Friday, April 29, 2022

गिरगाव चौपाटी वरचे " ठक्कर्स " मधली गुजराती थाळी

 तेव्हाच राजाभाऊंनी विचार केला होता पक्का. 

ह्या वेळी फक्त गुजराती, गुजराती आणि गुजरातीच. ह्या खेपेस फक्त तेच निवडायचे.

एवढे मस्त गुजराती. आता आपण ह्याच्या पासुन इतके वर्ष लांब राहिलो , त्यांना राहून राहून आश्चर्य वाटुन राहिले .  का पण का आपण येथे कधीच आलो नाही ? आपण याची निवड आधीच का बरं केली नाही ? 

खरं म्हणजे कधीच नाही हा शब्दप्रयोग तसा चुकीचा. दहाएक वर्षापुर्वी किंबहुना जास्तच झाली असावी राजाभाऊ येथे सपत्नीक आले होते पण त्या वेळी याचे पडते दिवस सुरु होते. वाईट अवस्थेतुन एकंदरीच सर्व चालले होते. पण ह्यानी पुन्हा भरारी घेतली आणि नव्या रुपात , नव्या अवतारात  सामोरे आले, लोकप्रिय झाले. कदाचित हे आता आपल्या आवाक्याबाहेर आहे असा समज करुन घेवुन राजाभाऊ यापासुन दूर राहिले असावेत. पण आता लांब रहाणे नाही. आपण उगीचच घाबरत होतो हे ते आज जाणुन गेले.

आंबरस, पुरी, भाकरी, वटाणा पॅटीस, सफेद ढोकळा. सफेद वटाणा , बटाट्याची सुकी, भेंडी,  दोडकी आणि अळुवडी ह्या भाज्या, कढी, डाळ, खिचडी, ताक आणि मग चटण्या वगैरे. 

गिरगाव चौपाटी वरचे " ठक्कर्स " मधली गुजराती थाळी खुप आवडली, ते आज अगदी आवडीने येथे जेवले . 

आपली निवड चुकली नाही ह्याचे राजाभाऊंना फार समाधान झाले. 



आता येणारा उद्याचा दिवस फार चांगला असणार ही खात्रीच.. सुरवात तर चविष्ट झालीयं.

No comments: