wallet with Rs. 8000.00 but half filled with Gift vouchers Rs. 2000.00
One more reason to visit Westside.
Thanks Westside for making our Diwali joyous.

होल्मस धूमकेतु

आज प्रथमच होल्मस धूमकेतु चे दर्शन झाले। ययाति तारकासंघाच्या बीटा तारया खाली ५ -१/२ वाजताच्या पोजिशन मधे हां होल्मस धूमकेतु दिसला। चार पाच दिवस वातावरण ढगाळ होते, आजा निराभ्र झाले। महोदयानी मस्तपैकी दर्शन दिले। अजुन त्याला शेपुट फुटलेले दिसत नाही। नुसताच पाढुरका ठिपका नुसत्या डोळ्याने सुद्धा दिसतो।

संपली ! शटर डावुन।

संपली।, आ ? अहो आत्ताशी कोठे सहाच वाजताहेत । दुकान तर आत्ताचे सुरु झाले , बंद व्हायला फार अवकाश आहे ना।
हो। पण मिसळ संपली।

मिसळ संपली हे ऐकायाची आजची तीसरी वेळ । (कशाला मी या बेडेकरांच्यां नादाला लागतो देव जाणे। )

अहो आम्ही खुप लांबुंन येतो, खास मिसळ खाण्यासाठी। तीसरी वेळ ही परत जाण्याची । प्रत्येक वेळी जाण्या येण्या साठी आमचे जवळ जवळ 150-२०० रुपये रिक्श्या साठी जातात , परत दोन तिन तास सहज मोडतात।

काहीच प्रतिक्रिया नाही।

आम्ही भुकेल्या पोटी परत।

सर्व प्रथम आम्ही एकदा रविवारी सकाळी ११ वाजता मुद्दामुन जगप्रसिद्ध मिसळ खायला बेंडेकरांकडे गेलो होतो, तेव्हाही हाच अनुभव घेतला होता।

मी सहजच बोललो, या पुणेकरांना " संपल" हां शब्द ऐकवायाला मोठे भूषण वाटते।

झाले। मालकांना त्यांच्या ग्राहकांना चार खडे बोल सुनावायाला एवढे शब्द पुरेसे होते।

कानाला खडा परत जाणार नाही।

न्याय

आता रात्री आपण बाहेर जेवुया का ?
नको ग ! सतत बाहेर जेवुन कंटाळा आला आहे , घरी करतेस का ?
बर पिठाले भाकरी बनावते - ती
..................
ही भाकरी घेवु का ?
नको । का बरे ? ती कड़क झाली आहे , मी खाईन।
अरे वा ! हां कुठला न्याय ? नवराल्यां तेवढे चागले सुरखे व आपण मात्र वाट्टेल ते ? आण ती येथे ।
( हे कळायला किती वर्षे जावी लागली ? )

Thursday, November 01, 2007

जमेना

काही काही जागांचे, दुकानाचे, माणसांचे आपल्याची जमतच नाही. सबळ कारण असेलच असे नाही. पण नाही जमत.

गिरीजा, सिंहगड रस्तावरील मराठीमोळ्या पदार्थाचे उपहारगृह. नेहमीच खुप गर्दी असते. बहुदा रुचकर पदार्थ मिळत असावेत.

मागे कधीतरी पाहुण्यांना पिठलेभाकर आवडते, आवर्जुन घेवुन गेलो, संध्याकाळाची वेळ, उपहारगृहात धुपाच्या अगरबत्या जाळलेल्या. सर्वत्र धुर भरुन राहीलेला. वातावरण काहीसे उदासी, त्यांचे काही मन रमेना. न खाता बाहेर पडलो.

परवाचीच रात्र. उपहारगृहात दुरुस्तीचे काम चाललेले. स्वच्छते, अस्वच्छ्तेकडे जरासा कानडोळा ,
आज मला वाग्यांचे भरीत खावेसे वाटते. ती .
वाग्यांचे भरीत नाही. बर, भरली वांगी आणा, ती देखील नाहीत. वांग्याचे पदार्थ नाहीत.
काय खावु बरे, बर, मटकीची उसळ आणा.
ती सुद्धा नाही.

तेव्हढ्यात एक गॄहस्थ आले. तुम्ही त्या कोपऱ्यात बसता का ?
कुठे ? ते त्या तिथे . (त्या मेजा जवळ्च दुरुस्तीचे काम चाललेले. निवांतपणाच नाही. दुसरे ही कोणीच बसायला मागत नव्हते. अगदीच अडचणीची जागा )
नको हो.
हे टॆबल आम्हाला मोठा गॄप आल्यावर त्यांना द्यावे लागणार आहे. ( हे आधीच सांगता येत नव्हते. येथे बसु नका म्हणुन . जरा थांबा, जागा झाल्याबरोबर देतो म्हणुन, परत बाजुला इतर जण बसु शकत होती की )

तो, वैतागुन उठुन बाहेर निघुन आला, दुसऱ्यांदा, न जेवता. उपाशीपोटी, भुक मनात ठेवुन.

बर झाले , ती म्हणाली , तरी मी मनात म्हणात होते, येरवी स्वच्छतेचे भान पाळणारा तु . परत तुला काही बोलायची सोय नाही. म्हटले जावु दे, काय खातो ते खावु दे .

संवाद

काय ग तुझ्या मनात आपल्या नवऱ्याविषयी सर्वात जास्त प्रेम केव्हा उचंबळुन येते ?
त्याने विचारले .
खर सांगु, जेव्हा जेव्हा तु माझ्याशी चांगला वागतोस ना तेव्हा . ( क्वचीतच तो बरा वागत असावा)
आणि काय रे ! तिने विचारले, तुझी बायको स्वयपाकघरात काम करीत असताना, तिला बघताना तुला बरे वाटत असेल ना रे ? ( तिच्या स्वताच्याच स्वयपाकघरात ती मुक्क्तहस्ते, दडापणाशीवाय, क्वचीतच वावरत असावी )
मधे एक बोलका मुक संवाद.
शुक्रवार ते रविवार मजेत जातील रे , पण मधला हा काळ !
जान तेरे लिये ।
तेरे बिना जीना, नाकाबिले जीने का तसव्वुर है ॥