Tuesday, May 10, 2022

सयाजी

 


ह्या खेपसं गुजराती हवं, गुजराती हवं हा ध्यास घेतलेल्या, हा घोषा लावलेल्या राजाभाऊंच्या मनात नाहे म्हटले तरी किंचीतशी साशंकता होती, आपण म्हणतोयं खरे पण हे कितपत सत्यात उतरेल याची त्यांना धाकधुक होतीच. आणि नेमके तसेच घडले.

भर दुपारी, ऐन उन्हात, तापलेल्या वेळी का कोण जाणॆ पण त्यांना गाडी चालवण्याची एक झिंग चढली होती, कुठेही आता थांबणे नकोसे वाटत होते. बेलापुर आले, मग वाटु लागले, हे गुजराती जेवण जेवल्यावर सुस्ती आली तर , लोणावळा आले, येथे गर्दी असेल तर , त्यापेक्षा आपण पुण्यातच जेवु या हा विचार करत करत मग ते पुण्याला पोचले. 

तेथे पोचल्यानंतर मग त्यांच्या  हे  "गुजराती नको" चे मनाचे खेळ लक्षात आले. त्यांना काळेकाकुं बरोबर "सयाजी " मधे छान पैकी जेवायचे होते.

या वेळचे जेवण खुप आवडले, कदाचित काहीतरी साजरे करायचे असेल तर, तिच्या सोबत निवांतपणे गप्पागोष्टी करत शांतपणॆ चवीचवीने जेवायचे असेल म्हणुन कदाचीत किंवा आपला कॅमेरा बाहेर गाडीत ठेवुन केवळ जेवणावर लक्ष द्यायचे म्हणुन सुद्धा असेल.

या वेळी काहीसे नव्या चवीचे सुप प्यायला मिळाले. गाजर आणि संत्र याचे सुप.

हे असे काही मेन्युत असेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. पण ते मिळाले. ज्याचा शेवट हा "सेमीया पायसम " नी होतो तो शेवट किती गोड असतो.

 केळशी गावामधे मिळालेले साधे भोजन. मन तृप्त जाहले


कोवळे ताडगोळे. खायला लई ग्वाड.

 कोवळे ताडगोळे. खायला लई ग्वाड. 

काळेकाकांच्या हातुन ताडगोळ्यांची सालं काढतांना मात्र ते हमखास फुटतात , अर्धेअर्धिक पाणी जमिनीस मिळायचे ते मिळतेच. हे असे फुटलेले ताडगोळे. काय मजा नाही त्यात.

काल रात्री मात्र काळेकाकांची तबियत एकदम खुष होवुन गेली.

त्यांनी न फुटलेले, अक्खेच्याअख्ये बऱ्यापैकी ताडगोळे हाण हाण हाणले. नेहरु रोड, विलेपार्ले , शिवसागरचा कॉर्नर.

ताडगोळेवाल्याची मेहरबानी, प्रेमाने साल काढुन, एकही ताडगोळा न फोडता जे काही खिलवले.  

बढीया.

ये दिल मांगे मोअर

 ये दिल मांगे मोअर



तिखटमिखट उसळमधे न्हाऊन निघालेल्या मऊसुर पावाचा पहिल्या घासापासुन राजाभाऊंचे मन तृप्त होत गेले.

 नाही म्हणजे मनुष्याने नेहमीच मोहाला शरण जावे ही बाब जेवढी खरी तेवढीच राजाभाऊ आज तुम्ही थोडासा का होईना पण जरासा संयम बाळगायला काही हरकत नव्हती ही गोष्टही तेवढीच खरी.

गेला कुठे होतात, कशासाठी गेला होतात ह्याचे काही तरी शेवटपर्यंत भान तुम्ही बाळगायला हवे होतेत राजाभाऊ, भले उकडीचे मोदक तुम्हाला अगदी परमप्रिय असले तरीही. खेड, रत्नागिरी व पावस मधुन घरी भरपुर आबं आलेले. गोड खावुन खावुन, आंबे, आंबापोळी, फणसपोळी, आंबा बर्फी खावुन खावुन जीव तसा कंटाळलेला. 

मेनका, उर्वशी, तिलोत्तमा ह्या साऱ्या अप्सरा समोर आल्यानंतर ऋषींचे भान जसे हरपते अगदी तसचं "विनय हेल्थ होम" मधे चटकदार उसळ समोर आल्यावर आज ह्या राजाऋषींचे झाले. तिखटमिखट उसळमधे न्हाऊन निघालेल्या मऊसुर पावाचा पहिल्या घासापासुन राजाभाऊंचे मन तृप्त होत गेले. समाधानी होत गेले. इतक्या दिवसाच्या गोडुसपणावर हा चवदार उतारा बह्मानंदी टाळी लावुन गेला.

सहजच अचानक नजर एका पाटीकडे गेली. नसती गेली तर चालण्यासारखे होते. काय करु ? 

मागवु ? नको मागवु ? खावु की नको खावु ?

मग समोर आला तो रुप नसलेला मोदक. चवीला चांगला होता खरा, पण शेवटी रुप ही तेवढेच महत्वाचे.


old post




दोन खटकणाऱ्या गोष्टी.

 दोन खटकणाऱ्या गोष्टी.

काही काही लहानसहान उपहारगृहांमधे टेबल कळकट मळकट, आंबुस फडक्याने साफ करणारा व त्याच हाताने , ते न धुता तुम्हाला खाद्यपदार्थ देणारा किंवा आतमधे ताटवाट्या, चमचे हाताळणारा मुलगा तोच असतो.

काही उच्च दर्जाची रेस्टॉंरंट्स.

काटे, चमचे, सुरी थेट टेबलावर ठेवली जातात. त्या टेबलावर जेथे जेवतांना अन्न सांडते.जेवुन झाल्यावत ते टेबल साफ केले जाते. परत त्याच वर काटेचमचे ठेवले जातात. नकोसे होतो. अस्वास्थ्यकर वाटते.

पोळीबरोबर चक्क बटाटा सुकी भाजीच्या ऐवजी तिखट मिखटाचा सांजा खावा ?

 आता माणुस एखादे वेळीस ताणतणावाखाली काम करत असला म्हणुन काय त्याने पोळीबरोबर चक्क बटाटा सुकी भाजीच्या ऐवजी तिखट मिखटाचा सांजा खावा ? आता भाजी आणि सांजा यांचा रंग जरी एक असला तरी पण अर्ध्यापेक्षा जास्त पोळी संपेपर्यंत राजाभाऊंना कळू नये काय चाललयं ते आणि तेही मनाशी काहीतरी विचित्र चव लागतेयं असा विचार करत असतांना ? 

राजाभाऊ ,गॅरंटी आणि वॉरंटी सर्व संपायला लागलीय बरं का !

याचसाठी केला होता सारा हट्टाहास.

याचसाठी केला होता सारा हट्टाहास. जेवण जेवणॆ हे  राहिले केवळ उपचारापुरते.











Sunday, May 01, 2022

ओये काके

 राजाभाऊ व काळेकाकुंसाठी कालचा दिवस खास होता.

तेहत्तीस वर्षापुर्वी तरी गुरुजी ओरडुन सांगते होते " सावधान, सावधान, सावधान" 

राजाभाऊ काही सावध झाले नाहीत. तेव्हाही आणि आत्ताही.


मग तो दिवस साजरा करण्यासाठी त्यांनी ठरवले की आज अश्या ठिकाणी जेवायला जायचे की जेथे ते पुर्वी कधी गेले नसतील.


बीकेसी मधील "हिचकी" ह्या रेस्टॉरंट मधे ते पोचले. पण हे भगवान जवळजवळ एक तास थांबावे लागणार होते, गर्दी मुळे. मग दुसरीकडे जायचे ठरवले. पण सगळीकडेच गर्दी होती. सगळीकडेच थांबावे लागणार होते. 


कशीबशी कमला मील मधल्या ’ओये काके" मधे त्यांना अर्ध्यातासाच्या प्रतिक्षेनंतर जागा मिळाली.


"ओये काके" जेथे फक्त अस्सल पंजाबी जेवण मिळते.


आधी मलईदार लस्सी मागवली मग राजाभाऊंचे आवडते छोले कुलचे.


मग घरी जातांना केम्स कॉर्नर वरच्या "मुच्छड पानावाला" कडुन मघई पान. 









Friday, April 29, 2022

गिरगाव चौपाटी वरचे " ठक्कर्स " मधली गुजराती थाळी

 तेव्हाच राजाभाऊंनी विचार केला होता पक्का. 

ह्या वेळी फक्त गुजराती, गुजराती आणि गुजरातीच. ह्या खेपेस फक्त तेच निवडायचे.

एवढे मस्त गुजराती. आता आपण ह्याच्या पासुन इतके वर्ष लांब राहिलो , त्यांना राहून राहून आश्चर्य वाटुन राहिले .  का पण का आपण येथे कधीच आलो नाही ? आपण याची निवड आधीच का बरं केली नाही ? 

खरं म्हणजे कधीच नाही हा शब्दप्रयोग तसा चुकीचा. दहाएक वर्षापुर्वी किंबहुना जास्तच झाली असावी राजाभाऊ येथे सपत्नीक आले होते पण त्या वेळी याचे पडते दिवस सुरु होते. वाईट अवस्थेतुन एकंदरीच सर्व चालले होते. पण ह्यानी पुन्हा भरारी घेतली आणि नव्या रुपात , नव्या अवतारात  सामोरे आले, लोकप्रिय झाले. कदाचित हे आता आपल्या आवाक्याबाहेर आहे असा समज करुन घेवुन राजाभाऊ यापासुन दूर राहिले असावेत. पण आता लांब रहाणे नाही. आपण उगीचच घाबरत होतो हे ते आज जाणुन गेले.

आंबरस, पुरी, भाकरी, वटाणा पॅटीस, सफेद ढोकळा. सफेद वटाणा , बटाट्याची सुकी, भेंडी,  दोडकी आणि अळुवडी ह्या भाज्या, कढी, डाळ, खिचडी, ताक आणि मग चटण्या वगैरे. 

गिरगाव चौपाटी वरचे " ठक्कर्स " मधली गुजराती थाळी खुप आवडली, ते आज अगदी आवडीने येथे जेवले . 

आपली निवड चुकली नाही ह्याचे राजाभाऊंना फार समाधान झाले. 



आता येणारा उद्याचा दिवस फार चांगला असणार ही खात्रीच.. सुरवात तर चविष्ट झालीयं.

Tuesday, April 26, 2022

थाळी. घरीच.

 


छोले भतुरे व बिर्याणी

 



मस्तपैकी खाली बसु आणि आमटीभातावर आडवा हात मारु.

 मांडी ठोकुन खाली जमिनीवर जेवायला बसायचे हे किती साधे सोपे काम आहे. आपल्याला त्याची सवय आहे. 

मस्तपैकी खाली बसु आणि आमटीभातावर आडवा हात मारु.

पण खाली बसल्यानंतर राजाभाऊंच्या लक्षात एक गोष्ट आली. आपण आणि जेवणाचे ताट या मधे एक अडसर आहे. आपल्या भल्यामोठ्या पोटाचाच. 

शेवटी ताट मांडीवर घेवुन जेवावे लागले.




थंडा थंडा कुल कुल.


 

राजाभाऊंनी अद्याप नाही खाल्लेले.

 राजाभाऊंनी अद्याप  शेपूचे डोसे, मेथीच्या आंबोळ्या, मुटकुळे, वांगी व ज्वारीचे थालीपीठ, गाकर, भाताचा ठेपला, मुळ्याचा उत्तप्पा नाही खाल्लेले.

आंब्यांचा भात , आंबरसाचा भात, कैरीचा पुलाव, मोदकाची आमटी, जवसाचा तिखट पराठा, ही अजुन खायचे आहे.

आता हे रेस्टॉरंट बंद झाले आहे. केवळ आठवणी उरल्या आहेत

 आता हे रेस्टॉरंट बंद झाले आहे. केवळ आठवणी उरल्या आहेत








मामा काणें

 बटाटा वडा नाही. ह्याचे मुळ नाव "बटाटवडा"  मामा काणेंकडचा.




Monday, April 25, 2022

बार्बेक्यू नेशन

 वा, राजाबाबु . बढीया है ! 

रात्री कॉपर चिमनी (वरळी) , सकाळी बार्बेक्यू नेशन (नेरुळ)

बढीया है !

बार्बेक्यू नेशन मधे सध्याला आफ्रिकन खाद्यमहोत्सव चालला आहे.   खरं म्हणजे हे असे चमचमीत खाणे हा राजाभाऊंचा स्वभाव नाही. त्यांना आपला आमटीभातच जास्त भावतो. पण काय करणार, खाना पडता है । 

राजाभाऊंना आज सर्वात जास्त कोणती डीश आवडली असेल तर ती म्हणजे "गरमागरम गुलाब जामुन आणि व्हॅनीला आइस्क्रिम. "

Repost