सकाळ झाली राजाभाऊ उठले.
त्यांच्या लक्षात आले अरे आज तर रविवार
लोळत पडले असतांना त्यांची अचानक सरकली तार
आणि राजेशसरकारांनी केला विचार
अबकी बार चलो चलते है युसुफ मेहरअली सेंटर मे करने स्वादिष्ट आहार
असं जेव्हा मनाशी ठरलं तेव्हा वाटले
आता तिला हे सांगितल्यावर नक्कीच बसेल मार.
पण काय सांगावे ती पण लगेच झाली जायला तयार.
मग काय.
चविष्ट वांग्याची भाजी , मुगाची भाजी , मस्तपैकी वरणभात आणि त्यासोबत कैरीचे आचार.
थंडगार कोकमाचे सरबत पितांना जाणवले जेवणामधे असते जर कोकमाचे सार
तर नक्कीच आली असती आणखीन बहार.
No comments:
Post a Comment