तीनचार जणाच्यां ब्लॉगवर मालाडच्या बिकाजी वर लिहिलेले वाचले . ही सर्व मंडळी आपल्या सासुरवाडी जाऊन हाणतात आणि हे राजाभाऊ, मालाडचे जावई, ते अजुनपर्यंत बिकाजी मध्ये खायला गेलेले नाहीत म्हणजे काय ? राजाभाऊंनी हे चांगलेच बोचत होते.
बायको कधी नाही ते माहेरी गेलेली.
मला एकटीला आता तरी सोड, मी एक रात्र रहाणार आहे हा आदेश धुडकावुन अचानक मिळालेले स्वातंत्र उपभोगायचे सोडुन हा "तुळशीदास " रात्री मालाडला पोचला, कारण काय तर बीकाजीत जेवायला जायचे.
काय हा लिंक रोड वरचा टॅफिक , २२ वर्षापुर्वी हा रस्ता निर्मनुष्य असायचा, रात्री यामाहा वरुन राजाभाऊ निघाले की त्यांचे सासरेबुबा त्यांना घाबरुन सांगायचे " मागुन जावु नकात हो, तेथे रात्रीच्या वेळी लुटमार होते " , जणु काय राजाभाऊ त्यांचे ऐकणार आणि आता ....
तर बीकाजीत गेल्यावर पहिल्यांदा "राज कचोरी " मागवली. पण फारसी नाही आवडली, ऑपेरा हाऊसला " तिवारी मिठाईवाला " कडे ही सॉलीड मिळते , त्या पुढे ही काहीच नव्हती.
मग "राजस्थानी गठ्ठा " आणि "लच्चा परोठा" मागवला. पण कालचा दिवस राजाभाऊंचा नव्हता. "राजस्थानी गठ्ठा" मधे जणु अख्या राजस्थानमधल्या मिठाचे भांडार रिकामे झाले आहे की काय , इतपत तो महाखारट होता. आणि लच्चा पराठाही काही खास नव्हता.
काउंटर वरच्या माणसाला त्या गठ्ठाची चव घ्यायला लावली, नशिब माझे त्याला ही ते पटले , त्याबदली त्यांनी "डाल माखनी " दिली, जी राजाभाऊंच्या बायकोला आवडली.
पण एकंदरीत याबद्दल मत प्रतिकुल झाले.
1 comment:
sahich lihiley..
Post a Comment