भटकंतीत अनेक वेळा एखादी अप्रतीम जागा आपल्याला सापडुन जाते , आपल्याला तॊ एवढी आवडते की आता परत परत या जागी यायचेच यायचे असे आपण आपल्या मनाला सतत बजावत असतो.
पण परत काय तिथे जाणे होत नाही. पण त्याच्या आठवणी मात्र तश्याच आयुष्यभर ताज्या रहातात.
असेच पावसाळ्याचे आम्ही निघालो पदभ्रमणाला. कर्जत जवळील एका गावात आमच्या मित्राच्या फार्म हाउस वर रात्री मुक्काम करुन भल्या पहाटे सुरवात केली चढाईला. लक्ष होते कुसुर, आंब्याचे पाणी घाट चढुन वरती गेल्या नंतर आंध्रा तलावाच्या काठाकाठाने वाट वरती कुसुर ला चढते. धबाबा पाउस कोसळत होता.
अत्यंत नितांत देखणा असा हा परिसर, वरती पोचलो तेव्हा अगदी चांगलेच दमुन गेलो होतो. दमले नव्हते ते केवळ आमच्यातले सर्वात तरुण , सत्तरीचे नाना नित्सुरे. कारण त्यांचे काम आत्ता सुरु झाले होते, स्वयपाकाचे. दमलेभागलेल्या आम्हा म्हाताऱ्यांच्या पोटी, या गारठयात गरगागरम अन्न पडावे याची व्यवस्था करण्याची.
थकल्याभागल्या जिवाला मिळालेल्या, चुलीवर शिजलेल्या गरमागरम आमटी भाताची चव, नानांच्या हातची चव अजुनही जिभेवर रेंगाळते आहे.
No comments:
Post a Comment