ही सोय ज्या कोणी देव माणसाने केली असेल त्याचे आभार.
भर उन्हाळ्यात उन्हाच्या तुफान झळा मारत असलेल्या तापल्या दुपारी थकल्याभागल्या जीवाला विश्रांतीसाठी कोटा लाद्या असलेले देऊळ म्हणजे स्वर्ग म्हणायला हवे आणि माठात असलेले थंडगार जल म्हणजे जणु अमृतच.
ओझर-लेण्याद्री-जुन्नर व मग आतल्या रस्ते तुडव तुडव तुडवीत खोडद, मलटण मार्गे रांजणगाव , पुढे श्रीगोंदा, पेडगाव करत सिद्धटेक. मोरगाव आणि थेऊर.
एका दिवसात अष्टविनायक मधले सहा गणपतींचे दर्शन.
No comments:
Post a Comment