Friday, September 12, 2008

बेडेकर मिसळ, पुणॆ -कुछ खास दम नही !



बऱ्याच वेळा आपण एखाद्या गोष्टीच्या मागे ती प्राप्त करण्यासाठी धावत असतो, पण ती मिळाल्याला वर जाणवते, फुस्स , बंडल, उगीचच आपण या साठी अट्टाहास करत होतो.
 
कित्येक वेळा आम्ही बेडेकरांकडे मिसळ खायला गेलो असु, दर वेळी काही ना काही कारणाने ते दुकान बंद असलेले आढळुन यायचे.  गेल्या वेळीस काय तर "आमच्या कडे पाणी संपले असल्यामुळे दुकान बंद राहील " आता ही पाटी बघुन हसु का रडु ?.   
 
पणं मी ही तसा जिद्दी माणुस ते जर दुकान बंद ठेवतांना दमत नसतील तर मी तरी का दमु. केव्हा ना केव्हा तरी ते दुकान उघडे मिळेल की.   
 
पण आज गणराय पावले म्हणायचे, दुकान चक्क उघडे होते. आनंदाने मिसळ खायला मागितली.
 
लेकीन कुछ  बात बनी नही. अजीबात मिसळ आवडली नाही. नुसती तिखट , त्यांत वांग्याने भरलेला रस्सा, भरपुर शेव मारलेली. नशीब दोघां मिळुन एकच मिसळ मागीतली होती.
 
त्यात वाईट गोष्ट म्हण्जे ज्या कळकट, मळकट , घाणेरडया फडक्याने टॆबले पुसणाऱ्या माणसांने त्याच हाताने आम्हाला पावाच्या स्लाईस आणुन दिल्या, फोटो काढण्याच्या नादात जाणावले नाही , पण खाल्या नंतर अश्या बाबी हमखास आठवतातच.   
 
यांच्या पेक्षा श्रीकॄष्ण मिसळ कैक पटीने सरस आहे.  

5 comments:

Unknown said...

malahi bedekar misal nahi awadat.. shaniparachya ithli shree chi ch awdte ! :)

HAREKRISHNAJI said...

श्रींची मिसळ आम्ही खाल्ली आहे. आम्हालाही आवडते. जोशींची श्रीकॄ्ष्ण मिसळ जास्त आवडते, तेथे सोबत मिळणारे स्लाईस पाव चांगले असतात. मला वाटते बादशाही मधे पण मी चांगली मिसळ खाल्ली आहे

Anonymous said...

Garware college samorchi Katakirr misaL try karoon bagha.. :)

HAREKRISHNAJI said...

Sure Thanks for the tip.

May be next Saturday.

GOAN PADDY. said...

100% aaple mat barobar aahe!joshi kaka[shrikrishna]te joshi kakach!tasa kanda nahi aani tashi tarri pan nahi.