Saturday, September 20, 2008

आशा डायनींग हॉल - शिवराक भोजना करता

विस्म्रुतिच्या कप्पात गेलेले एक नाव आज अचानक मनात वर उभारुन आले. आशा डायनींग हॉल. किती तरी वर्षे झाली असतील याला भेट देवुन. पुर्वीच्या काळी आम्ही जेव्हा आपटे रोड, पुणॆ येथे नंदनवन मधे उतरत होतो तेव्हा कधी तरी या ठिकाणी भोजन करावयास जात असु.
राजाभाऊंच्या मनी एखादी गोष्ट आली की मग काय ! त्यात जेव्हा जेव्हा याचा संबंध डायरेक्ट पोटाशी असतो तेव्हा तर त्याची त्वरीत अंमलबजावणी केली जाते , मग काय सपत्नीक राजाभाऊ पोचले आपटे रोड वरील धनराज सोसायटीत.
हे काय आत प्रवेश केल्या नंतर चुकल्या चुकल्या सारखे वाटायला लागले , ते छोटॆखानी बैठे घर गेले कोठे ज्यात आशा डायनींग हॉल चा कारभार चालायचा. आता त्याची जागा एका बहुमजली इमारतीनी घेतली आहे. पहिल्या मजल्या वरील नवीन रुपातील "आशा" बघुन खुप बरे वाटले, आता ही जागा मस्तच झाली आहे.
श्री. किणी यांचे हे भोजनगृह कारवारी पद्धतीच्या उत्कॄष्ट जेवणासाठी सर्वोत्तम आहे. आज खासा बेत होतो, पहिल्यादाच ही भाजी मी चाखली. मंगोलरी काकडी ची भाजी, केव्हा तरी ती खास करतात, मस्त लागली.
ताटात चवळीची रस्सेदार भाजी, बटाटयाची कापाची भाजी, आमटी, भात, रसम, गाजराची कोशींबीर, चटणी , आणि ते देखील हवे तेवढे मुबलक, अमर्यादीत. राहुन राहुन वाढपी सतत वाढायला येत होते, वाढत होते, हातचे न राखता. परत हे सर्व फक्त ५० रुपयात आणि ते पण या महागाईच्या दिवसात !
मजा आली. दिल खुष हुवा.

No comments: