१९८३-८४ चा पावसाळा. गिर्यारोहणाचा प्रसार आपल्याकडे चांगलाच होवु लागलेला. एका गिर्यारोहण संस्थेचे आम्ही पाच-सहा जण निघालो , वांगणी रेल्वे स्थानका समोर दिसत असलेल्या नाखिंड्यावर, "क्ष" च्या नेतॄत्वाखाली.(ज्याने पुढे कोकणकड्यावर आपले जिवन संपवले )
त्या वर्षी कारवी छानपैकी फुलली होती, सर्वत्र हिरवेगार गवत माजुन राहिलेले पण त्याचबरोबर बऱ्याच पायवाटा गवतामुळॆ गायब झालेल्या. रमतगमत वर चढता चढता मधेच केव्हातरी वर चढता चढता आडवा आला तो एक रॉकपॅच, सोबत रोप बहुधा नसावा, शेवाळलेली, निसरडी ती खडकांची भिंत चढुन वीर वर सरकले खरे , पण परत त्या मार्गाने उतरणॆ नको करत, ते धाडस त्यांच्यात जरा अंमळ कमीच होते.
नाखिंड्यापर्यंत ते मस्तपैकी मग पोचले. जेवण, विश्रांती वगैरे झाल्यानंतर आमच्या नेताजींनी निर्णय घेतला वरची धारेवरुन ट्रॅवर्स मारुन पेब कडे उतरायचे.
पावसाची चांगल्या पैकी संततधार लागलेली. बऱ्याच वेळ चाल चाल चालल्या नंतर देखील त्या धारेवरुन खाली उतरलेल्या वाटा काही सापडॆनात. त्यात परत मधे मधे ती धार अरुंद झालेली त्यात निसरडी वाट , वेळ भरभरा पुढे सरकु राहिलेला, संध्याकाळ जवळ येवु लागलेली.
या धारेवर रात्री अडकलो तर ?
या धारेवर रात्री अडकलो तर ?
नेताजींनी परत मागे फिरण्याचा निर्णय घेतला. पण फार पुढे जावुन परत मागे फिरेपर्यंत चांगलाच कालव्यपय झालेला. परत त्या नाखिंड्याला पर्यंत जाणे वर चढुन जावुन आलेला रस्ता धरुन खाली उतरणॆ, हळुहळु अंधारुन येवु लागले. सर्वात वरच्या धारेवरुन परत खाली उतरायला वाट गवसेना. बऱ्याच वेळ शोधाशोध केल्यानंतर अंधाराने आपल्या सर्व मार्ग बंद केले आहेत हे जाणवले. जेवणखाण सकाळीच संपलेले, निदान पटकन नाखिंड्यात खाली उतरुन त्या कपारीत मुक्काम केला असता तर तेही नाही.
मग काय शिलेदार बसले रात्रभर अंधारत तसेच चिखलात, निवंडुंगाच्या जाळीजवळ पावसाचा मारा , असह्य थंडीने कुडकुडत, उपाशी पोटी , आपल्या घरचे आपली काळजी करत असतील या विचाराने काळजी करत. मधेच केव्हातरी खेकडे अंगावरुन फिरत असावेत. बसल्याजागी बसल्याबसल्या झोप तर शक्यच नव्हती. पाऊस रात्रभर झोडपुन राहिलेला.
दुसऱ्या दिवशी मग सकाळी केव्हातरी ती वाट सापडुन गेली.
3 comments:
एकदम थ्रिलर आहे.
भारी अनुभव एकदम... ह्या "क्ष" बद्दल ऐकलयं... त्यानं असं का केलं?
त्याने कोकणाकड्यावरुन का आत्महत्या केली हे नाही समजले.
Post a Comment