महासुट्टीचा पहिला दिवस उजाडला. राजाभाऊ उठले , तिखटमिठाचा सांजा खावुन झाला. थोडे फार फेसबुकही पार पडले. काही जण सकाळपासुन आतुरतेने वाट पहात होती, राजाभाऊ आज खाद्यसंमेलनाला कुठेशी घेवुन जातात ह्याची.
राजाभाऊंना त्यांचा हिरमोड करणे जिवावर आले. मग काय बेत ठरला . आपल्याच धर्मपत्नीला त्यांनी आदेश दिला, चलो चलते है. मग काय , रहदारीतुन वाट काढत काढत ते सहपत्नीक, सहपरीवारासह अंधेरीच्या "बार्बिक्यू नेशन " मधे जेवायला गेले. अंधेरीच्या त्यांच्या जागेबद्दल बऱ्यापैकी ऐकले होते. ह्या आधी वरळी, साकीनाक्याजवळच्या "बार्बिक्यू नेशन " मधे दोनपाच वेळा जेवण झालेले. येथले जेवण राजाभाऊंनी फारसे आवडतेच असे नाही, पण ठिक आहे.
आज "बार्बिक्यू नेशन " जेवढे खाद्यपदार्थासाठी लक्षात रहातील त्यापेक्षा जास्त ते लक्षात राहिलं ते सर्वांनी ताव मारलेल्या " कुल्फी " साठी. अनेक चवीच्या कुल्फया, सजधजके समोर येणाऱ्या.
मजा आली.
No comments:
Post a Comment