काल http://disamajikahitari.wordpress.com/ यांच्या ब्लॉगवर सेतुमाधवराव पगडी यांनी लिहिलेल्या "मिर्झा गालीब आणि त्याच्या गजला " या पुस्तकाचा उल्लेख वाचला आणि राजाभाऊंना आपणाकडुन हे पुस्तक व सेतुमाधवराव पगडी वाचायचे राहुन गेलेले आहेत याची प्रकर्षाने जाणीव झाली.
गालीब वरचे पुस्तक काही त्यांना मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मिळाले नाही ( पुर्वी ज्या वेळी त्यांच्या समोर हे पुस्तक आले होते तेव्हा त्यांनी ते वाचायला घेतले नव्हते, त्या नंतर ते कधी परत दिसले नाही, वेळाच्या वेळी न केलेल्या शुल्लक गोष्टींचे किती दुरगामी परिणाम असतात).
मग त्यांनी "इतिहास आणि कल्पित " हे पुस्तक वाचायला घेतले.
चितोडची पद्मिनी अशी व्यक्ती मुळातच नव्हती हे ठावुक होते पण सोळाव्या शतकात म्हणजे चितोडच्या पाडावानंतर दोनशे वर्षाने मलिक मुहंमद जायसी यांने आपल्या हिंदी रुपककाव्यातुन निर्माण केलेले हे काल्पनिक पात्र आहे हे माहिती नव्हते.
अश्या अनेक गैरसमजुती हळु हळु दुर होत चालल्या आहेत.
अभ्यासकांनी , संशोधकांनी लिहिलेली पुस्तकं वाचायला घेतली की मग जाणवते किती अपुऱ्या ज्ञानावर आधारीत आपण अनेक विधाने बेधडकपणॆ करत आपले म्हणणॆ बिंधास्तपणॆ रेटुन नेत असतो.
अभ्यासकांनी , संशोधकांनी लिहिलेली पुस्तकं वाचायला घेतली की मग जाणवते किती अपुऱ्या ज्ञानावर आधारीत आपण अनेक विधाने बेधडकपणॆ करत आपले म्हणणॆ बिंधास्तपणॆ रेटुन नेत असतो.
2 comments:
खर तर अशा अनेक घटना आहेत. महाभारतातले राधा हे पात्र. त्याला ऐतिहासिक आधार नाही. एवढे लांब कशाला, आग्र्याहून सुटका मध्ये असलेला मदारी मेहतर याला ही पक्का पुरावा नाहीये.... बाकी तुमच्या एन्करेजमेंट बद्दलमात्र मनापासून आभार.
राधा हे पात्र महाभारतात असण्याचे कारण नाही. महाभारतातील कृष्ण राजकारणी आहे. भागवतात राधा समर्पणपूर्वक होणार्या भक्तीचे मूर्त स्वरूप म्हणून आली आहे. तेथेही राधेचा स्पष्ट उल्लेख नाही. असे असले तरी ही रूपके आहेत हे लक्षात घेता त्याला कल्पित म्हणणे चुकीचेच ठरेल.
Post a Comment