अखेरीस रात्री सव्वाअकरा वाजता का होईना पण मिळाला किंवा मिळवला.
मारुतीचा प्रसाद.
"सुंठवडा "
दिवसभर बाहेर पडायचा आलेला कंटाळा.
रात्री काळेकाका आपल्या पुतणीला म्हणाले, चल मरीन ड्राईव्ह वर फिरायला जावु. गाडी वळली पिकेट रोडच्या दिशेने. प्रसिद्ध हनुमान मंदिराकडे.
निराश होवुन काळेकाका गाडीत परतले आणि वैतागुन म्हणाले
" नुसतेच पेढे आणि बुंदीचे लाडु, सुंठवडा नाहीचं "
पुतणी म्हणते कशी "तरी मी विचार करत होते, काका आणि देऊळ ? "
घरी आल्यानंतर लक्षात आले, बाजुच्याच गल्लीत मारुतीचे देऊळ आहे, तेथे भंडारा वगैरे असतो, तेथे प्रसादात सुंठवडा नक्कीच मिळेल.
आणि सुंठवडा नुसताच हातात घेवुन खाल्ला नाही तर बांधुन घरी पण आणलायं.
No comments:
Post a Comment