एखादी सुंदर कलाकृती तुम्ही पहाता, एखादी गाण्याची अगदी रंगलेली जमलेल्या महफिलीचे तुम्ही साक्षीदार असता, एखादे छानसे नाटक पाहिलेले असते, चित्रपट पाहिलेला असतो, उत्तम पुस्तक वाचलेले असते, एखाद्या निसर्गरम्य प्रदेशात तुम्ही भटकंती केलेली असते, धबधब्याखाली तुम्ही मनमुराद बागडलेले असतात, उल्कावर्षाव न्हाहाळाला असतो.
तुम्हाला झालेला आनंद तुम्हाला कोणाबरोबर तरी वाटावासा वाटतो, कदाचीत ती व्यक्तीनी देखील तो चित्रपट पाहिलेला असतो, त्या प्रदेशात प्रवास केलेला असतो. ती गोष्ट त्यानी पण केलेली असते , पण तो कोरडाच राहीलेला असतो, तो तसाच रुक्ष असतो.
कशाला आपण त्याच्याकडॆ रसरसुन बोलायला गेलो आणि आपलाच रसभंग करुन घेतला ?
3 comments:
khar aahe, gela 1 athavada hach anubhav yet aahe!
हरेक्रिश्नाजी
खरे आहे. म्हणून आपणच आधी अंदाज घेऊन बोलायला पाहिजे. कारण आपणावरच कदाचित ’ओव्हर रिऍक्ट’ किंवा ’उथळ’ असा शिक्का बसू शकतो.
आणि तशाही, प्रत्येकाच्या आनंदा-आवडीच्या कल्पना सापेक्ष असतात, नाही?
कसे आहात?
अश्विनी
Ashwini,
Are you coming to Blogger's meet tomorrow ?
Meenal,
May be we should follow Ashwini's advice
Post a Comment