Tuesday, April 05, 2022

Spesso

 लोकांच्या खाण्याच्या आवडीनिवडी किती झपाट्याने बदलत गेल्या आहेत, जगभरचे खाद्यपदार्थ मिळणारी कैक नवीन रेस्टॉरंट मुंबई मधे उघडली आहेत आणि त्या वेगात आपण आपल्याला बदलायला कुठेतरी  कमी पडलो आहे ही भावना राजाभाऊंच्या मनात गेल्या काही दिवसात प्रबळ होत गेली आणि त्यांनी मग ह्या प्रवाहात सामील होण्यासाठी आज नरीमन पॉईंट वरच्या नेहमीच्याच "स्टेटस " मधे नव्हे तर त्याच्या बाजुला काही महिन्यापुर्वी उघडलेल्या " Spesso " मधे आपल्या पुतणीच्या अध्यक्षतेखाली खाली खाद्यसंमेलन भरवायचे ठरवले.

काय खाल्ले, काय मागवले हे केवळ त्यांच्या पुतणीलाच ठावुक. बहुदा मॅक्सीकन असावे.  एकतर खाद्यपदार्थांची ही काय भनगड आहे हे त्यांच्या समजण्याच्या पलीकडे झालेले, त्यात परत अंधार , कॅंडल लाईट डिनरसाठी.  मेन्यु वाचतावाचता दमछाक झालेली.

पण एकंदरीत ह्या नव्या वाटेवरुन जाण्याची सुरवात बऱ्यापैकी झाली म्हणायची.

Beach Blanket Bingo

Classic Fiesta Nachos

South Western Chiputle

Mexican Quesadillas






No comments: