Tuesday, May 10, 2022

सयाजी

 


ह्या खेपसं गुजराती हवं, गुजराती हवं हा ध्यास घेतलेल्या, हा घोषा लावलेल्या राजाभाऊंच्या मनात नाहे म्हटले तरी किंचीतशी साशंकता होती, आपण म्हणतोयं खरे पण हे कितपत सत्यात उतरेल याची त्यांना धाकधुक होतीच. आणि नेमके तसेच घडले.

भर दुपारी, ऐन उन्हात, तापलेल्या वेळी का कोण जाणॆ पण त्यांना गाडी चालवण्याची एक झिंग चढली होती, कुठेही आता थांबणे नकोसे वाटत होते. बेलापुर आले, मग वाटु लागले, हे गुजराती जेवण जेवल्यावर सुस्ती आली तर , लोणावळा आले, येथे गर्दी असेल तर , त्यापेक्षा आपण पुण्यातच जेवु या हा विचार करत करत मग ते पुण्याला पोचले. 

तेथे पोचल्यानंतर मग त्यांच्या  हे  "गुजराती नको" चे मनाचे खेळ लक्षात आले. त्यांना काळेकाकुं बरोबर "सयाजी " मधे छान पैकी जेवायचे होते.

या वेळचे जेवण खुप आवडले, कदाचित काहीतरी साजरे करायचे असेल तर, तिच्या सोबत निवांतपणे गप्पागोष्टी करत शांतपणॆ चवीचवीने जेवायचे असेल म्हणुन कदाचीत किंवा आपला कॅमेरा बाहेर गाडीत ठेवुन केवळ जेवणावर लक्ष द्यायचे म्हणुन सुद्धा असेल.

या वेळी काहीसे नव्या चवीचे सुप प्यायला मिळाले. गाजर आणि संत्र याचे सुप.

हे असे काही मेन्युत असेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. पण ते मिळाले. ज्याचा शेवट हा "सेमीया पायसम " नी होतो तो शेवट किती गोड असतो.

No comments: