Sunday, August 12, 2007

मैदान व अनस्था


कोट्यावधी रुपयाचे उत्पन्न असलेल्या मुंबईतील देवस्थानाच्या अंगणातील, परीसरातील मैदानाची ही दुरावस्था.

मैदान दत्तक घेतले जावे, मुलांना, तरुण पिढीस खेळण्यासाठी त्याचे रुपांतर एका उत्कृष्ट, सुसज्ज मैदानात केले जावे ही सिद्धीविनायकाचरणी प्रार्थना.
लिहीणार- काही तरी करण्याची ईच्छा असणारा

दिवली अमावस्या

उतु नका मातु नका, घेतला वसा टाकु नका, या कथा आता विस्मॄतीत्त गेल्या आहेत.

आज दिवली अमावस्या. दिव्याची पुजा. मग मधरात्री नंतर सारे दिवे माळरानावर जमणार, चर्चा करणार, आज कोणाकडे काय खाल्ले , काय नेवेद्य होता याची . ( आमच्या कडे नारळाच्या करंज्या खाल्यात )

आता वेध श्रावणी सोमवारचे व त्या निमित्ते होणाऱ्या खाद्य महोत्सवाचे. उद्याचा बेत मुगाचे बिर्डे. व बहुतेक आप्पे.


लिहीणारा - खाण्यासाठी जगणारा
- काही खर नाही.

भारत माझा देश आहे



हा भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.


देशातील प्रत्येक बांधवास अन्न, वस्त्र आणि निवारा देण्यासाठी आम्ही कटीबद्द आहोत.


लिहीणार- एक हतबल

- उद्याच्या पिढीचे हे भवितव्य हताशपणे बघणारा.

दिवली अमावस्या




आज दिवली अमावस्या ,गटारी. मग उद्या पासुन श्रावण मास सुरु.
श्रावणात मांसाहार करायचा नाही हे शास्त्रवचन. साऱ्या महिन्याचा कोटा आज कंप्लीट करायचा.
मग महिनाभर मास, मटण, मच्छी खायला मिळणार नाही. माटूंग्याचे गोपी टॅंक बाजार आज ओसांडुन, भरभरुन , वाहत होता, त्यात परत आज रविवार, सुट्टीचा दिवस. मग या गटारीचा स्वाद द्विगुणीत झाला.
लिहीणार - शुद्ध शाकाहारी.
- ज्याने कधीतरी केव्हातरी कोलंबी, पापलेट व काप्री सरंगा चापले होते.

श्री. राहुल देशपांडे


यु खुदा के लीये छीनो ना मेरे होशो हवास । ऐसे गाया ना करो की ख़ुमार आ जाये ॥ (मुळ - ऐसे नज़रोसे ना देखो की ख़ुमार आ जाये). आज दिवली अमावस्या ,गटारी. तुडुंब मदिरापान करुन गटारात लोळायचा दिवस. सकाळी सकाळी मला नशा चढली आहे. तरी पण मी हे पुर्ण शुद्धीत राहुन लिहीत आहे.

कारण ही नशा सुरेची नाही तर सुरांची आहे. तरुण पिढीतील अग्रणीय गायक श्री. राहुल देशपांडेचे गाणे ऐकुन आलेली ही झिंग आहे.

आज मुंबईत कर्नाटक संघात खयाल ट्र्‌स्ट नी पं.कॄष्णराव शंकर पंडीत यांच्या स्मॄती उत्सव निमीत्ते आयोजील्या शास्त्रीय संगीताच्या दोन दिवशीय महोत्सवात श्री. राहुल देशपांडे सर्व रसीकांना राग रामकली, नटभैरव, चीज सावरे आजय्यो, व निर्गुणी भजन गावुन तॄप्त करुन राहीले.

(Video upload pending )

लिहीणार - राहुलजींचा चाहता.

- ज्याला थोडे तरी गाणे कळायला हवे होते.

Saturday, August 11, 2007

बॉलीवूडची अनधीकॄत " पार्टनरशिप " धोक्यात आली की हो

हे काय भलतेच. असे कधी झालय का ? बॉलीवूडची अनधीकॄत " पार्टनरशिप " धोक्यात आली की हो .

"हिच" चित्रपटावरुन प्रेरणा घेतल्या बद्द्ल पार्टनर चित्रपटाच्या निर्मात्यांना कोर्टात खेचण्याची तयारी विल स्मिथ व सोनी पिक्च्रर्सने चालवली आहे असे ऐकले ते खरे आहे का हो ? बहुतेक हे खरे नसावे ना, नाही ना, खर सांगा, गरीबांची अशी थट्टा नका हो करुत. ही उचलेगिरी खरच नाही हो, हा असलाच तर निव्वळ योगायोग आहे की हो.

नका हो नका असे काही तरी भलतेसलते करु. सायबांनु, हा दावा मान्य झाला तर आमच्या सर्व बॉलीवूड मधल्या गरीब बिच्चाऱ्या प्रतिभाशाली. प्रतिभावंतांच्या पोटावर पाय येयील ना हो, त्यांनी याचा पुढे कोण्याच्या तोडाकडे आपल्या रोजीरोटि साठी पाहावे ? नका हो नका त्यांच्या पोटावर असे मारु नका हो.

दादा, केवळ पडदयावरील चित्रे तीन तास सतत हलत रहावी येवढाच प्रामाणिक व शुद्ध हेतु पार्टनरच्या निर्मात्यांचा आहे हो. पैसे कमावायचा हेतु खरच नाही. अगदी गळ्याची शप्पथ.

दादानों, असा नका हो अनिष्ट पायंडा पाडुत हो, मग जगातुन किती आणि कोण कोण उठेल व अश्याच कॉर्टात केसीस करत बसेल. आता या वयात देव आनंदवर ग्रेगरी पेक नी माझी नक्क्ल का केलीस म्हणुन केस केलीत तर कॉटाची पायरी चढायची वेळ येईल की हो. आणि चित्रपटसंगीताचे काय होईल त्याचा पण जरा सहानभुतीने विचार करा ना, गाण्याशिवाय सिनेमे, आईग्ग, विच्चार सुद्धा करवत नाही हो.

ओ, राव ऐका की जरा. लोक म्हणतील पार्टनर ऐवढा भिक्कार तर मुळचा हिच किती वाईट असेल. पहा बरे तुमच्याच धंदयावर वाईट परीणाम होईल. परत विचार करा. तुम्ही तर आमच बॉलीवुडच बंद करायला निघालात. एवढ दाताच्या कण्या करुन सांगतो तर कळत नाही का ?

ऐ, आमचच ओरीजीनल हाय लक्षात ठेवा, तुमीच लबाडी करुन चित्रपट आधी प्रकाशीत केलात. जा काय करायच ते करा. कल्पना काय तुम्हालाच सुचतात ? आम्हाला नाही काय ?

Thursday, August 09, 2007

इंद्रायणीकाठी

इंद्रायणीकाठी चोरांची आळंदी, जाहली समाधी बंगल्यांची हो बंगल्याची । इंद्रायणीकाठी ।

ग्राहकराजा, हो, कार्ल्याला बुडतो पाण्यात, नाचती सरकारी नोटीसी मागे पुढे ॥

मागे पुढे दाटे भरावांचा अडथळा, अंगणात पाणी पुराचे हो ।

केडिया आणि दलाल, बिल्डरा, मायबापा ॥

पुरात राहीले गॄहप्रकल्पांत फसुन, मारोती, राजन, मेघाबाई॥

(क्षमा असावी चुकभुल दयावी घ्यावी)

संदर्भ- सकाळ- इंद्रायणीच्या पाण्यात बुडाली अतिक्रमणे
पुणे, ता. ८ - ज्या गृहप्रकल्पांनी कार्ला (ता. मावळ) येथे इंद्रायणी नदीच्या पात्रात अतिक्रमणे केली, ते दोनही प्रकल्प आता इंद्रायणीच्या पाण्याखाली पूर्णपणे गेले आहेत. एवढेच नव्हे तर यामुळे कार्ला परिसरातही पाण्याची पातळी वाढली असून, त्यामुळे पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, या प्रकल्पांच्या कामाला मनाई करण्याची मागणी करणाऱ्या दाव्याचा आज (गुरुवार) निकाल आहे. ........कार्ला येथे बांधकाम व्यावसायिकांनी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकला आहे. केडिया आणि दलाल या दोन बांधकाम व्यावसायिकांनी थेट नदीपात्रातच बांधकाम केले आहे. त्यामुळेही नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे. ही बांधकामे पूररेषेच्या आत आहेत. त्यामुळे साहजिकच ही बांधकामे पुरात बुडाली. मात्र याचा धोका परिसराला होत असून, पुराचे पाणी जास्त भागात यंदा पोचले. त्यामुळे ही अतिक्रमणे हटविण्याची मागणी होत आहे.

Tuesday, August 07, 2007

Flower Surprise

हि परी खरी आहे का हा केवळ पुतळा आहे ?


ओळखा बघु यात माणुस कुठे आहे ?

दुबई मधील बर्जुमान या मॉल मधे समर फेस्टीवल मधले Flower Surprise.

केक





हे मनमोहक केक पाहिल्यानंतर जरी "जी ललचाये रहा न जाये " अशी मनाची खुळावलेली अवस्था झालेली असली तरी प्रत्यक्षात हि अप्रतिम कलाकॄती कापण्यासाठी हात धजावत नाहीत.
पण अखेरीस लालच बहुत बुरी बला है !!

दुबई मधील बर्जुमान या मॉल मधे समर फेस्टीवल मधे हे सारे पाहिले की मन थक्क होते.

तुम्हाराही बराबर, और तुम्हाराभी बराबर

मटण कैसा किलो ? मटण कैसा किलो ? हाताची दाही बोटे मटणवाल्यापुढे सतत नाचवत भाउंनी विचारले. दाही बोटात चांगल्या सोन्याच्या घसघसीत अंगठया होत्या. या वैभवाच्या अती प्रदर्शनाने दुकानदार चांगलाच वैतागला.

मटण सौ रुपय्या किलो, सौ रुपय्या किलो, आपली संपुर्ण बत्तीसी विस्कारुन, दुकानदाराने भाव सांगितला. त्याचे बत्तीस ही दात सोन्याचे होते. झाले दोघांची लग्गालग्गी, गुद्दादुद्दी सुरु झाली. भांडण सरपंच बाई पर्यंत पोहोचले. दोघांचे म्हणणे ऐकल्या नंतर बाईंनी आपला फैसला सुनावला.

मान उजवीकडे वळवुन भाऊरावांकडे बघुन त्या म्हणाल्या तुम्हारा ही बराबर. मग हळुवारपणे मान डावी कडे वळवुन मटणवाल्याला म्हणल्या तुम्हाराभी बराबर.

सरपंचबाईच्या कानात भल्यामोठाल्या हिऱ्याच्या कुडी होत्या.

सध्या महाराष्टात दोन राजकीय पक्षातील युती तोडण्या / रहाण्या वरुन होण्याऱ्या कुरबुरीवरुन ,युक्तीवादाबद्द्ल ही असेच म्हणावेसे वाटते. तुम्हाराही बराबर, और तुम्हाराभी बराबर

CAKES

Sunday, August 05, 2007

सौ. अमिता गोखले - राग तोडी

विनामुल्य कार्यक्रम व निमंत्रणपत्रिका

बरेचसे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम विनामुल्य असतात. बऱ्याचदा चांगल्या कार्यक्रमाची एक पुर्वाअट असते. विनामुल्य निमंत्रणपत्रिके विना (फ्री पासाशिवाय) प्रवेश नाही. त्याचे फ्री पासेस चे वितरण काही दिवस आधी सभागॄहात केले जाते. अर्धेअधिक पासेस संयोजकानी स्वःता वाटण्यासाठी ठेवलेले असतात.
विनामुल्य पासेस म्हटल्यावर बऱ्याच व्यक्ती अनेक पासेस घेवुन जातात. जास्तीचे असलेले बरे. ऐन वेळी कोणी मागितले तर? या शुद्ध (?) हेतुने. तसेच अनेक वेळा संयोजकांकडेही ते पासेस तसेच पडुन रहातात.

फुकटचे पासेस घेवुन गेलेली माणसे कार्यक्रमाला येतातच असे नाही. परीणामी कैक वेळी सभागॄह अर्धेअधीक रिकामे असते, सर्व पासेस संपलेले असुन सुद्धा. दुसरी बाब म्हणजे या पासेसचे वितरण ज्या वेळेत केले आते तेव्हा आपण कार्यालयात असतो. पासेस आणायला जाणे जमत नाही.

ह्या पेक्षा सभागॄहात कार्यक्रमाच्या वेळेस रसिकांना रांगेने, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार शिस्तीने प्रवेश करु द्यावा. पासेस छापणे, वाटणे व ते आणणे याचे श्रम व पैसा दोन्ही वाचतील.
किंवा निमंत्रणपत्रिकेचे नाममात्र शुल्क आकारावे, जेणे करुन फुकट्यांना आळा बसेल.

राग शुद्ध सारंग- पं.शशांक कट्टी व चिराग कट्टी - जुगलबंदी

पं. शशांक कट्टी व चिराग कट्टी / सौ. अमिता गोखले


आज कितीतरी दिवसांनी सुरेल सतार ऐकली. पं. शशांक कट्टी व चिराग कट्टी यांच्या सतारजुगलबंदीचा छानसा कार्यक्रम प्रो. देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझीक मधे झाला. सुरवातीचा राग होता नटभैरव, मग शुद्ध सारंग.


पं. शशांक कट्टी हे त्यांच्या संगीतोपचारा बद्द्ल प्रसिद्ध आहेत. अनेक रोग संगीताने बरे करता येतात. या साठी ते कार्यशाळा आयोजीत करत असतात. या विषयी त्यांच्या अनेक सी.डी व कॅसेटस ही उपलब्ध आहेत. (माझ्याकडे त्यांची चिंता व निद्रानाशावर उपचार करणारी कॅसेट आहे. )

त्या आधी सौ. अमिता गोखले यांचे गायन झाले. त्यांनी तोडी व देवगिरी बिलावल गायला.
मजा आली.

आता वेध १० तारखेला नेहरु सेंटर मधे असणाऱ्या श्रीमती. अश्विनी भिडे देशपांडे यांचे गाणे ऐकण्याचा.

पं. शशांक कट्टी व चिराग कट्टी / सौ. अमिता गोखले




आज कितीतरी दिवसांनी सुरेल सतार ऐकली. पं. शशांक कट्टी व चिराग कट्टी यांच्या सतारजुगलबंदीचा छानसा कार्यक्रम प्रो. देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझीक मधे झाला. सुरवातीचा राग होता नटभैरव, मग शुद्ध सारंग.



पं. शशांक कट्टी हे त्यांच्या संगीतोपचारा बद्द्ल प्रसिद्ध आहेत. अनेक रोग संगीताने बरे करता येतात. या साठी ते कार्यशाळा आयोजीत करत असतात. या विषयी त्यांच्या अनेक सी.डी व कॅसेटस ही उपलब्ध आहेत. (माझ्याकडे त्यांची चिंता व निद्रानाशावर उपचार करणारी कॅसेट आहे. )



त्या आधी सौ. अमिता गोखले यांचे गायन झाले. त्यांनी तोडी व देवगिरी बिलावल सुरेख गायला.
मजा आली.



आता वेध १० तारखेला नेहरु सेंटर मधे असणाऱ्या श्रीमती. अश्विनी भिडे देशपांडे यांचे गाणे ऐकण्याचा.

Saturday, August 04, 2007

indori topi


आपण जगा व दुसऱ्याला जगु द्या.

दि.३ ऑगस्टच्या म.टा.मधे एका वाचकाने लिहीलेल्या पत्रात, भटक्या कुत्रांविषयी आपले मत प्रदर्शित केले आहे. यात त्यांनी मुबई महानगरपालिकेचे आयुक्तांच्या "भटक्या कुत्रांना मारलेच पाहिजे " या मताची भलावण केली आहे. खरे म्हणजे एक महत्वाच्या सरकारी अधिकारी व्यक्तीनेच असे विधान करणे हिच मुळात दुर्देवाची गोष्ट आहे. हे वाचक पुढे लिहीतात " एक वेळ अशी येयील की, माणसे कमी व कुत्रांची संख्या जास्त असेल. आणि हा हा म्हणता मुंबई शहर हे कुत्रांचे शहर म्हणुन गिनीज बुकात नोंद होईल."
माणसाने अतिशयोक्ती करावी ती तरी किती? केवळ आपले म्हणणे मांडण्यासाठी? दुसऱ्या प्राण्याला, जीवाला कोणत्याही कारणाशिवाय मारुन टाका हा अनाहुत सल्ला देण्याआधी मानवाने, मानवाचीच संख्या नियंत्रीत ठेवली तरी पुरेसे आहे.

या वसुंधरेवर जगण्याचा मक्ता फक्त आपणच घेतला आहे हा गोड गैरसमज मानवाने करुन घेतला आहे. आपणच या पॄथ्वीलोकावरच्या किती जाती प्रजाती, प्राणी, पक्षी, किटक , एक जीवनचक्र नष्ट करतो आहोत याचे त्यांनी कधी भान ठेवले आहे का ? कधी खाण्यासाठी, कधी शिकारी साठी, कधी आपल्या शौक खातीर, मजे खातीर, छंदाखातीर, खोट्या समजुतीपायी.

केवळ आपल्या स्वार्थासाठीच त्याने जंगलेच्या जंगले नष्ट केली, निसर्गाचा तोल बिघडवला आणि आता पुरातन काळापासुनचा मानवाचा सोबती असलेला कुत्रा त्याला नकोसा झाला आहे ? का ? तर हे भटके कुत्रे म्हणे रस्तावरुन जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना चावत असतात म्हणुन ? असे किती कुत्रे किती जणाना चावले असतील बरे? आपण हे विसरतो की त्या पेक्षा जास्त, माणसेच इतर माणसांवा चावत असतील, त्रास देत असतील , आपले रोजचेचे जीवन बऱ्याच वेळा दुसऱ्या माणासांनी असह्य करुन ठेवेलेले असते. आणि हो, या पेक्षा जास्त संहार मानवानेच, मानवाचा युद्ध्यात केला आहे, धर्माच्या नावाखाली केलेल्या दंगलीत केला आहे, चोरी, डाका, दरोडेखोरी, लुटमार, करताना केला आहे.

या भटक्या कुत्रांना माया द्यावी,त्यांना लळा लावावा असे आपल्याला कधी वाटतच नाही का? खर बघायला गेले तर ते कुत्रे प्रामाणीकपणे, रात्री बेरात्री आपल्या सोसायटीत, गल्लीत, रस्त्यावर न सांगता कोणत्याही मोबदल्याशिवाय पहारा करत असतात. त्यांची आपल्याला हॊ मोलाची मदत होत असते. बाहेरील माणसांवर त्यांचे बरोबर लक्ष असते.

मधे तर एका गॄहस्थाने चक्क महात्मा गांधीजीची साक्ष काढली होती, गांधीजीचे ही भटक्या कुत्रांना मारले पाहीजे असे मत असल्याचे पत्र लिहीले होते. बहुदा या सदग्रुहस्थांना पिसाळलेला कुत्रा व भटका कुत्रा यातला फरक जाणवला नसेल.

आपण जगा व दुसऱ्याला जगु द्या.

Friday, August 03, 2007

बिचारा ??

नो कॉमेंटस

फुलांची रांगोळी


संथ वाहते कॄष्णा माई । तीरावरल्या कचरा,घाणीची जाणीव तिजला नाही ॥





देवालयाच्या सुरेख दगडी भिंतीवर भल्यामोठाल्या अक्षरात त्यांनी महत्वाची सुचना ठेवल्या रंगवुन ठेवल्या आहेत. " सुचना क्र. ३ . देवालयावर जाहीराती. बोर्ड लावू नये. देवालयावर, भिंतीवर काहीही लिहू नये." केवढा मोठा हा विनोद. आपणच हे सारे लिहुन, रंगवुन ही पेशवेकालीन दगडी वास्तु विद्रुप केली आहे ह्याची ना जाणीव ना खेद, खंत.

आणि या साऱ्या परीसराततील अस्वच्छता पाहीली की मन विषण्ण होते. पवित्र कॄष्णानदीच्या घाटांची लोकांनी घाण टाकुन अक्षरशा माती केली आहे. हा सारा परीसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी कोणाची ?
तीर्थक्षेत्र वाई, ढोल्या गणपती मंदीरा बाहेरील हा परीसर. २७ जानेवारीला आम्ही दर्शनाला गेलो होतो तेव्हाची ही परिस्थीती. जेव्हा व्यवस्थापकच दोषी असतील तेव्हा दाद कोणाकडे मागावी?

Thursday, August 02, 2007

गुरु श्री. विभव नागेशकर

गुरु श्री. विभव नागेशकर, माझ्या आवडते एक व्यक्तीमत्व. एक जेष्ठ तबलावादक.
मुंबई विद्यापीठात गुरुपोर्णीमेच्या निमीत्ते त्यांचे एकल तबला वादन झाले.
त्यांच्या आधी व्यासपिठावर सीनेअभिनेत्री जुही चावला गावुन गेली. तीचे गाणे त्यापेक्षा तीचे गॅमर, संपल्यानंतर, मिडीयाची नौटकी संपल्यानंतर हॉल जवळजवळ रिकामा झाला.
मागे राहीली ती शुद्धता. मोजकेच जाणकार रसीकांचे मन गुरु श्री. विभव नागेशकरांच्या तबला वादनाने समाधानाने भरुन गेले.
आता प्रतीक्षा गुरु श्री. विभव नागेशकरांच्या शिष्यांनी केलेल्या गुरुपौर्णीमे च्या कार्यक्रमाची

Wednesday, August 01, 2007

जुही चावला नी गायलेला मिया का मल्हार - ऐका

एक सफर सराफाची, इंदौर ची. बचेंगे तो और भी खायंगे.

ओ बॉगवाले भय्या, जन्माला यावे, मस्तपैकी मनसोक्त्त खावे, पण चवीचवीने, आस्वाद घेत, तबीयतनी, मग सराफात न जावुन कसे चालेल? इंदौरला यावे, रात्रीअपरात्री राजवाडयाजवळील सराफ्यात फेरफटका मारावा व तब्बेतीने एकसोएक बढीया पदार्थ खावे, वर मस्तपैकी रबडी, मालपुवे, खावुन शीकंजी रिचवावी, आयुष्य सार्थकी लागले म्हणायचे. वैशिष्ट म्हणजे खाण्याचा प्रत्येक पदार्थ सजधजके आपल्या पुढे नजाकतीने पेश केला जातो, त्यानेच मन कसे प्रसन्न होते.

इंदौरला छप्पन बझार तसा आमच्या घराजवळ. सर्वप्रथम विजय चाट हाउस मधे गरमागरम खोबरा कचौरी, पॅटिस, ते पण लाजबाब तिखटमिखट, गोड, चटण्यात डुंबलेले, हाणावे. वरती बटाट्याचे आवरण, आत मधे खुसखुशीत खोबऱ्याचे सारण, चोय. मग दोन पावले जरा चाललो की "मधुरम" हे सुप्रसिद्ध मिठाईचे दुकान लागते, तेथे मधे गुलकंद भरलेली काजुकतरी मिळते तीचा आस्वाद घ्यावा, जवळील ओम के नमकीन मधे जावे, नमकीन चे शेकडो प्रकार बघुन पागल व्हावे, नमकीन हाणत घरी परतावे हा एक दिनक्रम. मग कधीतरी उपवासाच्या दिवशी कोठारी मार्केट समोर फरीयाली साबुदाणा खिचडी खायला जावी. आपण खातो ती साबुदाणा खिचडी एकदम सपक. रसहीन. रंगहीन. खिचडीवर साध्या, तिखट बटाटा वेफर्सचा, सळी, जाळी वेफर्सचा चुरा पेरावा, लालचुटुक डाळीबाचे दाणे, तिखटमाखट शेंगदाणे पेरावेत, रंगांची उधळाण जराशी वाढावी म्हणुन बारीक चीरलेली कोथींबीर पेरावी, मग मसाला भुरभरावा, खावी पण वेफर्सच्या साहाय्याने. मग समोरील स्टॉलवर फ्रुटचाट खावा, ब्रम्हानंदी टाळी.

पण ही म्हणजे एक रंगीत तालीम. सराफ्याची चव घेण्याआधीची. सावधान. सराफात प्रवेश करताना काळजी घ्यावी. सकाळी आहार माफक असावा, पोट पुरते रिकामे असावे, मुखवास, पाचकचुर्ण, हिंगगोली, जीरागोळी, आल्याचा रस, वेळप्रसंगी जेलुसील वगैरे तयार असावे, अती खाण्याने त्रास होवु शकतो, पण तो वेळोप्रसंगी सहन करण्याची तयारी ठेवावी, सकाळी बायकोला घेवुन सराफा मधे गेलो कि दागदागिन्याच्या मोहापायी खुप खर्च होण्याची शक्यता असते.

रात्री सराफातील सोन्याची दुकाने बंद झाली की मग त्याचे रुप पालटू लागते. हलवाई आपले थाळे घेवुन रस्तावर प्रगट होवु लागतात. जातीच्या खव्वयांची वर्दळ वाढू लागते, रात्र उत्तरोत्तर रंगु लागते. थाळ्यांवर, कलथे आपटल्यावर त्यातुन निर्माण होणारा मधुर नाद कानी पडाता, भुक प्रज्वलीत होवु लागते.

सराफाची प्रवेशाची सुरवातच मोठी लज्जतदार असत, दोन्ही अंगाला खुप चांगली दुकाने आहेत. उजवीकडील विजय चाट हाउस मधे प्रथम गरमागरम खोबरा पॅटीस, कचौरी (चटणी मारके) खावेत, पॅटीसची चव चटणीमुळे वाढते की चटणीची चव कचौरी मुळे, या वादात जास्त लक्ष न घालता, बाजुलाच फळांचे रस व आईस्क्रीम चे दुकान आहे, त्यात तहान भागवण्यापुरते रस पियावा, डाव्या बाजुला मग गरमागरम भल्यामोठाल्या कढईतील गुलाबजामुन मोहवीत असतात. पण ते जास्त हादडुन चालण्यासारखे नसते, कोणा लेकाला पहिल्याच फेरीत गारद होण्याची इच्छा असते? वरती परत मालपुवे ने नॉक आऊट होवुन सुद्ध्या चालणार नसते. बचेंगे तो और भी खायंगे.

मग आत शिरले की डाव्या हाताला लागते ते दुकान ज्यात, जगप्रसिद्ध, सुविख्यात " जोशी के दहिबडे " मिळतात, काठोकाठ दह्याने भरलेला द्रोण त्यातले ते वडे, हा द्रोण भरताभरता दुकानदार हवेत उंच कसा उडवतो ते न्हाहाळत मटवावेत. होशीयार , खबरदार, अजुन तळलेले गराडु, वर लिंबु पिळुन, मसाला भीरभीरुन, सादर केलेले चाखायचे आहेत. जर "भुट्टे का कीस" नजर अंदाज झालाच तर या चुकीस क्षमा नाही. आपल्याला रताळाचा कीस, बटाट्याचा कीस खाल्यामुळे माहीती आहे, पण मक्याच्या दाण्याचा हा आपल्या पुढे नजाकतीने, आब राखुन, थाटात पेश केलेला हा भुट्टे का कीस , आपणच संस्थानीक असल्याचे जाणवुन देतो.

आता गोड जास्त झाल्यावर या वर उतारा म्हणुन मग तिखटाला छोलेपॅटिस, आलु तिक्कीया बरे शोभतात. मग गव्हर्नरची गाडी साठी रस्ता मोकळा करायलाच हवा, अरे जिलेबीवाले भय्या, एक किलो जिलेबी खिलाईये. मग आपल्या समोर हलवाईजी जिलेबी करायला घेणार. आपल्या कडॆ मिळतात तश्या लहान लहान आकाराच्या नव्हे तर एकच भली मोठी. जी खायला काळीज ही सिंहाचे लागते. आपल्या कडच्या चार-पाच जिलेबी जरी खाल्या ना तर त्या केवळ दातामधल्या कॅवेटीतच जातात, पोटात जाणे दुरच. वर एक ग्लास गरमागरम दुध, तबियत खुश झाली पाहिजे.

हे सारे खावुन झाले की अखेर भैरवी, शिकंजी किंवा रबडी शिवाय सुटका नाही.

हे सारे पचायला मदत हवीच. मुखवास, जीरागोळ्या चघळत तबीयतशीर घरी परतावे.

मग कधीतरी रात्री काचमंदीर समोरील उपहारगृहात जावे. किंवा सराफामधील राजहंसमधे, तेथे डालबाफले मिळतात ते भरपुर किलोकिलोनी तुप घालुन खावे.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठावे ते केवळ राजवाडयाजवळ पोहे खाण्यासाठी व पलाशिया तील अगरवाल या मिठाईच्या दुकानात किंवा छावणी मधील मथुरावाला मधे मिठाई खाण्यासाठीच.

मन तॄप्त, चीत्ती समाधान.

नैना न माने मोरा । छ्तिया थरक गई रे पियरवा