राजाभाऊंचे मन चलबिचल होवुन गेले आणि मग त्यांच्या मनी कुठेतरी जावुन छानसे गुजराती खाद्यपदार्थ, गुजराती भोजन खावेसे न वाटले तर नवलच. त्यात परत गेली जवळजवळ दहा वर्षे झाली एकाच पद्धतीचे भोजन जेवुन जेवुन , खावुन खावुन वीट आलेला, तोंडाला चव मुळी काही उरलीच नव्हती. मग राजाभाऊंनी ठरवलं.
अब की बार "ठक्कर्स " .
अब की बार "ठक्कर्स " मधे जावुन भोजन करायचे.
पण.
स्वःताची नुसतीच प्रबळ इच्छा असुन काय फायदा ? आपली आवड ही दुसऱ्यांवर नाही लादता येत. आता काही पाहिजे असेल तर दुसऱ्यांना सोबत घेवुन जावे लागते हे जरी खरे असले तरी त्यांची पण साथ मिळायला हवी ना..ह्या खेपेस राजाभाऊंच्या बरोबरच्या लोकांना गुजराथी उपहारगृहामधे स्वारस्थ नव्हते. त्यांची निवड दुसरीच होती. मग काय राजाभाऊंनी त्यांच्याशी तडजोड केली व ते दुसरीकडे गेले.
"ठक्कर्स " . गिरगाव चौपाटी वरचे.
आता इथपर्यंत आलोच आहोत तर वर जावुन मेन्यु पाहुया करत ते आत शिरले. या जागेने त्यांचे मन काबीज केले आहे. पानगी पासुन अनेक गुजराती खाद्यपदार्थ, भोजन , तसे काहीसे पंजाबी भाज्या वगैरे वगैरे.
त्याचे नुतनीकरण होवुन बराच कालावधी लोटलेला. पण जाण्याचा योग जुळला नव्हता. या वेळी आता जुळुन येत होता तर त्यांच्या तोंडी हा गुजराती घास पडणे नियतीला मंजुर नव्हते.
ठिक है. पुढच्या वेळी परत कदाचीत.
No comments:
Post a Comment