काय म्हणता काय राजाभाऊ ?
वाद नाही, विवाद नाही, रुसवे नाही, फुगवे नाहीत, कसली कसली नाटके नाही, नाट्य नाही, झगडे नाहीत, हाणामाऱ्या कुटाकुट्या नाहीत, कोणाचा म्हणुन विरोध नाही, जाग ठरवण्यावरुन विसंवाद नाही, असच का तसच का ? नाही, मी म्हणेन तेच खरे, म्हणणे नाही,
मग हे कसले संमेलन ? हा कसला स्नेह मेळावा ब्लॉगल्सचा ?
सारे ब्लॉगर्स कसे आनंदाने उद्याला पुण्यात एकत्र येणार आहेत, श्री. सुरेश पेठे व अनिकेत समुद्र यांनी नुसती साद घालण्याचा अवकाश.
या दोघांचे सारे ब्लॉगविश्व आभारी आहे, या कल्पनेबद्द्ल आणि ती प्रत्यक्षात साकार केल्याबद्दल.
साहित्य संमेलन, नाट्यसंमेलन आयोजले जातो तेव्हा केवढा डुरळा उडत असतो, त्या वातावरणाच्या बरोब्बर विरोधी असे हे वातावरण आहे. सारे कसे अगदी मजेत जुळुन आलेले आहे.
शिका या ब्लॉगर्स संमेलनापासुन, या नवोदितांकडुन.
कधी एकदा या स्नेह मेळाव्याला जातो असे झाले आहे.
5 comments:
उद्याच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा ... :)
जाण्याचं पक्कं केल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा....:)
अरे वा! शुभेच्छा!:)
मध्यप्रदेशातून आमच्या ही शुभेच्छा स्वीकार करा… ब्लॉगवाणी मुळे आपल्या ब्लॉग कड़े आलो… वाचून बरं वाटलं… या हिन्दी मधे पण कधी… काही तुटक-फ़ुटक आम्ही पण लिहीतो… :) सम्मेलनासाठी मनापासून शुभेच्छा…
रोहन, अपर्णा आणि भानस,
आपण याला असायला हवे होतात.
श्री. सुरेश चिपळुणकर,
धन्यवाद. आपल्या भावना मी सर्वांपर्यंत पोचवीन. ब्लॉगर्सचा एक फार मोठा मेळावा घेण्याचे ठरत आहे, मध्यप्रदेशातुन आपण सर्व त्यात सहभागी झालात तर बहार येइल.
Post a Comment