Monday, January 11, 2010

मेनलॅंड चायना


या "मेनलॅड चायना" ची जवळुन ओळख राजाभाऊंना जेव्हा का श्री. शतंनु घोष यांच्या ब्लॉगवर झाली तेव्हापासुन त्यांनी सेनापती बापट रोडवर त्यात जेवायला जाण्याचा धडाका लावला होता. त्यात त्यांना मेनलॅंड चायनानी मुंबईमधे त्यांच्या घराजवळील सोबो सेंट्रल मॉल मधे शाखा उघडल्याचे कळल्यापासुन त्यांचे पोट आणि जिव्हा नुसते वळवळत राहिले होतो.


आपल्या बायकोबरोबर कधीही वाद (वादविवाद नव्हे, जेथे दोन्ही बाजुंनी युक्तीवाद केले जातात ) घालण्याच्या फंदात पडु नये हे २१ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतही राजाभाऊंनी शिकु नये म्हणजे फारच वाईट, हे वाद घालणे आपल्याला किती चांगलेच महागात पडते याची का त्यांना जाणीव नाही ? का पण का त्याचे त्यांना सदैव विस्मरण होते ? कदाचीत असे विस्मरण करुन घेणे हे अखेरीस त्यांच्याच फायद्याचे असावे म्हणुन तर नव्हे ?

मग ते तिला घेवुन "मेनलॅंड चायना " मधे जेवायला गेले.

जर चायनीज जेवण जेवायचे असेल तर या जमान्यात "मेनलॅंड चायना " ला पर्याय नाही. येथे मिळणारा प्रत्येक पदार्थ खुप चविष्ट, रुचकर असतो आणि तो खुप चांगल्याच मोठ्या, जास्त, प्रमाणात दिला जातो, एका डिश तिघाजणांना सहज पुरावी.

आज रात्री त्यांनी Crispy Veg. in Chilly Plum Sauce, Sweetand Sour Veg. with Crispy Noodles and Lotus Leaf wrapped rice with corn kernals and almonds मागवले.

हा कमळाच्या पानात शिजवलेला , मक्याचे दाणॆ, बदाम घातलेला फ्राइड राईस मस्त लागतो. आणि प्लम सॉस मधे शिजवलेले क्रिस्पी व्हे. तर बहारदार.

पण मागवण्यामधे परत त्यांनी तीच चुक केली. जेवण फार सुके होवुन गेले.

बायको खुश तर जिंदगी हसीन.

2 comments:

रोहन... said...

होय माझा राहिलेला अजून एक खादाडी स्पोट ... :D बाकी अंधेरी येथील 'चायना गेट' आणि 'अरोमास ऑफ़ चायना' सुद्धा ट्राय करून बघाच... :D

HAREKRISHNAJI said...

माझे कार्यलय लवकरच अंधेरीला स्थलांतरीत होत आहे, मग जरुर जाईन