Thursday, January 07, 2010

स्वागत (स्वागथ ) रिफ्रेशमेंट - मुंबई

सेट डोसा


उदंडु डोसा

साधा डोसा

"तुला भुक लागलेली दिसत नाही " . राजाभाऊंच्य बायकोनी राजाभाऊंना विचारले.

आपल्या बायकोच्या बोलण्याकडॆ सोईस्कररीत्या, जाणीवपुर्वक कसे दुर्लक्ष करावे यात ते माहीर. ऐकुन न ऐकल्यासारखे करावे.

तिची जरासी गंमत करायची होती ना, तिच्या आवडीच्य कोकोनट शेवया खायला तिला न्यायचे होते ना. बोरीबंदर पासुन , फोर्टमधल्या गल्लीबोळातुन चालवचालव चालवल्यानंतर ते अचानक फिरोझशहा मेहता रस्तावरील "द मुंबई स्टोर " समोरील गल्लीत बाहेर निघाले.

"हं, आता बोल मघाशी काय म्हणत होतीस, भुक लागली आहे काय, चल मग तुला जे आवडते ते खावुया "

(नेमका हा पदार्थ फक्त सकाळीच मिळतो )

या जमान्यात जेव्हा लोकांच्या चवीत, खाण्याच्या आवडीनिवडीत झपाट्याने बदल होत चालले आहेत , त्या फेऱ्यात अनेक उपहारगृहांनी आपल्या माना टाकायला सुरवात केली आहे, पण पारंपारीक, अस्सल चवीचे पदार्थ खावु घालणारे काही उपहारगृहे अजुन पर्यंत तग धरुन आहेत, त्या पैकी " स्वागत " हे एक.


2 comments:

Ap____M said...

Try "Shree Sundars" near Matunga station and "Idli House" at King's Circle

HAREKRISHNAJI said...

इडली हाउस मधे मी बऱ्याच वेळा जातो मला ते खुप आवडते. श्री सुंदर्स मधे एकदा दोनदा गेलो आहे पण नाही तितकेसे आवडले. आम्ही अनेकदा त्या समोरील रामाश्रयात जातो ते खुप चांगले आहे. पण अलीकडे वाटायला लागले आहे की या माटुंग्यामधल्या सर्वांचे , कॅफे मद्रास, म्हैसुर कॅफे, मणीज आदींचे गुजराथीकरण फार झपाट्याने होत चाललेले आहे.