Tuesday, May 10, 2022

तिखटमिखट उसळमधे न्हाऊन निघालेल्या मऊसुर पावाचा पहिल्या घासापासुन राजाभाऊंचे मन तृप्त होत गेले.

 नाही म्हणजे मनुष्याने नेहमीच मोहाला शरण जावे ही बाब जेवढी खरी तेवढीच राजाभाऊ आज तुम्ही थोडासा का होईना पण जरासा संयम बाळगायला काही हरकत नव्हती ही गोष्टही तेवढीच खरी.

गेला कुठे होतात, कशासाठी गेला होतात ह्याचे काही तरी शेवटपर्यंत भान तुम्ही बाळगायला हवे होतेत राजाभाऊ, भले उकडीचे मोदक तुम्हाला अगदी परमप्रिय असले तरीही. खेड, रत्नागिरी व पावस मधुन घरी भरपुर आबं आलेले. गोड खावुन खावुन, आंबे, आंबापोळी, फणसपोळी, आंबा बर्फी खावुन खावुन जीव तसा कंटाळलेला. 

मेनका, उर्वशी, तिलोत्तमा ह्या साऱ्या अप्सरा समोर आल्यानंतर ऋषींचे भान जसे हरपते अगदी तसचं "विनय हेल्थ होम" मधे चटकदार उसळ समोर आल्यावर आज ह्या राजाऋषींचे झाले. तिखटमिखट उसळमधे न्हाऊन निघालेल्या मऊसुर पावाचा पहिल्या घासापासुन राजाभाऊंचे मन तृप्त होत गेले. समाधानी होत गेले. इतक्या दिवसाच्या गोडुसपणावर हा चवदार उतारा बह्मानंदी टाळी लावुन गेला.

सहजच अचानक नजर एका पाटीकडे गेली. नसती गेली तर चालण्यासारखे होते. काय करु ? 

मागवु ? नको मागवु ? खावु की नको खावु ?

मग समोर आला तो रुप नसलेला मोदक. चवीला चांगला होता खरा, पण शेवटी रुप ही तेवढेच महत्वाचे.


old post




No comments: