१९८०-८१ चा काळ.
प्रस्तरारोहण आपल्याकडॆ चांगले बाळसे धरु लागले होते. राजाभाऊ एका गिर्यारोहण संस्थेचे सभासद. त्या संस्थेने प्रस्तरारोहण शिकवण्यासाठी मुंब्राला "फस्ट स्टॆप पिनॅकल" ला शिबीर आयोजलेले.
सुळका चढतांना कमरेला सुरक्षतेसाठी दोर लावलेला. आपला प्राण बीले देणाऱ्या नेत्याच्या हाती सुखरुप आहे हा विश्वास. आणि त्याच विश्वासाच्या बळावर बिंधास्तपणॆ राजाभाऊ चढाई करत होते.
बरेच वर चढुन झाले. मधे काही ठिकाणी , जेथे मार्ग खुंटला होता तेथे ,पिटॉन्स ठोकलेले. वर चढाई परत सुरु करण्यापुर्वी त्या पिटॉन्सचा आधार घेत , जेमतेम दोन तीन बोटांवर शरीर पेलवत आडवे सरकायचे होते. आडवे सरकता सरकता हाताची पक्कड सुटली व क्षणार्धात राजाभाऊ वेगाने खाली पडु लागले ते थेट जमिनीवर दाणकण येवुन आदळले. चांगले ५०-६० फुटाचे अंतर असावे.
अश्या वेळी ज्याची हाती आयुष्याची दोरी त्याने काय केले असावे ?
त्या बहाद्दराने सरळ शिस्तीत हातातला रोप सोडुन दिला. बहुदा त्याने वरती स्वतःला सेफ करुन घेतले नसावे, कदाचित तो बेजबाबदारपणॆ बेसावध असावा.
या घसरगुंडीत ते चांगलेच रक्तबंबाळ झाले, कपड्यांची तर लक्तरे झालीच पण अंगावरच्या सालटी चांगलीच सोलवटुन निघाली. दोन्ही पायातले हंटर शुजचे सोल विभक्त झाले.
पण ते जखमांपलेकडॆ आर्श्चय म्हणजे इतर काही गंभीर दुखापत झाली नाही हे विशेष.
पण त्याहुन वाईट गोष्ट म्हणजे त्यांना तश्या अवस्थेत त्यांच्या साथीदारांनी गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेन नी आणुन घरी सोडले.
या घटनेने त्यांनी जो रॉकचा धसका घेतला, अनेक वेळा ते मधेच अडकुन त्यांचे हातपाय कापायला लागत.
आणखीन दुसरी वाईट गोष्ट म्हणजे अजुनही त्यांच्या सोबत, बरोबर ट्रेनमधे प्रवास जे कोणी असतात त्यांना मुंब्राला हा सुळका दिसल्यानंतर " मला हा सुळाका चढतांना अपघात झाला होता याची सुरस गोष्ट ऐकावी लागते (झाली याची सी ९० ची टेप शुरु झाली )
4 comments:
chhan post ahe... avdali...
Dev tumhala undand ayushya devo...ya blogsahit..
बिले देणाऱ्याचा केवढा हलगर्जीपणा! तुमचं नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही सहीसलामत सुटलात.
आम्हाला सुद्धा समजुदे कोण होते ते ... (खाजगीत कळवा ज़रा) पुन्हा कधी केले की नाही प्रस्तरारोहण?
त्याच्या नंतर परत कधीच सुळक्यांवर चढणॆ जमले नाही.
Post a Comment