अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Saturday, February 28, 2009
मै चंदा की चांदनी हुं , मै तारोंकी रानी.
मनालीला नाही तर नाही , निदान मनालीत तरी
जागो इंडिया जागो
Thursday, February 26, 2009
स्लम डॉग मिलीनीयर आणि वेश्याव्यवसाय
या चित्रपटात नायिकेची कहाणी काहीशी साईडट्रक झाली आहे असे मला वाटते. झोपडपट्टीतील मुलांवर जास्त लक्ष केंद्रीत झालय की काय ? त्या मानाने मुलींच्या समस्या तेवढ्या प्रखरतेने पुढे आलेल्या नाहीत.
तिचे "पिला हाऊस " मधल्या कुंटणखाण्यात वेश्याव्यवसायासाठी विक्री होणे, तेथुन नाट्यमय सुटका ( जी केवळ चित्रपटातच शक्य आहे अन्यथा तिरडी वरुनच, गुप्तरोग,ते एड्स पर्यंत कशानेही मरण पावल्यानंतरच ) मग तीचे रखेल म्हणुन रहाणे, सुटकेची निष्फळ धडपड, मनाची मुस्कटदाबी , घुसमट या कडे बरेचसे दुर्लक्ष झाले आहे।
पिला हाऊस , एक मुंबई मधली कुप्रसिद्ध वस्ती, खरे नाव तीचे "प्ले हाऊस" , या विभागात १० / १५ सिनेमा थियेटर आहेत / होती त्या वरुन पडलेले, जेथे जबरदस्त्तीने मुलींना धंद्याला बसवले जाते, ग्रांन्ट्ऱोड ते गोलदेऊळ या मधे असणारी हि देहविक्रीकरण्याची जागा.
कोणत्याही चित्रपटाचे यश कशाने मोजावे, त्याला किती पुरस्कार मिळाले आहेत, त्यानी केवढा धंदा केला आहे ? तो केवढा लोकप्रिय झाला आहे त्या वरुन की त्यात ज्या काही समस्या मांडल्या आहेत, समाजाचे जे दारुण चित्र दाखवले गेले आहे त्या बद्दल समाज पुरुषाला आपली लाज वाटुन , काही प्रमाणात का होईना पण समाजजाग़ृती होवुन , त्यांचे निवारण करण्याचा सर्व स्थरावरुन प्रामाणीक प्रयत्न केला जातो तेव्हा ?
जसे हे माध्यम समस्या जगासमोर मांडण्याचे काम करते तेव्हा समाजाचे हे कर्त्यव्य आहे की त्याने या समस्यांचे निवारण करावे.
Wednesday, February 25, 2009
टेसुल बन फुले - रस बरसायो रे
Tuesday, February 24, 2009
है सबसे मधुर गीत वही जो हम दर्द के सुर मे गाते है !
परमेश्वराने धरतीवर मनुष्याला जन्माला घातले, त्याला एक दिल दिले, दिलाचा दर्द दिला आणि तो दर्द सुसह्य करण्या़साठी, त्यावर हळुवारपणॆ फुंकर घालण्यासाठी हळुच एक मुलायम, मखमली आवाज पाठवुन दिला।
आणि हो, तलतचा आवाज होता केवळ दर्दचा एहसास करुन देण्यासाठीच , नाहीतर आपली बीमारी दिलाला कशी कळली असती ?
आज तलतचा जन्मदिवस । असा आवाज दुनियेत एकदाच पैदा होतो ।
लिहीणार - एक तलतचा परमभक्त
Monday, February 23, 2009
युत्या आणि आघाड्या
काय सांगावे हेच दोघे एकत्र आले तर ?
जय हो , अभिनंदन
जय हो ।
(पण त्याची इतर चित्रपटातील गाणी कितीतरी पटीने सुंदर आहेत )
Sunday, February 22, 2009
ये आरजू है की हम भी बहार देखंगे
Saturday, February 21, 2009
कायदा कड़क आहे
आता १५० रुपये घेवुन फक्त जेवणासाठीच आत सोडतो । अहो पणे संध्याकाळी तुमची दूसरी काहीतरी स्कीम आहे ना ७५ रुपयात , ज्यात फक्त स्नाकस मिलातात ।
५ रे ६ वाजेपर्यंत , आता बंद झाले।
आम्ही परत ।
रातभर मोहे सोने ना दे
रात्री १ वाजेपर्यंत शोधत होतो, परत पहाटे ४ वाजता उठून ,
बघुया आज तरी दिसतोय काय ? २४ तारखेस तो शनीच्या अगदी जवळ असणार आहे तेव्हातरी तो शोधायला अवघड जावु नये।
काल रात्री माझ्या गुरुवर्यानी त्याचे वसई पासून जरा लांब जावुन दर्शन घेतले , पण येथे पुण्यामधे आकाशात फारच उजेड असतो, त्यामुळे पण त्याला शोधायला अडचण येत आहे ।
इन रेशमी रांहो मे, इक राह तो वो होगी तुम तक जो पहुंचाती है
"गंगा आये कहांसे , गुलजार : एका दिग्दर्शकाचा प्रवास" - श्री। विजय पाडळकर लिखित पुस्तकातून ।
माणसा माणसातील जशी तुटली जातात , मोडतात तशी ती परत सांधली देखील जातात की. कारण "माणुस नियती समोर जेवढा हतबल असतो तेवढाच तो प्रेमासमोरही हतबल असतो"
आणि हीच प्रेमाची हतबलता त्यांना परत नाती जोडायला लावत असेल का ?
हे माणसांचे दुर जाणे हे केवळ प्रियकर-प्रेयसी, नातेवाईक मंडळी, नवरा बायको आदी नाते संबंधातातच असते काय ?
एकेकाळचे आपले जीवश्यकंठश्य, खास मित्र , त्यांच्या पासुन आपण कधीतरी कळत नकळत दुर वाहत जात असतो, येवढे दुर की आपला असा कोणी सहोदर होता हे याद ही रहु नये ?
राजेंद्र.. केवढी त्याची आणि माझी दोस्ती होती, माझा जणु काय तो ग़ॉडफादरच. कॉलेजच्या जीवनातील ती मैत्री, दिवसरात्र एकाद्या विषयावर केलेल्या चर्चा, ते वादविवाद, ते हमरातुमरी वर येणे, आपलेच म्हणणे खरे कसे हे पटवुन देणे , त्याचा मुकेश ,माझा तलत. , त्याचा पाशी गिरवलेले ते राजकारणाचे धडे !
नाती टुटायला त्यांच्यात बेबनाब व्हायलाच लागतो काय ? केव्हातरी ते आपसुक होत असते की.
Friday, February 20, 2009
मुक्काम - गौरी देशपांडे
स्पर्शाला भिऊ नकोस, आणि प्रेमळ विचारांना. पण सहजसोप्या भावनांना आणि कृतीला वेढुन बसलेल्या मोठ्या घायपाती शब्दांना भी. कारण शब्द जितकं सांगतात तितकंच दडवतात, स्वत:ला आणि दुसऱ्याला फसवतात.
या कालिंदीच्या मनाचा "थांग" लागणे कठीण होत चालले आहे। "मुक्काम" परत तीचा आपल्या घरी ? तळेगावला ? डॉ.विश्वनाथ पहात असलेल्या अपंग आणि मतिमंद मुलांसाठी असलेल्या रुग्णालयात ? जेथे ती नोकरी करते तेथे ? आणि ते ही दिमीत्री ला सोडुन ?
दिमीत्री , पुन्हा एकदा भेटतो आणि काहीच घडुन नये ? की एखादी गोष्ट मिळेपर्यंतच तिचे आकर्षण आणि मिळाल्यावर मन तृप्त होवुन तिच्यापासुन दुर जाणे , मन शांत होवुन, उर्मी निवल्यानंतर ?
ओ , कालिंदी, नाही उमजतच नाहीस तु।
येवढा प्रवास करुन ही परत मुक्कम आपल्याचपाशी ? का ? का स्वत:चे वेगळे आयुष्य उभे करायचे " इयान पासुन , दिमीत्री पासुन दुर ? का ?
दुस्तर हा घाट आणि थांग" मधल्या "थांग" ची कालिंदी नंदन ला सोडुन दिमीत्रीची आठवण मनाशी ठेवुन परतलीय भारतात.
ग्रीसला जाते काय दिमीत्रीला भेटायला आणि परत येते काय ?
कोडे नाही उलगडत.
Blue Crescent: परिचय..
तुम्ही भेटलात म्हणुनच आयुष्यात गुलजार मोसम आला। ( विजय पाडळकरांच्याच शब्दात)
केवळ हा लेख वाचला आणि जाणवले आता पर्यंत आपल्याला गुलजार विषयी काहीच माहिती नव्हती, तुकड्या तुकड्यात आपण गुलजारला पाहात होतो आता सविस्तर पहाणाचा प्रयत्न करुया, सुरवात तर करुया " गंगा आये कहांसे , गुलजार : एका दिग्दर्शकाचा प्रवास " या श्री. विजय पाडळकर लिखीत पुस्तकापासुन. )
Thursday, February 19, 2009
"मेड इन चायना" ते शुद्ध भारतीय
काल चित्रपट महोत्सवात "मेड इन चायना" पहायला गेलो, कामाचा डोंगर उपसायचा सोडुन. उगीचच गेलो असे वाटायला लागले, नाही आवडला. काहीच खास बात नाही. मेड इन चायना बनावटीच्यां वस्तुंसारखाच वाटायला लागला, तीच घराणेशाही, तेच नेते, तेच बिल्डर, तेच नाडले जाणारे शेतकरी, तीच , शौकबाजी , तेच अत्याचार । अन्याय। नेहमीच्याच पठडीतला।
आदल्या दिवशी "जोगवा" चित्रपटाने येवढ्या उंचीवर नेवुन ठेवले होते तेव्हा आता कोणतीही तडजोड करणे कठीण होत गेले
माणुस चित्रपटामध्यल्या "कशाला उद्याची बात बघ ढळुन चालली रात " या अप्रतिम गाण्याच्या भ्रष्ट रिमिक्स वर नाचणाऱ्या बारबाला बघवेनाश्या झाल्या आणि उठलो, वीसच मिनीटात।
तेवढ्यात आठवले सर ज.जी. कलामहाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन भरले आहे व आत्ता तेथे पं.प्रभाकर कारेकरांचे गाणे आहे.
मग काय पोहोचलो तडक तेथे।
त्यांचे कलाप्रदर्शन कालही पहाता आले नाही. परवा सकाळी ९ वाजता गेलो होतो आणि काल संध्याकाळी ७ वा।
सं १० ते सां. ६ या वेळेत ते उघडे असते. या वेळेत कार्यालयातुन जाणे कठीणॅच. पाहु उद्याला जायला जमते का ?
Wednesday, February 18, 2009
"दुस्तर हा घाट" आणि "थांग" आणि "मुक्काम" गौरी देशपांडे.
मी तर म्हणीन जेव्हा एखाद्याला गौरी देशपांडे झपाटुन टाकतात तेव्हा ती व्यक्ती नकळतपणॆ अगदी अगदी गौरी देशपांडे सारखा विचार करायला लागतात।
Tuesday, February 17, 2009
जोगवा
आज "जोगवा" पाहिला, नुसताच चित्रपट पाहिला नाही, तर माणसे , माणसांना कश्या प्रकारचे नरकासमान जिणे जगायला लावतात ते पाहिले, निव्वळ अंधश्रद्धेपोटी सख्खे आईबाप आपल्या पोटच्या पोरांच्या आयुष्याचे कसे धिंडवडे काढतात ते पाहीले ,आपल्या स्वार्थासाटी आपल्या कळपात दुसऱ्यांना ओढणारी माणसे पाहिली आणि हे ही पाहिले की वाट चुकलेल्यांना मार्ग दाखवणारेही कोणी तरी असते, गरज असते ती मनाला बळ देण्याची, बंड करण्याची, आपला मार्ग आपण शोधण्याची, नरकातुन बाहेर पडण्यासाठी.
जी जी गावे, जी, जी माणसे या आई यलाम्माने पछाडलेली आहेत, त्या त्या गावात, त्या त्या माणसांना हा चित्रपट अवश्य दाखवला जावा, कळुद्या त्यांना आपण काय करुन बसलो आहोत, मिळुन द्या त्या नाडलेल्या, पिडलेल्या जोगती आणि जोगतीणींना त्यांचे हिरावुन घेतलेले स्वातंत्र, जगु द्यात त्यांना माणुस म्हणुन परत येकदा।
Monday, February 16, 2009
माझ्यासारखा मुर्ख मीच
And you know what I missed today ?
आणि एक आघातच झाला. येथे चक्क मराठी चित्रपट महोत्सव सुरु आहे.
शेवटची १०-१५ मिनिटे " असलाच घो मला हवा " या चित्रपटाची मजा लुटता आली.
मंगळवार - जोगवा - ६.३० वा.
बुधवार - मेड इन चायना ६.३० वा.
गुरुवार - जोशी की कांबळे - ४.०० वा
महासत्ता - ६.३० वा.
आणि गंमत म्हणजे हे सारे रसिकांसाठी चक्कटफु आहे.
तेव्हा पुढील तीन दिवस यशवंतराव चव्हाण सेंटर. मुंबई.
Enjoy.
Sunday, February 15, 2009
बचा ले मोरी मां. - मधुसुरजा
खुश्शाल खावे
खुश्शाल खावे
बादशा्ही आणि मसालेभात
आजचा नास्ता, मनशक्ती प्रयो्गकेंद्रात, लोणावळा
Saturday, February 14, 2009
का पण ?
आज रात्री चा काय मारे बेत ठरवला होता , आणि करत काय बसलोय तर घरात "उत्ख्ननन" वाचत, माणासांच्या कोलाहा्लात , एक बेट बनुन
बरयाच वेळा असं घडत असते , ठरवले काय जाते आणि होते काय ?
"उत्खनन" - गौरी देशपांडे
काही पुस्तकांचे ते वाचुन झाल्यानंतर आपल्या पुरते त्याचे अस्तित्व संपते,तर काही पुस्तके वाचतांना त्याच्याशी आपण समरुप होत जातो, त्यातल्या पात्रांत, ते पुस्तक लिहिणाऱ्यात. मग कधीतरी अचानक जाणॅवते की अरेच्या आपणही नकळतपणे त्यांत गुंतत चाललो आहे, तिच्यासारखाच विचार करायला लागलो आहे, बोलायला लागलो आहे, वागायला लागलो आहे, मग समजावे त्या पुस्तकाचा किंबहुना त्या लेखिकेचा आपल्यावर पगडा बसत चालला आहे, हे सामर्थ असते त्या लेखिकेचे, गौरी देशपांडेचे.
"उत्खनन" वाचायला घेतलयं. हे मी अजुन पर्यंत वाचले कसे नव्हते, मला वाटत होते की संपुर्ण गौरी देशपांडे वाचुन झालीय.
गौरी का आवडतात ? त्या आपल्या लिखाणातुन सतत संवाद साधत असतात म्हणुन के आणखी कशामुळे ?
Friday, February 13, 2009
प्रेम
प्रिये !!
जान तेरे लिए
तेरे बिना जीना नाकाबिले जीनेका तसव्वुर है !
तबियत ठीक थी और दिल भी बेकरार न था
ये तब की बात है जब तुम्हीसे प्यार न था !
तुम्हे याद होके ना याद हो
कभी हमभी तुमभी थे आशना
तुम्हे याद होके ना याद हो !
किंवा
जब भी तकमीले मुहब्बतका ख़याल आता है
अश्या गजला आजतरी कोणालाही आठवु नयेत।