Friday, September 26, 2008

युवा राष्ट्रकुल स्पर्धा - पुणे

होतील हो , सर्व काम वेळे आधी पुर्ण होतील , काय घाई आहे। स्पर्धेला अजुन तसा अवकाश आहे ना । उगीचच आधी पुरी करुन करायचे काय ? स्पर्धेच्या वेळी सगळे कसे नवे कोरे चकचकीत दिसायला नको का ? नाहीतर सर्व कसे जुनाट वाटेल , जग मग कसे भारावुन जायेल ?
लोकांना समजत नाहीय की अडथळ्याची शर्यत महामार्गावर ठेवली आहे । स्पर्धकांना लांब उडी मारण्यासाठीच मुद्दामुन खड्डे रस्तात ठेवले आहेत ।
आता काही जण म्हणतात सर्विस रोड चे काम पुरे व्हायचे आहे, बाणेर ला जाणारा रस्ता दुरुस्त व्हायचा आहे , बाले वाडी जवळील उड्डान पुलाचे काम फार रेंगाळय, बाजुलाच ऑर्चिड चे इमारतीचे काम चालले आहे, पण या साऱ्या उगीचच्च्या काळज्या आहेत। दोष दाखवण्याची सवयच काही जणांना असते त्यातला हा प्रकार ।

3 comments:

Ashwinis-creations said...

खरेच या राष्ट्रकुल स्पर्धेने अगदी वैताग आणला आहे. नुसता पैशांचा अपव्यय! आणि आता तर मुलांच्या सहामाही परीक्षाही दिवाळीनंतर घेण्याचा फतवा काढला आहे...आमची राजस्थान ट्रीप अधांतरी आहे त्यामुळे....बिचार्‍या शाळकरी मुलांनाच वेठीला धरले जाते दरवेळी! खरे तर स्पर्धा सुरु होण्या आधीही परीक्षा उरकून जाऊ शकत होती.

HAREKRISHNAJI said...

खर आहे. समारंभात शाळॆतल्या मुलांचा फार वाईट प्रकारे वापर केला जातो. उन्हातान्हात ताटकळ्त उभे रहायचे. खर म्हणजे परीक्षा आणि स्पर्धा यांचा संबंध काय .

आपल्या राजस्थानच्या सहली बद्दल. कुठे कुठे जाणार आहात ? स्वतंत्र की पर्यटन यात्रा कं. बरोबर.

Enjoy.

HAREKRISHNAJI said...

Now my son's exams are postpone due to CYG and we are in big big trouble. My wife's nephew is getting married in Mumbai on one of exam day.

Bad luck for us