Sunday, January 03, 2010

श्री. समीर राव -ज्यांची बासुरी ऐकुन प्रत्यक्ष श्रीकृष्ण देखील भुलतील
ज्याच्या नववर्षाची सुरवात सुरमयी होते, ज्याची संध्याकाळ सुरांनी भारावलेली , मोहुन जात असते , ज्यांना सुरांची धुंदी चढते, ज्यांना ते सुर गुंगावुन टाकतात, ज्यांच्या मनाला ते शांतावस्थेत घेवुन जातात ते मोठे भाग्यवान असतात.

आणि ज्या प्रतिभावंत कलावंतामुळे त्यांना जीवनाचा आस्वाद घेण्याची उर्मी , जीवन जगण्यासाठी उर्जा मिळते त्या कलावंतांचे दिव्य अनुभवाची प्रचिती दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात.

ज्यांची बासुरी ऐकुन प्रत्यक्ष श्रीकृष्ण देखील भुलतील अश्या तरुण आणि अप्रतिम, सुरेख आणि सुरेल बासुरी वाजवणाऱ्या म्हैसुर निवासी श्री. समीर राव यांचे बासुरीवादन काल "स्वरांगण " या संस्थेंने विलेपार्ले येथे आयोजीत केले होते.

पंधराएक दिवसापुर्वीच श्री. समीर राव यांचे बासुरीवादन स्वामी हरीदास संगीत संमेलनात राजभाऊंनी ऐकले होते. पण तेथे कलावंतांना कला सादर करण्यासाठी मर्यादीत कालावधी दिला जातो , त्या मुळे मन कसे अतॄप्त होते.

काल मन कसे बासुरीवर हेमवती, मालकंस व आसाममधील एक गीत ऐकतांना तृप्त झाले.

मजा आली.

3 comments:

yog said...

कुछ दर्द है मुत्रिबों की लय में
कुछ आग भरी हुई है नय में

Gouri said...

तुमच्याकडून कही शिकायचं ठरवलं आहे. पुण्यात संगीताचे एवढे कार्यक्रम होतात, पण काही न काही कारणाने जाणं होत नाही ... हे सगळे कार्यक्रम आपल्या रुटीनमध्ये बसणारे नाहीत असं बहुतेक मनात कुठे तरी ठरलं आहे. तुमच्या ब्लॉगवर कार्यक्रमांविषयी वाचताना जाणवत होतं आपण किती आनंदाला विनाकारण मुकतो आहोत ते .. यंदा काही नाही तर किमान सवाई गंधर्वच्या एका सत्राला तरी जायचंच असं ठरवलं,आणि किती तरी महिन्यांनी (का वर्षांनी?) समोर बसून मैफिल ऐकण्यातला आनंद अनुभवला!

HAREKRISHNAJI said...

अरे वा. मजा केलीत तर. मी अजुन एकदाही सवाईला गेलेलो नाही