Sunday, January 17, 2010

मराठी ब्लॉगर्सचा स्नेह मेळावाब्लॉगर्सचा स्नेह मेळावा - पुणे

आज पुण्यात मराठी ब्लॉगर्सचा स्नेह मेळावा भरला होता. इंटरनेट वर आपण नेहमीच भेटतो, पण प्रत्यक्षात भेटुन एकामेकांशी ओळख करुन घेण्यासाठी, या माध्यमातुन आपले विचार मांडण्याच्या या प्रकाराला एक दिशा देण्याच्या उद्देशाने, हे ब्लॉगविश्व अधिक समृद्ध करावे, ते अधिक लोकांपर्यंत पोचवायचे आदी साऱ्या विचाराने.

या उपक्रमाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला, जेवढी ब्लॉग लिहिणाऱ्यांची उपस्थिती होती त्याच्या जास्त पट या विषयी जाणुन घेण्यासाठी जमली होती.

अनिकेत समुद्र व सुरेश पेठे यांनी हा सारे कशासाठी हे सांगीतल्या नंतर "स्टार माझा " चे श्री. प्रसन्न जोशी यांनी मार्गदर्शन केले.

आज अनेक जाणकरांची, मान्यवरांची या संमेलनामधे ओळख झाली.

हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही हे, तिचा दर्जा इतर भाषाप्रमाणेच आहे हे सत्य वर्तमानपत्रात अनेक लेख लिहुन लोकांपुढे आणणाऱ्या श्री.सलील कुलकर्णी यांच्याशी परिच झाल्याने खुप आनंद झाला.

"शब्दबंध" चे श्री.प्रशांत उदय मनोहर यांनी अमेरीकेवरुन हा मेळावा सुरु असतांना दुरध्वनीवरुन या मेळाव्याला शुभेच्छा दिल्या, व पुढील "शब्दबंध" चा उपक्रम येत्या जुन मधे होणार असुन त्यात अधिकाधीक ब्लॉगर्सनी सहभागी व्हावे असे आवाहान केले.

7 comments:

कांचन कराई said...

वा! थोडक्यात पण छान वृत्तांत दिलात. फोटो दिल्याबद्दल आभार.

सिद्धार्थ said...

फोटो अपलोड करण्यात पहिला नंबर लावलात. धन्यवाद.

सिद्धार्थ said...

फोटो अपलोड करण्यात पहिला नंबर लावलात. वाटच पहात होतो. धन्यवाद.

भानस said...

फोटो व वृत्तांन्त वाचूनच किती उत्कृष्ट व दणकून हा स्नेह मेळावा झाला असेल याची कल्पना येतेच आहे. आपले अनेक आभार. मला येता आले नाही ही खंत राहीलच.

Admin said...

हो,
मला पण मिट ला जायचं होतं पण वेळेवर वेगळचं काम निघालं म्हणुन जमलं नाही.
पुढच्या वेळी नक्की येईन

प्रभाकर फडणीस said...

अरेरे! मी सध्या भारतात नाही त्यामुळे या मेळाव्यात सहभागी होतां आलें नाही. जास्त खुलासेवार अहवाल लिहा.

HAREKRISHNAJI said...

कांचन कराई,

आपण याल अशी आशा होती. या मेळाव्याला खुप मजा आली.

सिध्दार्थ,

धन्यवाद.

भानस, Admin,


आपण हे सारे मीस केलेत.
शब्दबंधच्या नेट मिटींग मधे जुनमधे सहभागी व्हा की.

श्री.प्रभाकर फडणीस,

या मेळाव्यात का कोण जाणे पण आपली आठवण मला प्रकर्षाने होत होती.
खुलासेवार अहवलासाठी लिंक ब्लॊगवर दिलेली आहे