"कुल्फी ,कुल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्फी, कुल्फीए "
रस्त्यावरती आवाज ऐकु आला की मग साद घालायची.
"अहो कुल्फीवाले, वर या."
दिवसभर गरमीने पोळलेला देह, थकलेला, भागलेला घरी पोचलेला जीव, जेवण जेवुन झालेले आणि मग थंडगार कुल्फी, दुधाची.
धोंडींबा, त्या पल्याड राजगडाच्या पायथ्याच्या गावचे. दुपारी डोक्यावर कुल्फीचे भांडे घेऊन निघायचे ते पार रात्रीपर्यंत, कुल्फी संपेपर्यंत रस्तावर, गल्लीबोळात भटकत रहायचे.
इतक्या वर्षात काहीच बदल नाही चवीत. बदलले काही गेले असेल तर त्या मटक्याची जागा आता प्लॅस्टीकच्या बालदीने घेतली आणि ती पाने गायब. काडीने कुल्फी चोखुन खाण्यापेक्षा तिच्या गोल चकत्या कापुन पानावर खाण्यात जी मजा होती, कुल्फीबरोबर त्या पानाची देखिल चव घेण्यात जो आनंद होता, तो काय सांगावा.
No comments:
Post a Comment