मुंबई-पुणे प्रवासात आता मागे पडलेले वाचन पुन्हा सुरु करायचे हा निश्चय करुन एखादे पुस्तक सोबत घेतो, पण ते न वाचताच परत घेवुन गेले जाते. या दुष्टाव्याला कारणीभुत आहे तो निसर्ग.
एकदा का कल्याण सोडले की तो जो साथ देत रहातो ते नुसते पहात रहावेसे वाटत रहाते.
श्रावणातील पावसाचे कौतुक फार होते पण मला यंदा भावला तो हा भाद्रपदातील पाऊस.
काय घाटात धबधब्यांचे पिक आलय. एका पेक्षा एक सरस. पुणॆ जसजस जवळ यायला लागते तसे तसे नविन नविन फुललेली रानफुले मन प्रसन्न करत रहातात.
No comments:
Post a Comment