Sunday, August 17, 2008

श्रावणातच वेध लागले गौराईचे , हरताळीकाचे




एक दिवस वांग्याचा






सक्काळी सक्काळी उठल्या उठल्या राजाभाऊंनी ब्लॉगच्या दुनियेची मुशाफिरी सुरु केली. पहिलीच पोष्ट डाळवांग्यावरची वाचली. http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/08/eggplant-daal.html
तेव्हा कुठे ठावुक होते, आज दिवसभर वांगीच दिसणार आहेत ?
मंडईत गेलो तेथे वांगी, पहिल्यांदाच फक्त वांगी विकणारे विक्रिते पाहीले, दुर्वांकुर मधुन जेवण घरी आणाले त्यात पण वांग्यांची भाजी.
अरे देवा. नशीब बायकोने सकाळी कांदे पोहे केले, वांगी पोहे नाहीत.

जब जब फुल खिले, तुझे याद किया हमने



यंदाला कारवी फुलली आहेत असे ऐकीवात आहे. मंगळवारी एका धनगरपाड्यात जाणार आहे

माझी श्रावण खाद्ययात्रा - ऐरोळी



Saturday, August 16, 2008

महागाई संगे युद्ध आमचे सुरु, खरेदी करु, खरेदी करु आणि खरेदी करु

स्वातंत्र दिनाचे औचीत्य साधुन समस्त पुणेकरांनी अखिल भारतीय स्तरावरचा नवीन लढा सुरु केला आहे, महागाईच्या विरुद्ध, बिगबाजारच्या सहाय्याने.

काल रात्री अगदी उशीरा पर्यंत पुणेकर शांतपणे रांगेत उभे होते, बिगबाजारच्या बाहेर, खरेदी करण्यासाठी, महाबचत योजनेचा लाभ घेण्यासाठी.
या स्वातंत्र दिन कोणाला कसा भावतो व फळतो हे सांगणे मुश्किल आहे.
या निमित्ते लोकांच्या भावनेवर आरुढ होवुन ही नवी मॉल संकॄती आपले उखळ भरुन घ्यायला शिकली आहे. सर्वत्र सेल चा सपाटा सुरु आहे, कोणी ४० टके, कोणी ६१ तर कोणी अगदी ७० टक्के सुट देणार आहे.

ता.क. राजाभाऊंनी सुद्धा काल या वाहत्या गंगेत आपले हात धुवुन घेतले. नगररोड वरच्या सेंट्रल मॉलमधे, मुलासाठी म्हणुन खरेदी करायला गेले, मुलगा राहीला दुसरीकडे, स्वःतासाठी चांगली पाच शर्टे घेवुन स्वातंत्रदिन साजरा करुन राहीले.

आज चंद्रग्रहण.



आज चंद्रग्रहण.


चंद्र आणि सागर याचे अतुट नाते. जसे चंद्रामुळे सागराला उधाण येते तसे आज या चंद्रग्रहणाच्या निम्मीत्ते बातम्यांच्या वाहीनींना आणि जोतिष्यांना उधाण आले आहे. बातम्या देणाचे आपले काम सोडुन या वाहीन्या भलतीसलती कामे करुन राहीली आहेत.


ग्रहणे , एक साधी सोपी खगोलीय घटना. पण त्या बद्द्ल समाजात किती गैरसमज आणि त्यात अंधश्रध्याळुंच्या मनात भिती निर्माण करण्याची कामे ही पोटभरु मंडळी करत असतात. आज तर कहरच झाला. बहीणीने भावाला राखी केव्हा बांधायची हे सुद्धा हि लोक सांगु लागली आहेत.


या आपल्या बेजबाबदार उद्योगाने आपण समाजाला कोठे घेवुन चाललो आहोत याचेही भान ही मंडळी विसरली आहेत.

कशी गंमत केली !

त्या डायटॆशीयनची म्हटले जराशी गंमत करुया.

- माझी वजन कमी करण्याची इच्छा आहे काय आहार घेवु ?

- अमुक तमुक खा वगैरे वगैरे

- मी व्हिगन आहे. व्हिटॅमीन B१२ च्या कमतरतेसाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करु. ( गुगली )

- तुम्ही दुध घ्या, पनीर चा वापर करा, अंडी पण खावु शकता.

- सपशेल नापास.

एका प्रख्यात औषधे बनवणाऱ्या कंपनीनी काही महिन्यापुर्वी एक प्रामुख्याने डायबेटीस व हृदयरोग आदी विषयांवर एक नेहरु सेंटर मधे शिबीर आयोजीत केले होते. त्यातला हा किस्सा.

व्हिगन जिवनशैली बद्द्ल अजुनही आपल्या कडॆ अज्ञानच आहे अगदी वैद्यकीय क्षेत्रातील माणसांनी मला व्हीगन डायट म्हणजे काय ? हा प्रश्न विचारला आहे.

पाणीच पाणी चहुकडे




काही दिवसापुर्वी राज्यावर पाऊस नसल्यामुळे दुष्काळाचे सावट होते आणि आता . यंदाला पाऊस मुबलक झालाय बर का.


खडकवासला धरणाचे सर्व दरवाजे जेव्हा पाणी सोडण्यासाठी उघडले जातात ते दॄष्य न्याहाळणे हा एक आनंद सोहळा असतो.
काल जायला जरा अंमळ उशीरच झाला.

Friday, August 15, 2008

मुलगा झाला हो

"मला मुलगा झाला" हे सांगतांना त्या गॄहस्थांचा चेहरा नुसता आनंदाने फुलुन आला होता. मग मी ही त्याच आनंदाच्या सुरात त्यांचे अभिनंदन केले.
पण , पुढचे त्यांचे वाक्य ऐकताच मी गप्प झालो.
"आधी मला तीन मुली आहेत. मुलीच्या पाठीवर हा मुलगा झाला."
धन्य.
यांना बायका म्हणजे मुलगा काढण्याचे यंत्र वाटतात की काय ? मुलगा होई पर्यंत उत्पादन सुरु.
नशीब " तॄप्ती " हे नाव मुलांच्या मधे नाही. नाही तर तेच नाव कुलदिपकाला ठेवले असते.

झेंडावंदन समारंभ


स्वातंत्र दिनाच्या दिवशी होणाऱ्या झेंडावंदन समारंभ संबंधी असणाऱ्या अनस्थेबद्द्ल श्री. आनंद घन यांनी अप्रतिम लेख लिहीला आहे. http://anandghan.blogspot.com/2008/08/blog-post_1603.html


आमच्या भल्या मोठया सोसायटीत मोजकीच झेंडा वंदनाला केवळ १०-१२ जणांची उपस्थिती होती. त्यात सुद्ध्या केवळ जेष्ठ नागरीकच प्रामुख्याने होते.


कस व्हायच.
स्वातंत्र दिनाच्या दिवशी होणाऱ्या झेंडावंदन समारंभ संबंधी असणाऱ्या अनस्थेबद्द्ल श्री. आनंद घन यांनी अप्रतिम लेख लिहीला आहे. http://anandghan.blogspot.com/2008/08/blog-post_1603.html


आमच्या भल्या मोठया सोसायटीत मोजकीच झेंडा वंदनाला केवळ १०-१२ जणांची उपस्थिती होती. त्यात सुद्ध्या केवळ जेष्ठ नागरीकच प्रामुख्याने होते.


कस व्हायच.

तंटामुक्त मंत्रीमंडळ

१५ ऑगस्ट २००८ पासून राज्य शासन महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम सुरू करीत आहे. गावातील तंटा गावातच मिटवा आणि गावाला बक्षिसही मिळवा.

अरे वा मस्त योजना आहे.
पण आता ही योजना आपल्या मंत्रीमंडळाला देखील लागु करायला हवे नाही का ? नेहमी बघा कसे आपापसात भांडतच असतात, राजीनामे सादर करत असतात. .

झेंडा उंचा रहे हमारा


झेंडा उंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा

कोण दोषी ?


कोण दोषी ? ही दुचाकी चालवणारी शाळेतली मुले की यांच्या हातात दुचाकी देणारे किंवा कानाडोळा करणारे यांचे आईबाप ?

हे ही बालकामगारच


स्वातंत्र

स्वातंत्र काय फक्त मानवालाच हवे असते ?

आज १५ ऑगस्ट. स्वातंत्रदिना निमित्र हार्दिक शुभकामना

Thursday, August 14, 2008

लिंबाचे गोड लोणचे

श्रावणात लिंबाच्या गोड लोणाच्याची चव काय आगळीच लागते. वालाचे बिर्डे , मुगाचे बिर्दे आणि लिंबाचे गोड लोणचे . गोड आप्पे, ऐरोळी, अळुवडी अहाहा.

स्वातंत्राची साठ वर्षे

अजुनही आपण या बालकांच्या समस्या सोडवु शकलो नाही आहोत.

काय राजाभाऊ

काय राजाभाऊ, "ते" पक्ष सोडुन जाणार तर। या कोँग्रेस संस्कृतीत त्यांचे मन फारसे रमणे कठिणच म्हणायचे

अच्छा लगता है

आधी सांयकाळी घरी परतलो की एकच कार्यक्रम असायचा । संगणकासमोर बसायचे, ब्लॉग उघडुन त्यात रमुन जायचे। बायको आहे, मुलगा आहे याचे भान विसरायचे , पण आता,
वजन कमी करायास ठरवल्यापासुन सांयकाळ एकतर चालण्यात तरी जाते नाही तर कार्यालयातील सुसज्ज जीम मधे तरी। त्या मुळे मग म्हणावेसे वाटते "अच्छा लगता है "
कार्यालयात शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी एवढ्या सुखसोयी असतांना त्यांचा उपभोग न घेणारा मी कपाळकंरंटाच म्हणायचो।

अपमान घोर अपमान

आज म टा ने समस्त भारतावासियांचा अपमान केला आहे।

ऑलिंपिक वर भाष्य करतांना ते म्हणतात " भारत एक सेंकंदाने पुढे जातो तेव्हा जग अख्या मिनिटाने पुढे सरकलेले असत "

चुक साफ चुक,

आपली मोजण्यात चुक झाली आहे। वेळ अर्धा सेंकंद असावा ।

Tuesday, August 12, 2008

राज्यपालपद

राजकारणी व्यक्तीची राज्यपालपदावर नेमणुक केली जावु नये। या पदावर ते फारसे रमतांना दिसत नाही।
मस्त पैकी गिरिस्थानावर थंड हवा उपभोगायची सोडून ते वारंवार आपल्या राज्यात काहीना काही कारणांनी परतुन येत असतात।

भटक्या कुत्र्यांना याद राखा खायला घालाल तर

मुंबई महानगरपालीकेने एक तुघलकी निर्णय घेतला आहे । भटक्या कुत्र्यांना खायला घालाल तर तुम्हाला ५०० रुपये दंड होवु शकतो।
धर्मं सांगतो भुतदया दाखवा, मनपा सांगते याद राखा भटक्या कुत्र्यांना जगवाल तर ।
हे विश्व केवळ आपल्या सर्व मानव जातीसाठीच रहायला आहे हा जो मानवाचा गैरसमज आहे त्यातून हे असे निर्णय घेतले जातात।
एखाद्याला कुत्रा चावला तर टी मोठी बातमी होते , गावात बिबट्या शिरला तर त्याला शेकडो जण मिळुन मारून टाकतात, पण मानवाने आजपर्यंत किती जातिप्रजाती आपल्या मुर्खापणामुळे, हव्यासापायी नाहिश्या केल्या त्याची मोजदात सुद्धा ठेवली जात नाही।
एका वर्तमानपत्राने तर भटक्या कुत्र्यांना खायला घालणारया महिलेस चक्क मानसिक रूग्ण बनावुन टाकल आहे।

दहीहंडी आणि लहान मुले

दहीहंडी फोडण्यासाठी सर्वात वरच्या थराला वजनाने कमी असल्यामुळे लहान मुलांना चढवले जाते जे अत्यंत धोकादायक असुन यात मुले खाली पडुन जायबंदी होण्याची शक्यता असते।

त्वरीत या लहान मुलांचा असा वापर थांबावला जावा

Monday, August 11, 2008

जिंकलो रे

अभिनंदन अभिनव बिंद्रा चे । आज भारताने पाहिले सुवर्ण पदक जिंकले।