सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वश्रेष्ठ अभिनेता, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन, पार्श्वगायिका आणि संगीतकार असे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्याबद्दल "जोगवा" चे अभिनंदन.
हा चित्रपट पाहिल्यानंतरचा प्रभाव येवढा होतो की दुसऱ्या दिवशी महोत्सवात "मेड इन चायना " बघायला राजाभाऊ गेले होतो , त्यांच्याच्याने तो चित्रपट बघवेना. दहा मिनिटात ते बाहेर उठुन आले. जोगवाने जे अस्वस्थ करुन सोडले होते, हादरवुन सोडले होते, येवढ्या लेव्हलचा चित्रपट पाहिल्यानंतर दुसरा कोणताही चित्रपट पहाणे नकोसे झाले होते.
१७/०२/२००९ रोजी लिहिलेले.
भयापासुन मुक्ती मिळावी या साठी मनुष्याने परमेश्वराला जन्माला घातले आणि याच परमेश्वराने "आई यल्लम्मा " बनुन त्याचे आयुष्य उध्वस्थ केले.
आज "जोगवा" पाहिला, नुसताच चित्रपट पाहिला नाही, तर माणसे , माणसांना कश्या प्रकारचे नरकासमान जिणे जगायला लावतात ते पाहिले, निव्वळ अंधश्रद्धेपोटी सख्खे आईबाप आपल्या पोटच्या पोरांच्या आयुष्याचे कसे धिंडवडे काढतात ते पाहीले ,आपल्या स्वार्थासाटी आपल्या कळपात दुसऱ्यांना ओढणारी माणसे पाहिली आणि हे ही पाहिले की वाट चुकलेल्यांना मार्ग दाखवणारेही कोणी तरी असते, गरज असते ती मनाला बळ देण्याची, बंड करण्याची, आपला मार्ग आपण शोधण्याची, नरकातुन बाहेर पडण्यासाठी.
जी जी गावे, जी, जी माणसे या आई यलाम्माने पछाडलेली आहेत, त्या त्या गावात, त्या त्या माणसांना हा चित्रपट अवश्य दाखवला जावा, कळुद्या त्यांना आपण काय करुन बसलो आहोत, मिळुन द्या त्या नाडलेल्या, पिडलेल्या जोगती आणि जोगतीणींना त्यांचे हिरावुन घेतलेले स्वातंत्र, जगु द्यात त्यांना माणुस म्हणुन परत येकदा।
अप्रतिम चित्रपट, अप्रतिम कलाकारांची कामे, अप्रतिम दिग्दर्शन, अप्रतिम छायाचित्रण, अप्रतीम प्रकाशाचा, सावल्याच खेळ, अप्रतीम लोकेशन , अप्रतीम मुक्ता बर्वे, जबरदस्त उपेंद्र लिमये, किशोर कदमांनी तर कमालच केली आहे.
1 comment:
खूप खूप अभिनंदन...
Post a Comment