Monday, September 22, 2008

सनी दा ढाबा - फाय स्टार रेट थर्ड रेट शाकाहारी जेवण

काल मुंबई पुणे हमरस्तावरील कामशेत जवळ असलेल्या सनी दा धाब्या मधे जेवणाचा योग आला । पस्त्तवलो। मांसाहारी , सामिष जेवण करणारी माणसे येथे अगदी आनंदाने जेवत असतील पण माझ्या साठी मात्र ही शिक्षाच होती। खर म्हणजे जेथे मांसाहारी , सामिष जेवण मिळते तेथे जाण्यास मी स्पष्ट नकार देयाला हवा , माझा मुळे इतरांचा नाहक विरस होतो।
मसालेदार, तेलकट महागडे जेवण । आज मुलगा आजारी पडलाय । रेट तर काय विचारु नकात। ढाबा म्हणजे हमरस्तावरील स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याची जागा ही कल्पना आता कालबाह्य झाली आहे।

4 comments:

Ashwinis-creations said...

हरेक्रिश्नाजी,
खरे आहे.
विशेषतः आशा डायनिंग सारखं सात्विक जेवण जेवल्या वर तर हा फरक फारच जाणवला असेल.
पण इतकं सारखं बाहेर जेवणं बरं नव्हे!
खूपच षौक आहे खाण्याचा.

HAREKRISHNAJI said...

Ashwini,

Thanks for the concern. Most of the time once in a week , I give rest to my wife and take her out for dinner.

No doubt I do enjoy the food. But such restaurants I always restrict myself to only Dal Fry and Roti and little bit of Jeera Rice.

I always go crazy over simple, homely food.

Sonali Deshpande said...

ढाब्यावर मी जनरली कॉफी घ्यायचे. कॉलेजला सुट्ट्या लागल्यावर आई पपांकडे जाताना नाईट ट्रॅव्हल्स थांबायची ढाब्यावर. तिथे बसुन मोकळ्या हवेत जेवण आणि चहा / कॉफी घ्यायचा आनंद काही औरच असतो! मी जेवण घेतलं नाहीये पण कॉफी मात्र अगदी आनंदाने घेतली आहे. अगदी दर ट्रिपला. न चुकता!

एखादे वेळी बाहेरचं जेवण घेतलं तर घरच्या अन्नाची लज्जत काही औरच असते हे खात्रीनं पटतं. पण त्यासाठी बाहेर एक तरी जेवण घ्यायला हवं. for sure!!!

HAREKRISHNAJI said...

सोनाली

हे जे खरेखुरे धाबे असतात ना तेथे खुप चांगले पदार्थ चाखायला मिळतात, तेथेले माहोल ही आपण म्हटल्या प्रमाणॆ मस्त असते.

विषेशता उत्तरेला वैष्ण्वी धाब्यांवर मस्त गरमा गरम जेवण मिळाते.